येणारा काळ कसोटीचा

       

   आपला येणार काळ कसोटीचा आहे याची साक्ष देणाऱ्या घटना सध्या जागतिक पटलावर सध्या घडत आहे , रशियाला १६ देशांची सीमा लागून आहे त्यातील १२ देश १९९० पर्यंत रशियाचा भाग होते १९९० साली युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाचे विघटन झाल्यावर १५ देश स्वतंत्र झाले त्यातील १२ देश रशियारोबर सीमा शेअर करतात  त्यातील एक म्हणजे युक्रेन ज्याने गरज नसताना अमेरिकेशी जवळीक साधण्याच्या  केलेल्या  प्रयत्नामुळे त्याची कशी राख रांगोळी झाली?  हे आपण बघतच आहोत जे देश पूर्वी कधीही सेव्हियत सोशालिस्ट रशियाचा भाग नव्हते मात्र रशियाबरोबर सीमा शेखर करतात असे देश ४ देश म्हणजे  म्हणजे फिनलंड . उत्तर कोरिया   चीन आणि मंगोलिया यातील स्वीडन आणि स्वीडन बरोबर सीमा शेअर करणारा (जी रशिया स्वीडन सीमेपासून किलोमीटरच्या भाषेत फारशी लांब नाही ) असा देश फिनलंड फिनलंड हे देश नाटो बरोबर जाण्यास इच्छुक असल्याने येणारा काळ  कसोटीचा असणार असल्याचे स्पष्ट होत  आहे 
           जगात दोन मोठे गुंड आहेत रशिया आणि अमेरिका आपल्याकडे असते  त्या प्रमाणे या दोन जागतिक गुंडांचे देखील एक प्रभाव क्षेत्र आहे भोगोलिक संलग्नतेच्या विचार करता सध्या  नाटोत जाऊ इच्छिणारे फिनलंड आणि स्वीडन हे देश रशियाच्या गटात येतात . आता ज्या प्रमाणे कोणताही गुंड आपल्या प्रभाव क्षेत्रात येणाऱ्या परिसरात  दुसऱ्या गुंडाचा हस्तक्षेप स्वीकारू शकत नाही त्या प्रमाणे रशिया देखील आपल्या प्रभाव क्षेत्रात दुसऱ्या जागतिक  गुंडाचा अर्थात अमेरिकेचा वाढता प्रभाव कशा स्वीकारणार?  त्यामुळे सध्या याबाबत रशियाकडून कोणतीही प्रतिक्रिया हा लेख लिहीत असताना देण्यात आलेली नसली तरी रशिया हे शांततेने घेणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे ज्यामुळे रशिया आणि युक्रेन सारखे अजून एक युद्ध होऊ शकते . जागतिक अर्थव्यवस्था  कोव्हीड १९ च्या संकटानंतर रशिया युक्रेन युद्धामुळे अत्यंत मेटाकुटीला आल्या आहेत त्यात जर पुन्हा दुसरे युद्ध झाल्यास परिस्थिती अजूनच बिकट होणार हे सांगायलाच नको 
       जगातील प्रत्येक देश स्वतःचे निर्णय घेण्यास स्वतंत्र असला तरी पाण्यात रहाणाऱ्याने मास्याशी वैर करायला नको या आपल्या मराठी म्हणीप्रमाणे रशियाचा शेजारील देश जर अमेरिकेच्या नेतुत्वाखाली असणाऱ्या लष्करी संघटनेत सहभागी होणार असे जाहीर करत असतील तर मग जागतिक शांतता कशी रहाणार ? या ठिकाणी मी रशियाचे समर्थन करत नाहीये हे लक्षात घेणे   आज अमेरिका रशियाच्या शेजारील देशांमध्ये जे उद्योग करत आहे ते उद्योग जर रशियाने मेक्सिको किंवा अमेरिकेचे जवळचे हितसंबंध  असणाऱ्या देशात केले तर अमेरिका शांत बसणार नाही हे सांगायला कोणत्याही ज्योतिष्याची गरज नाहीये त्यावेळी जे अमेरिका करेल तेच आता रशिया आता करत आहे याला आळा घालण्याची नितांत आवश्यकता आहे नाहीतर  असे प्रकार सुरूच राहतील जे जगाला परवडणारे नाही  स्वतःच्या फायद्यासाठी जागतिक शांततेचा भंग करणाऱ्या या शीतयुध्दकालीन मानसिकतेला प्रतिबंध कॊणत्या प्रकारे करण्यात येतील याबाबत जागतिक मंथन करणे त्यामुळे महत्त्वाचे ठरते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?