मैत्रीत दुरावा ?

     

   चीन हा पाकिस्तानचा सर्ववकालिक मित्र असल्याचा पुनरुच्चार पाकिस्तानी राजकर्त्यांकडून नेहमी केला जातो पाकिस्तानने भारताविरोधात संयुक्त राष्ट्रसंघासह अनेक जागतिक व्यासपीठावर जी गरळ ओकतो त्यास चीन नेहमी संमतीच देतो .चीन नेहमी पाकिस्तानची नेहमीच पाठराखण करतो पाकिस्तानला नेहमीच मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करतो सिल्क रूट या नावाने प्रसिद्ध असलेल्या जुन्या काळातील व्यापाराच्या खुष्कीच्या मार्गाचे पुनराजीवन करण्याचा चीनचा प्रयत्न सुरु आहे ज्या अंतर्गत पाकिस्तानमध्ये विविध स्वरूपाच्या मूलभूत स्वरूपाच्या सोईसुविधा उभारल्या जात आहेत ज्यास चायना पाकिस्तान एकॉमोनिक कॉरिडॉर या नावाने ओळखतो हे बघितल्यास आपणस जुना हिंदी चित्रपट शोलेमधील जय वीरू सारखी चीन आणि पाकिस्तान यांचीमैत्री असल्याचे आपणस वाटते मात्र दिसते तसे नसते या मराठी म्हणीप्रमाणे दोन्ही देशांच्या मैत्रीत सध्या काहीसा दुरावा निर्माण झाला आहे असे या संदर्भात आलेल्या दोन बातम्यातून स्पष्ट होत आहे    
   चायना पाकिस्तान एकॉमोनिक कॉरिडॉरच्या उभारणीसाठी पाकिस्तानात  कार्यरत  असंलेल्या चिनी नागरिकाच्या सुरक्षेसाठी चिनी सरकारने पाकिस्तानमध्ये लष्करी चौक्या उभारण्याची मागणी केल्याचे वृत्त अनेक  अंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये आले आहे चिनी नागरिकांवर पाकिस्तानमध्ये सातत्याने हल्ले होत असल्याने हे करत असल्याचे सांगण्यात येत आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी  चिनी राष्ट्राध्यक्ष  शी जिनपिंग यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्यावर चीनकडून ही मागणी करण्यात आल्याचे या बातमीत च्या बातमीत सांगण्यात आले आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान सात्यत्याने अमेरिका विरोधी वक्तव्ये करत असतात . त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अमेरिका मागणी करत असताना देखील अमेरिकेला पाकिस्तानात लष्करी तळ 
उभारण्यास परवानगी दिली नव्हती सध्या देखील पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंध फारसे सलोख्याचे नाहीत त्यामुळे पाकिस्तानला मदत फक्त चीनच करू शकतो त्यामुळे चीनच्या मागणीला पाकिस्तान कसा प्रतिसाद देतो हे बघणे आवश्यक आहे 
      लष्करी चौक्या या लष्करी तळाचेच छोटे स्वरूप असते  चीन मानवी हक्काची पायमल्ली करत   दरवषी  आपल्या हजारो नागरिकांना यमसदनास पाठवत असतो ते बघता पाकिस्तानात वर्षाला १० /१५ नागरिक मृत्युमुखी पडल्यावर चीन पाकिस्तानात लष्करी चौक्या का उभारत आहे ? असा प्रश्न जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे, काही तज्ज्ञांच्या मते चीन यासाठी आधीपासूनच तयारी करत होता सध्या चिनी नागरिकांवर होणारे हल्ले हे तात्पुरते कारण आहे  पाकिस्तानचे लाहोर रावळपिंडी , सियालकोट आदी अनेक महत्त्वाची शहरे  भारत पाकिस्तान सीमेपासून हाकेच्या अंतरावर आहेत त्या ठिकाणी चीनच्या लष्करच्या चौक्या होणे भारताला परवडणारे नाही 
 या बरोबरच चीनचे दोन हजार वर्षांपूर्वीचे  तत्त्वज्ञ कफुशियास यांचे तत्वज्ञान शिकवणारे शिक्षक आम्ही चीनमध्ये माघारी बोलवत आहे असे चीनने जाहीर केले आहे १९४८ साली चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाल्यानंतर चीनबाबत सकारत्मक प्रतिक्रिया तयार व्हावी यासाठी सरकारतर्फे कफुशियास यांचे तत्वज्ञान शिकवणाऱ्या या संस्थेची निर्मिती करण्यात आली आपल्या भारतातील मुंबई , चेन्नई नवी दिल्ली , कोलकात्तासह. जगभरात विविध ठिकाणी  ही केंद्रे आहेत या केंद्रासाठी चीन सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करत असते. अमेरिकेसह अनेक देशात ही केंद्रे चिनी संस्कृतीची माहिती देण्याबरोबरच चिनी राजकीय विचारधारा यात शिकणाऱ्याच्या मनात  उतरवण्याचा प्रयत्न करतात असा  आरोप करण्यात आला होता चिनी राजकीय विचारधारणेस अनुकूल मते तयार केल्यामुळे त्या
देशातील ही व्यक्ती पुढीआयुष्यात चीनविषयी मृदू भूमिका घेईल असा कयास बांधण्यात येत आहे  त्यामुळे चीनतर्फे या केंद्रातील शिक्षकांची संख्या कमी करण्याचा अर्थ म्हणजे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत आंही अशा अप्रत्यक्ष इशारा चीनने पाकिस्तानला दिला असल्याचे या क्षेत्रातील माहितगारांचे मत आहे जे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे 
एकंदरीतच चीन पाकिस्तान संबंध एका नव्या भारताला काहिस्या अनुकूल ठरतील अश्या वळणावर गेल्याचे या घडामोडीतून दिसून येत आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?