श्रीलंकेमागचे शुक्लकाष्ट संपेचिचेना


घर  फिरले की घराचे वासे देखील फिरतात अशी आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे एकदा संकटाची मालिका सुरु झाल्यावर रोज नवनवीन संकटे येतच राहतात हा त्या म्हणीचा अर्थ  आपल्या शेजारील श्रीलंका हा त्याच्या अनुभव घेतोय आर्थिक संकटातून आलेल्या नैराश्यातू सुरु झालेले राजनैतिक संकट दिवसोंदिवस  अधिक गंभीर होत चालले आहे या राजनॆतिक संकटामुळे ज्या कारणामुळे ही आर्थिक विपन्नतेमुळे ही संकटाची मालिका सुरु झाली त्याकडे सर्वांचेच काहीसे दुर्लक्ष होत आहे  आंतराष्ट्रीय नाणेनिधीने श्रीलंकेत सुरु असलेल्या आर्थिक अडचणीवर तोडगा काढण्यासाठी श्रीलंकेत राजनीतिक शांतता असणे आवश्यक असल्याचे नमूद करून सुद्धा श्रीलंकेतील राजनैतिक संकट दिवसोंदिवस अधिक गहिरे होत आहे 
 मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आर्थिक संकटामुळे निरास झालेल्या जनतेने मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलन केल्यावर तेथील राष्ट्रपतीने आपल्या मोठ्या भावाचा पंतप्रधान असलेल्या महिंद्रा राजपक्षे यांच्या राजीनामा घेतला त्यानंतर झालेल्या राजकीय पोकळीस भरून काढण्यासाठी राजपक्षे यांचे राजकीय विरोधक समजल्या जाणाऱ्या ७३ वर्षीय रनीला विक्रमसिंघे यांची नियुक्ती केली    रनीला विक्रमसिंघे या आधी पाचवेळा श्रीलंकेचे पंतप्रधान झाले आहेत मात्र त्यांनी एकदाही पूर्ण कालावधीसाठी सत्ता सांभाळली नाहीये सध्या देखील श्रीलंकेच्या लोकसभेत 
त्यांच्या पक्षाचे फक्त ४ सदस्य आहेत मात्र सध्या श्रीलंकेतील लोकसभेत बहुमत असणाऱ्या राजपक्षे यांच्या  पक्षाकडून विक्रमसिंघे यांना समर्थन देण्यात आल्याने रनीला विक्रमसिंघे याना श्रीलंकेच्या संसदेत बहुमत  सिध्द्य  करण्यात अडचण येणार नाहीये 
मात्र चित्र दिसते तसे सोपे नाहीये विक्रमसिंघे आणि राजपक्षे यांचे विरोध असणाऱ्या बंदरनायके यांच्या पक्षाकडून आम्ही विक्रमसिंघे सरकारला सहकार्य करणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे सरकारच्या विरोधात त्यांनी देशभरात आंदोलन सूर केले आहे राष्ट्रपती राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा तसेच नव्याने संसदेची निवडणूक घेण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे राजपक्षे जो पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी आहेत तो पर्यंत आम्ही सत्ता स्वीकारणार नाही अशी त्यांची भूमिका असल्याने त्यांनी महिंद्रा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर सुद्धा ते श्रीलंकेची सूत्रे हाती घेण्यास तयार नव्हते या उलट त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली ते राष्ट्राध्यक्ष राजपाकसे यांच्या बरोबर विक्रमसिंघे यांच्या विरोधात आंदोलन करणार आहेत त्यांनी श्रीलंकेत सर्वपक्षीय सार्कमध्ये सहभागी होण्यास देखील नकार दिला आहे  जनमत बंदरनायके यांच्या बरोबर आहे  ज्यामुळे श्रीलंकेत अभूतपूर्व अशी राजकीय कोंडी झाली आहे ज्यामुळे श्रीलंकेच्या या सर्व प्रश्नाच्या मुळाशी असणाऱ्या आर्थिक संकटाबाबत काहीशी अनास्था निर्माण झाली आहे ज्याही फार मोठी किंमत तेथील जनतेला चुकवावी लागणार आहे  आणि याचेच दुःख आहे राजकीय नेते देशाची दुर्दशा करतात आणि नंतर देश सोडून अन्य ठिकाणी आश्रय घेतात ती सोया सर्वसामान्य जनतेला नसते हा मजकूर लिहीत असताना देखील राजपक्षे सरकाने स्वतःच्या सात पिढ्या बसून खातील इतके कमवले आहे त्यामुळे श्रीलंकेतील आर्थिक संकट अधिक बिकट आले तर त्यात होरपळणारा आहे ती सर्वसामान्य श्रीलंकन जनता 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?