साहेबाचा सूर्य अस्ताला गेला !

   


    आपल्या भारतावर ब्रिटिशांचे १५० वर्षे राज्य होते बंगालमधील  प्लासी आणि बक्सरच्या  युद्धाचा  विचार केला असता हा कालावधी अजून ४० ते ५० वर्षे मागे जातो जगाच्या  सर्वात जास्त भूभागावर राज्य करणारे  युरोपातील सर्वात प्रबळ राष्ट म्हणून ब्रिटिश ओळखले जात असतं.  त्यांचे साम्राज जगभरात असल्याने ज्यांच्या समाजावरील सूर्य कधीच मावळत नाही ते साम्राज म्हणजे ब्रिटिश साम्राज असे म्हंटले जायचे.  मात्र दिवस कधीच सारखे नसतात . ब्रिटिशाना त्यांच्या वसाहतींना स्वतंत्र देणे भाग पडले,परिणामी . त्यांचे  साम्राज  कमी झाले या सर्व घडामोडीत दुष्काळात तेरावा महिना अशी घडामोड ८ आणि ९ मे या दिवशी घडली  ज्यामुळे युनाटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दन आर्यंलंड असे पूर्ण नाव असलेल्या देशातील   नॉर्दन आर्यंलंड हा भूभाग देशाचा भाग राहतो का असा प्रश्न उपस्थित झाला आहे 

     तर मित्रानो   ज्याला आपण महाराष्ट्रातील लोक सर्वसाधारपणे इंगलंड म्हणून ओळखतो त्या देशाला जगभरात  युनाटेड किंगडम  किंवा त्यांचे संक्षिप्त नाव म्हणून युके म्हणून ओळखले जाते त्या देशात वेल्स , इंगलंड वेल्स स्कॉटलंड आणि नॉर्दन आर्यंलंड   हे चार प्रांत आहेत (प्रांत या घटकाचे राजनीतिक स्थान आपल्याकडील

केंद्रशासित प्रदेश आणि राज्य यातील आहे प्रांत म्हणजे केंद्रशासित प्रदेश नाही आणि पूर्ण राज्य देखील नाही असो ) यातील नॉर्दन आर्यलँड वगळता अन्य भागाला एकत्रितपाने ग्रेट ब्रिटन म्हणतात [ ग्रेट ब्रिटनमधून स्कॉटलंडला बाहेर काढल्यावर  होणाऱ्या भागाला ब्रिटन म्हणतात }. ग्रेट ब्रिटन हे युरोपातील फ्रान्स या देशाच्या वायव्य दिशेला असणारे बेट आहे . .या गेट ब्रिटन बेटाजवळ वायव्य दिशेला   अजून एक बेट आहे  ज्यास आर्यलंडचे बेट म्हणतात .

           ब्रिटिशांनी  जसे आपल्याकडे राज्य केले तसे या बेटावर देखील राज्य केले ब्रिटिशांनी यास १९१३ साली स्वातंत्र्य दिले मात्र इस्राईल पॅलेस्टाईन समस्या असो किंवा  आपल्या भारत पाकिस्तानची समस्यां जासी ब्रिटिशांनी पुढे आपल्याला हात घालता येईल या हेतूने जाणीपूर्वक निर्माण केली . तोच प्रकार आर्यलंडला स्वातन्त्रा देताना देखील केला त्यांनी या बेटाचे दोन भाग केले एका भागाला स्वातंत्र्य दिले या भागला आपण रिपब्लीक ऑफ आर्यलँड म्हणून ओळखतो दुसरा भाग स्वतःकडेच ठेवला एक प्रांत म्हणून त्यास नॉर्दन आर्यलँड म्हणून ओळख दिली नॉर्दन आर्यलंडला  रिपब्लीक ऑफ आर्यलँड  या देशात सामील करून घ्यावे यासाठी अनेक आंदोलने नॉर्दन आर्यलँड भागात सुरु असतात . ब्रेक्झिटच्या मतदानाच्या वेळी नॉर्दन आर्यलँड या भागाने युरोपीय युनियनमध्ये राहण्याच्या बाजूने कौल दिला होता . त्या कौलानंतर या मागणीने नव्याने जोर धरला नॉर्दन आर्यलँड मधील विघटनवादी शक्ती कमी व्हाव्यात यासाठी रिपब्लिक ऑफ आर्यलँड आणि नॉर्दन आर्यलँड यातील सीमा खुली ठेवली {या खुल्या सीमेमुळेच ब्रेक्झिटचा गुंता निर्माण झाला होता } यासाठी अधिकृतपणे करार देखील करण्यात आला होता हा करार ईस्टर संडे या सणाच्या दिवशी झाल्याने यास ईस्टर दे पॅक्ट म्हणून देखील ओळखले जाते 
             या सर्व पार्श्वभूमीवर ८ मे आणि ९ मे रोजी एका नाट्य घडले नॉर्दन आर्यलँड या प्रातांच्या विधानसभेच्या निवडणुकीत नॉर्दन आर्यलँड या भागाचे उर्वरित आर्यलंडमध्ये विलीनीकरण करावे या मुद्यावर आग्रही भूमिका घेणारा पक्ष (युकेत देखील बहुपक्षीय लोकशाही आहे मात्र देखील लेबर आणि कॉझरेटिव्ह हे दोन पक्ष जवळपास सर्वच जिंकतात आपल्याकडे जसे अपक्ष एखाद दुसरी जागा जिंकतात त्याच प्रमाणे या पक्षांना अत्यंत मोजक्या
जागा मिळतात त्यामुळे त्यांच्या विचार करण्यात येत नाही ) प्रचंड मोठ्या अगदी पाशवी वाटेल इतक्या विक्रमी संख्येने निवडून आला आहे या पक्षाच्या जाहिरण्मम्यातच आम्ही सत्तेत आल्यास आपल्यास स्वातंत्र्य देण्यासाठी सार्वमत घेण्यास लंडनला भाग पडू असे आश्वासन असल्याने युकेतील केंद्र सरकारला या भागात आज नाही तर उद्या सार्वमत घ्यावेच लागेल आणि जर या  मतदानात ५०% हुन अधिक जणांनी स्वातंत्र्य होण्यास मान्यता दिली तर नॉर्दन आर्यललँड युनाटेड किंग्डमपासून वेगळे होईल आणि साहेबांचा सूर्य अस्ताला गेला असे आपणस म्हणावे लागेल 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?