भिकारी, ते मोठा निर्यातदार भारताचा गव्हाचा प्रवास


  सध्या जगातील मोठ्या 7 अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांचा समुह अर्थात जी 7 या संघटनेतील देश भारतावर काहीसे नाराज आहेत, आणि याला कारणीभूत आहे, भारताच गहु निर्यात थांबवण्याचा निर्णय. आज भारत जगातील प्रमुख गहु उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. त्याने घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचे या देशांचे म्हणणे आहे. त्यामुळे जगभरात गव्हाचे दर वाढू शकतात.ज्यामुळे आधीच  जगभरात चढे असणारे खाद्यपदार्थाचे दर अजूनच वाढतील, असी भिती हे देश व्यक्त करत आहेत.
    भारत एकेकाळी स्वतःच्या देशातील नागरीकांची भुक भागवण्यासाठी अमेरीकेपुढे कटोरा पुढे करत गव्हाची भिक मागणारा देश आज जगातील अनेक देशांना गहु निर्यात करतोय. त्याकाळी अमेरीकेत नित्कृष्ट समजल्या जाणाऱ्या आणि प्राण्यांना खाउ घातला जाणारा गहु अर्थात मिलो गहु अमेरीका अत्यंत तोऱ्यात आपणास
अपमानास्पद अस्या अटी  घालून अमेरीका  देयची. आज तोच भारत जगात ताठ मानेने गहु निर्यात करतोय. भिकारी ते मोठा निर्यातदार हा भारताच्या गव्हाबाबतचा प्रवास खरोखरीच थक्क करणारा आहे. यासाठी भारताचे सर्व पंतप्रधान आणि सर्व खासदार,शासकीय यंत्रणेतील लोक, कृषी शास्त्रज्ञ यांचे मोठे योगदान आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तेव्हढे कौतूक कमीच आहे. या प्रक्रीयेत सहभागी असणारे सर्वच लोक अभिनंदनास पात्र आहेत . आपण जेव्हा अमेरीकेकडुन गहु आयात करायचो तेव्हा त्यांनी एका त्रासदायक गवताचे बिजसुद्धा त्याबरोबर पाठवले.ज्या बिजाने आज सर्व भारताला त्रस्त केले आहे. देशाची जमिन नापिक करणाऱ्या या गवताला आज आपण काँंग्रेस गवत म्हणून ओळखतो.
रशिया आणि युक्रेन हे जगातील मोठे गहु उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. ज्यांच्यात सध्या युद्ध सुरु असल्याने जगातील गव्हाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे सर्व जगाचे लक्ष भारताकडे होते. भारताने सुद्धा ही संधी हेरत, आम्ही जगाचे पोट भरु, असे आश्वासन जगाला दिले होते. मात्र बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने उत्पादन खुप कमी आले.परीणामी देशांतर्गत गरजेला प्राधान्य देत भारताने गव्हाला निर्यातबंदी केली. ज्याचा संतप्त प्रतिक्रिया जगभरात उमटत आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या व्यापार विषयक तरतूदींचा भंग भारत करत असल्याची, तसेच हे भारताचे वर्तन पुर्णतः आयोग्य असल्याची प्रतिक्रिया हे देश व्यक्त करत आहे. निर्यात करणार नसल्याने जागतिक बाजारात गव्हाचा तूटवडा निर्माण होवून भाव वधारले आहेत. जी7 देश गहु निर्यातबंदी यावरुन भारतावर रोष व्यक्त करत असताना चीनने मात्र भारताची ही कृती योग्य असल्याचे सांगितले आहे. 
       भारताने या बाबत निर्णय जाहीर करताना या पुढे भारत कोणत्याही प्रकारचा निर्यातीचा करार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र या आधी करण्यात आलेल्या  करारानुसार देय असलेल्या आणि निर्यातीसंदर्भात विविध टप्यावर असलेल्या गव्हाची निर्यात भारत करणार असणार असल्याचे सुद्धा भारताने स्पष्ट केले आहे. भारत यापुढे ज्या देशात भिषण अन्न संकट उभे ठाकले आहे, अस्या देशानांच , आणि शेजारील देशांनाच मदत करणार असल्याचे भारताने जाहिर केले आहे. भारत यापुढे देशातील नागरीकांना सर्वोच्च प्राध्यान देणार आहे  फुड
कार्पोरेशन आँफ इंडियाच्या माहितीनुसार गेल्या 5 वर्षातील निच्चांकी उत्पादन या वर्षी झाले आहेत. फुड कार्पोरेशन आँफ इंडियाकडे साठवण्यात आलेल्या अन्नधान्यातूनच सरकारच्या विविध स्किम चालवण्यात येतात.सन 2004/2005मध्ये गहु निर्यातीवर बंदी न घातल्याने देशात संकट उभे ठाकले होते. त्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. तसेच भारताचे काहीसे वादग्रस्त कृषी कायदे रद्द केल्यानेच सरकार हे पाउल उचलू शकले.सध्या जगभरात गव्हाला मिळणारा दर बघता भारतातील बहुतांशी गहु निर्यात झाला असता, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळून त्यांचा फायदाच झाला असता,जो आता मिळणार नाही, परीणामी शेतकरी अडचणीतच येणार. सध्या रुपया घसरत असल्याने निर्यातीस अत्यंत अनकुल स्थिती आहे. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना घेता आला नाही, असे याबाबत विरोध करणाऱ्या समुहाचे म्हणणे आहे .
एकेकाळी गव्हासाठी अमेरीकेच्या दारात उभा असणारा भारत आज त्याच गव्हासाठी अमेरिका आणि मित्र देशांच्या डोळ्यात डोळा घालून ताठ मानेने उभा आहे. ही गोष्ट खरोखरच अभिनंदनास पात्र आहे , हे मात्र खरोखरीच अभिननदनास पात्र आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?