या मुद्यांवर आपण मौन कधी सोडणार ?


   सध्या आपल्या महाराष्ट्रात विविध राजकीय घडामोडीना वेग आला आहे . राजकीय नेते एकमेंकांवर  आरोप प्रत्यारोप करत आहे . विविध केंद्रीय तपास  यंत्रणांच्या गैरवापर केल्याच्या आरोप सत्ताधिकाऱ्याकडून विरोधकांवर केला जात आहे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सत्ताधिकारी पक्षाच्या विविध नेत्यांवर भष्टाचाराचे  अनेक आरोप करण्यात येत आहे या आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात एका  महत्त्वाच्या प्रशांबाबत मात्र अनेकांकडून मौन बाळगले जात आहे . तो म्हणजे सध्याची कृषी  क्षेत्राची स्थिती 
महाराष्ट्राच्या सन २०२१ -२२ च्या आर्थिक पाहणी अहवालात तृणधान्ये तकडधान्ये तेलबिया कापूस यांचे एकरी उत्पादन मोठ्या प्रमाणा  घटल्यामुमुळे चिंता व्यक्त करण्यात आली होती कांद्याचे एकरी उत्पादन घटल्याचे एका पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहेच आर्थिक पाहणी अहवालात सांगितल्याप्रमाणे तृणधान्ये तकडधान्ये तेलबिया कापूस प्रमाण जरी लक्षणीय रित्या कमी झाले असले तरी यासारखी अनेक पिके या रांगेत आहेत मी कांदा खात नाही कांदा काही जीवनवश्यक गोष्ट नाही अशी भूमिका आपण कांद्याच्या उप्तादनाबाबत घेऊ शकत नाही कांदा आपल्या महाराष्ट्रातील महत्व्वाचे पीक आहे आपल्या महाराष्ट्राची देशांतर्गत आणि अंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी निर्यात बघितली तर आपणास हे सहजतेने लक्षात येते की कांदा या पिकाचे योगदान महाराष्ट्राच्या निर्यतीत मोठे आहे उसाखालील सर्वात मोठे क्षेत्र हे कांदा या पिकाखाली आहे त्यात एकरी उत्पादनात होणारी घट चांगली माही 
         सध्या आपल्या महाराष्ट्रातील ऊस उत्पादक मोठ्या संकटात आहे . अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस वाळून चाललाय किंवा त्यास फुलोरा फुटल्याने तो वाया गेला आहे मात्र असे असून देखील साखर कारखाने त्यांच्या शेतातील ऊस गाळपासाठी घेत नाहीये सध्या उसाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात आहे त्या सर्वांचे गाळप करणे
आम्हाला शक्य नाही असे स्पष्टीकरण याबाबत साखर कारखान्याकडून देण्यात येत आहे  सरकारी आकडेवारीनुसार गेल्या वर्षी पाऊस उत्तम झाल्याने या वर्षी गेल्या काही वर्षाच्या विचार करता मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन झाले आहे दुष्काळात तेरावा महिना म्हणावा अश्या प्रकारची अजून एका वाईट गोष्ट मम्नवी की काही कारणामुळे अनेक साखर कारखाने या वर्षी सुरूच झाले नाही परिणमयी उत्पादन जास्त प्रक्रिया करणारे उद्योग जास्त अश्या कात्रीत  ऊस उत्पादक सापडला आहे 
    हे कमी की काय म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका डाळींबाचे आगर समजला जातो विमान आणि उपग्रहावरून सांगोला तालुक्याचे फोटो बघितल्यास सांगोला परिसारात जंगल दिसणार नाही मात्र एका विशिष्ट पद्धतीने रचना असलेली डाळींबाची झाडे मोठ्या प्रमाणत दिसतात . गेल्या काही दिवसात या भागातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या डाळींबाच्या बाग उखडून टाकल्या आहेत या बाग उखडण्यासाठी त्यांनी अल्प फळधारणा हे कारण दिले आहेत गेल्या काही वर्षात डाळींबांनच्या झाडाना  पूर्वीपेक्षा कमी फळे येत असल्याने उप्तादन घटले आहे परिमाणी एका झाडाची निगा राखण्यासाठी लागणारा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याचा विचार करता बागा परवडणाऱ्या न ठरल्याने सांगोला परिसरातील डाळींबा उप्तादक त्यांच्या बागा काढून टाकत आहे त्याजागी ते मक्याची लागवड करत आहे मक्याच्या लागवडीमुळे जमिनीची गुणवत्ता सुधारून त्यानंतर डाळिंबाची लागवड केल्यास अधिक पीक येईल या आशेवर हे शेतकरी आपली कित्येक वर्षाची बाग उखडत आहे  
गेल्या काही वर्षातील अनुभव बघता महाराष्ट्राला अवकाळी काही नवीन राहिला नाहीये मात्र या अवकाळीला तोंड देण्याबाबत अजून शासकीय धोरण ठरलेले नाहीये जेव्हा अवकाळी पाऊस पडतो तेव्हा तात्पुरता स्वरूपात त्याविषयी मदत दिली जाते मात्र याविषयी कायमस्वकरुपी तोडगा काढण्याबाबत काहीही केले जात नाही
अवकाळीमुळे शेतीचे मुळातच नुकसान कमी होईल याबाबत काहीतरी कार्यवाही करण्याची सध्या नितांत आवश्यकता आहे 
माझ्या बापणाने नाही केला पेरा तर तुम्ही काय खल धतुरा या सारख्या ग्रामीण जीवनाच्या कवितांना शहरी भागात मोठा प्रतिसाद मिळतो मात्र हा प्रतिसाद कृतीत बदलण्याची गरज या घटनांमधून व्यक्त करण्यात येत आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?