मानावा सावध हो पुढल्या हाका

     


       शाहरुख खान आणि आणि काजोल यांच्या अभिनयाने सजलेला एक उत्कृष्ट चित्रपट म्हणजे माय नेम इज खान . या चित्रपटात दोन्ही अभिनेत्यावर चित्रित एक गाणे आहे . तेरे नैना तेरे नैना रे . या गाण्यात एक दृश्यात शाहरुख खानने  काजोलला  मधमाश्यांचे  निसर्गातील महत्व  सांगितले आहे ज्यात अल्बर्ट आईंस्टानच्या  हवाल्याने जर जगातील सर्व मधमाश्या नष्ट झाल्यावर चार वर्षांनी जगातील सर्व माणसे मरतील अशी भविष्यवाणी शाहरुखने केली आहे . आता असे  काही  अल्बर्ट आईंस्टान खरंच म्हंटले की शाहरुख खानाने चित्रपट पुढे नेण्यासाठी त्याच्या तोंडी स्वतःहून घातलेले वाक्य आहे हे तो शाहरुख खानच जाणे .मात्र जगातील पक्षी जगत धोक्यात आहे हे नुकतेच एका संशोधांतून स्पष्ट झाले आहे 

              स्टेट ऑफ द वर्ल्ड्स बर्ड्स या पक्ष्यांच्या संरक्षणविषयक कार्य करणाऱ्या संस्थेनुसार  जगभरात आढळणाऱ्या पक्ष्यच्या 10,994  जातींपैकी  13.5%  जातींवर  सध्या नामशेष होण्याचा धोका आहे गुवाहाटी येथील जंगलात त्यांनी केलेल्या प्रयोगवरून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे  जगातील 14% पक्ष्यांच्या जाती   जगभरतातील लोक खातात . मात्र  सध्या अस्तित्वात असलेल्या ४८% पक्ष्यांच्या जातीतील पक्ष्यांची संख्या  कमी होण्याचे हे एकमेव कारण नाही, असे नऊ प्रसिद्ध पक्षी तज्ज्ञ आणि संरक्षकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
           द स्टेट ऑफ द वर्ल्ड्स बर्ड्स मार्फत , 5 मे रोजी प्रकाशित झालेल्या  अहवालात हि गोष्ट सांगण्यात आली आहे या अहवालात , सध्या मानवाने मान्य केलेल्या  10,994 पक्ष्यांच्या  जातींपैकी  जवळपास निम्म्या पक्ष्यांना त्यांच्या राहण्याच्या जागेत झालेले बदल  आणि हवामानातील बदलांमुळे मोत्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे
लागत असल्याचे सांगितले आहे  या अहवालात या गोष्टींसाठी मानवी हस्तक्षेपास जवाबदार धरले आहे आहे. मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी (MMU) च्या नेतृत्वाखालील अभ्यासात असे सांगण्यात आले  आहे की, नैसर्गिक अधिवास नष्ट होणे  अनेक पक्ष्याच्या जातीचे  अतिशय जास्त प्रमाणत केले जाणारे शोषण या गोष्टी  हे पक्षी जैवविविधतेसाठी मुख्य धोके आहेत.
         या अभ्यासात असे आढळून आले की , जगभरातील अस्तित्वात असलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींपैकी 5,245 किंवा सुमारे 48% पक्षीसंख्या  कमी होत  आहे. 4,295 किंवा 39% पक्ष्याच्या घटण्याचा दर स्थिर  होता, तर सुमारे 7% किंवा 778 प्रजातींमध्ये  घटण्याचा दर  वाढला होता. 37 %पक्ष्याच्या दराबाबत शास्त्रज्ञांना अजून काहीही माहिती झालेली नाही  उष्णकटिबंधीय जंगलांव्यतिरिक्त, नैसर्गिक गवताळ प्रदेशांचा धोका विशेषतः उत्तर अमेरिका, युरोप आणि भारतासाठी चिंताजनक आहे.असे या अहवालात सांगण्यात आले आहे 
            या लेखाच्या सुरवातीला सांगितले त्या प्रमाणे पक्ष्यांचे आपल्या जीवनातील स्थान महत्त्वाचे आहे . आपल्याकडे असणाऱ्या सांस्कृतिक खजिन्यात लहान मुलाच्या चिऊ काऊच्या गोष्टींपासून युवक युवतींच्या प्रेमी जीवनात कबुतर सारख्या अनेक पक्ष्यांचे उल्लेख आहेत . अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात पसरलेल्या माळढोक अभयारण्यामुळे औद्योगिक दृष्ट्या अविकसित  तसेच शेतीचा विचार करता देखील फारसा उत्तम नसलेल्या  श्रीगोंदा , जामखेड,  करमाळा टेम्भूर्णी आदी परिसरातील अनेकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे  आपल्या महाराष्ट्रात सुद्धा इमू शहामृग सारख्या पक्ष्यांची जोपासना करून अनेकांनी समृद्धीची वाटचाल केली आहे त्या पार्श्वभूमीवर आपण याअहवालाकडे बघायला हवे आणि या पक्ष्यांच्या घालणाऱ्या संख्येच्या संकटातून पक्षी जगताची सुटका कशी होईल ते बघितले पाहिजे यातच आपले हित  आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?