भारतीय रेल्वेची प्रगतीची एक्स्प्रेस सुसाट

 


भारतीय रेल्वेची प्रगतीची एक्स्प्रेस सुसाट  धावायला लागल्याचे स्पष्ट करणाऱ्या दोन घटना गेल्या आठवड्यात घडल्या . आपल्या वृत्त माध्यमांमध्ये सध्या राजकीय बातम्यांचा भडीमार सुरु असल्याने या देशाच्या प्रगतीच्या बातम्या काहिस्या मागे पडल्या , त्यांच्या हा अनुशेष भरून काढण्यासाठी या दोन घटनांची माहिती देण्यासाठी आजचे लेखन 

तर भारतीय रेल्वच्या उत्पनाचा वाट्याच्या विचार करता प्रवाशी भाड्यापेक्षा अधिक उत्पन्न भारतीय रेल्वेला मालवाहतुकीतून मिळते मात्र धावणाऱ्या रेल्वचा विचार करता मालवाहतुकीच्या गाड्यांपेक्षा प्रवाशी गाडयांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याने  अनेक उद्योजक स्वस्त असणारा आणि रस्त्यावरील वाहतुकीचा ताण  कमी (पर्ययाने रस्त्यावरील अपघातांची संख्या सुद्धा कमी )करणाऱया रेल्वे मालवाहतुकीच्या पर्याय सोडून प्रदूषण करणाऱ्यारस्तेमाभारतीय र्गावरील मालवाहतुकीचा पर्याय स्वीकारताना दिसतात . ज्याचा परिणामस्वरूप
रेल्वेचे उत्पन्न कमी होत आहेच तसेच रस्त्यावरून मोठं मोठी कंटनेरची वाहतूक होत असल्याने गंभीर अपघात वाढ होत आहे ही समस्या सोडवण्यासाठी सध्या भारतीय रेल्वेकडून खास मालवाहुकीसाठी निर्धारित केलेले रेल्वेमार्ग उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे हे आपणास माहिती असेलच यासाठी विशेष मार्गाची उभारणी करण्याचे काम करण्याबरोबर अधिकाधिक सामान  वेगाने वाहून नेणाऱ्या रेल्वे इंजिनाची निर्मिती केल्यानंतर आता भारतीय रेल्वे देशातील रेल्वेमालवाहतुकीला चालना देण्यासाठी अजून एक मोठे पाऊल उचलत आहे . ते म्हणजे येत्या ३ वर्षात तब्बल ९० हजार मालवाहतुकीचे डब्बे बांधण्याचे या साठी रेल्वेने ३१ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे तीन वर्षात ९० हजार डब्बे बांधायचे असल्याने भारतीय रेल्वेचे  हे डब्बे खासगी क्षेत्राकडून बांधून  घेण्याचे नियोजन आहे त्यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबवण्यात आली ज्यामध्ये १६ कंपन्यांनी रुची दाखवली आहे रेल अँड इंजिनीरिंग , ओरीनटेल रेल इन्फ्रास्ट्क्चर लिमिटेड , ज्युपिटर वॅगन ,जिंदल रेल इन्फ्रास्ट्क्चर, टिटालगढ वॅगन ,सेल्स अँड राईट्स , बंगाल रेल इंडस्त्री , या काही प्रमुख रेल्वे कंपन्या आहेत सर्वप्रथमी या कंपन्यांना आपली तांत्रिक क्षमता सिद्ध करावी लागेल तांत्रिक परीक्षेत पास झाल्यावर मग सर्वात कमी दरात रेल्वेच्या मालवाहतुकीचे डब्बे बांधून देणाऱ्या कंपनीस हे कंत्राट मिळेल, यासाठी रेल डिझायन स्टॅंडर्ड ऑर्गनाझेशन हे फक्त एका दिवसात यास मान्यता दिलि आतापर्यतच्या रेल्वेच्या इतिहासातील ही विक्रमी वेळ आहे हे काम खूपच मोठे असल्याने एका पेक्षा जास्त कंपन्या यासाठी पात्र केल्या जातील असं अंदाज आहे  इतक्या मोठया प्रमाणात
मालवाहतुकीच्या डब्याची निर्मिती होणार असल्याने रेल्वे मालवाहतुकीच्या डब्याच्या चाकाची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे . बंगलोर येथील रेल्वे व्हील फॅक्टरी या रेल्वे चाकांची निर्मिती करणाऱ्या उप कंपनीची क्षमता इतकी नाही अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे यासाठी रेल्वे चाकांची आयत करण्यात येऊ शकते ही आयात कोणत्याही देशाकडून होऊ शकते अशी बातमी द हिंदू  ने  दिले आहे 
      या खेरीज ट्रेन २० या नावाने ओळखल्या जणाऱ्या अत्याधुनिक अश्या रेल्वची निर्मिती करण्यासाठीची प्रकिया भारतीय रेल्वेने सुरु केली आहे यातील विविध इलेट्रीक उपकरणाची निर्मिती करण्यासाठी  खासगी क्षेत्रातीळ कंपन्यांची मदत घेण्याचे भारतीय रेल्वेची योजना आहे यासाठीची कंत्राट प्रकिया नुकतीच सुरु करण्यात आली जी जुलै महिन्यापर्यंत चालणार आहे यातीलइलेट्रैक भागाची पूर्णतः जवाबदारी निर्मिती करणाऱ्या कंपनीची असणार आहे यासाठी इच्छुक असणाऱ्या कंपन्यांना २० कोटी रुपयांची सुरक्षा ठेवा रेल्वेकडे जमा केल्यानंतरच कंत्राट भरता येणार आहे कंत्राटा नूर खासगी क्षेत्राकडून जरी विविध घटक तयार करण्यात येणार असले तरी त्यांची निर्मिती लातूर येथील मराठवाडा रेल चोच फॅक्टरी आणि चेन्नई येथील इंट्रिगटेडकोच फॅक्टरी येथे होणार आहे सध्या सुरु असणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस  या बसून प्रवास करण्यासाठी तयार केलेल्या गाड्या आहेत यात स्लिपरची सोय नाहीये मात्र ट्रेन २० मध्ये स्लिपरची सोय करण्यात आलेली आहे किंबहुना सध्याच्या वंदे भारत एक्स्प्रेसचे स्लीपर व्हर्जन म्हणजे ट्रेन २० असे म्हटल्यास वावगे ठरू नये 
विस्तार वाहून नेणारी प्रवाशी संख्या . कर्मचारी संख्या याबाबत जगत पहिल्या पाचात असणारी भारतीय रेल्वे नव्या जगाची आव्हाने स्वीकारण्यास तयार होत असल्याचेच यातून सिद्ध होत आहे , हे नक्की 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?