मार बसल्यावरच जागे होणार का, आपण?


 
     मार बसल्यावरच जागे होणार का, आपण? असे वाटावे, असे भारतीयांचे हवामान बदलाविषयीचे वर्तन असल्याचे वारंवार दिसत आहे. आजमितीस वाढत्या तापमानामुळे मेक्सिको या देशातील सरकारने त्यांचा देशात कामाचे फक्त पाच दिवस करण्याचे ठरवले आहे.दोन दिवस सुट्टी दिल्यामुळे लोक घराबाहेर कमी पडतील ,परीणामी तेथील सामान्य लोक सुर्याचा प्रकोपातुन वाचतील असा मेस्किकन सरकारचा कयास आहे.भौगोलिक क्षेत्राचा विचार करता, आपला भारत आणि मेस्किको हे दोन्ही देश उत्तर गोलार्धात उष्ण कटीबंधात प्रदेशात येतात. उत्तर गोलार्धात आता उन्हाळा सुरु असल्याने वातावरणात उष्मा आहे. तापमान रोज नवनवे उच्चांक स्थापित करत आहे. आपल्या भारतात राजस्थानातील चूरु आणि महाराष्ट्रात चंद्रपूर ही शहरे भयावह तापमान नोंदवत आहे. मात्र आपल्याकडे अजूनही बदलते हवामान हा विषय योग्य त्या गांभिर्याने घेतला जात नाहीये. नाही म्हणायला काही गैर सरकारी संस्था, सरकारचे काही विभाग हवामान बदलाविषयी जनजागृती करत आहेत. मात्र त्यांचे प्रयत्न जगभरात लहरी हवामान दाखवत असणारे प्रताप बघता अत्यंत तोकडे आहेत. मेस्किको ,  आदी
लोकसंख्येची घनता आणि एकुणच लोकसंख्या विचार करता कमी लोकसंख्येचे देश आहेत. मात्र सध्या तिथे बदलत्या हवामानामुळे ज्याप्रकारे लोकांना त्रास होण्याचा बातम्या येत आहे. ते बघता तितकी वाइट  हवामानाची स्थिती भारताची नाही. याबाबत आपण समाधान मानायला हवे.कातडीचा रंग जरी आपल्याकडे काहीसा उष्णता सहन करणारा असला तरी आपल्याकडील गर्दी बघता जर तसी स्थिती आपल्याकडे झाल्यास काही प्रमाणात मृत्यूही होवु शकतात,हे सांगायला कोण्या ज्योतिष्याची गरज नाही.
 आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, पुढच्यास ठेच मागचा शहाणा.या न्यायाने निसर्ग आपणास वारंवार जाणीव करुन देतोय, हवामान बदलाविषयी काहीतरी ठोस करा.मात्र आपण काहीच करत नाही.    आपल्याकडे लोकशाही आहे. कोणत्याही लोकशाही देशात राज्यकर्ते, विरोधक यांनी एखादा मुद्दा लावून धरल्यास त्या मुद्द्यासठी जनमत तयार होते.आज कोणता राजकरणी हा मुद्दा आपल्या राजकरणातून मांडतोय, याचा विचार करता समोर येणारे चित्र आशादायक नाही. हवामानबदलाचा फटका जात,धर्म बघून कमी अधिक बसणार आहे. असे नाहीये.सर्वांना तो सारखाच फटकवणार आहे. आपण त्याविषयी किती जागरुक आहोत?याचे समोर चित्र फारसे उत्साहवर्धक नाही. जो तो दुसऱ्याकडे बोट दाखवतोय.आमच्यावर परंपरा निसर्गविरोधात म्हणून  टिका करताय , मग यांच्या निसर्गविरोधातील परंपरा आपणास दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र सुरवात करताना कोणीतरी पहिले असणार .त्यामुळे पहिले आम्ही का? ते का नाही,हा प्रश्न उपस्थित केला
जातोय.जो हवामानबदलाविषयीच्या जागतिक स्तरावर येणाऱ्या बातम्या बघताना चूकीचा असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. मात्र आपण भारतीय या प्रश्नाकडे योग्य स्थितीत बघत नाहीये.आपण लोकसंख्येचा बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असलो तरी पहिल्या क्रमांकावर असलेला चीन आपल्या तूलनेत क्षेत्रफळाने तिप्पट आहे. परीणामी त्यांची लोकसंख्येची घनता आपल्या तूलनेत कमी आहे. परीणामी त्याचा प्रश्न आपल्या तूलनेत कमी त्रासदायक आहे. हेआपण लक्षात घेयला हवे.जेव्हा ते लक्षात घेवून आपण हवामानबदलाविषयी पाउले टाकायला लागू राजकरणी व्यक्ती या मुद्द्यावरुन राजकारण करतील तो भारतासाठी सुदिन असेल हे नक्की.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?