पाकिस्तान एकाचवेळी दोन ध्रुवांवर

   .

पुरेसा परकीय चलनसाठा नसल्याने महाग आरामदायी विविध ३८ वस्तूंच्या आयातीवर पाकिस्तानने बंदी घातली असताना,  पाकिस्तानच्या ऑल वेदर फ्रेंड चीनने ब्राझील रशिया इंडिया , चीन आणि साऊथ आफ्रिका या देशाची संघटना असलेल्या BRICS या संघटनेत पूर्णवेळ सदस्य म्हणून समाविष्ट करून घेण्यात यावे अशी मागणी केल्याने भारताच्या शेजारील पाकिस्तान सध्या एकाचवेळी दोन ध्रुवांवर असल्याचे दिसत आहे 
        पाकिस्तानची आयात कमी होऊन निर्यात वाढावी,  ज्यामुळे पाकिस्तानच्या परकीय गांजाजळीत वाढ होईल.   ज्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात आगामी २ ते ३ वर्षात पाकिस्तानला चुकवायचा कर्जासाठी परकीय चलनाचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो,  असा पाकिस्तानी सरकारचा अंदाज आहे .पाकिस्तानचे अर्थमंत्री नुकतेच सौदी अरेबिया आणि युनाटेड अरब अमिराती या देशांकडे मदतीची याचना करण्यासाठी गेले असता त्यांना जवळपास रिकाम्या हाताने परत यावे लागले.  डोकयावर असलेले कर्ज फेडण्यासाठी आंतराष्ट्रीय नाणेनिधीची मदत घेयची असल्यास,  पाकिस्ताने स्वतःच्या देशातील आयात कमी कारवी अशी अट आंतराष्ट्रीय नाणेनिधीने घातली आहे .दिवसोंदिवस पाकिस्तानी रुपया घसरण्याचे विक्रम स्थापन करत आहे  हा मजकूर लिहीत असताना,  पाकिस्तनी रुपया एक डॉलर बरोबर २०० पाकिस्तानी रुपया इतका घसरला आहे.  देशाची आर्थिक स्थिती बघता देशातील नागरिकांचा रोष स्वीकारत अनेक सबसिडी बंद करणे नैसर्गिक इंधनाच्या किमती वाढवणे हे उपाय करू शकते . मात्र यामुळे जेमतेम दीड वर्षावर आलेल्या सार्वत्रिक निवडणूकित त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते ते टाळण्यासाठी ते मुदतपूर्व निवडणुका घेऊ शकतात .   ज्यामुळे पाकिस्तानच्या नागरिकांच्या त्रासात वाढच होईल हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे  

मात्र बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने  सध्या संबंध काहीसा दुरावला चीन यावेळी  पाकिस्तानच्या मदतीला आला आहे चीनने , पाकिस्तानला  BRICS या संघटनेत पूर्णवेळ सदस्य म्हणून समाविष्ट करून घेण्यात यावे अशी मागणी केली आहे . या संघटनेत काही उभरत्या अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांना समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी केली ज्यामध्ये पाकिस्तान बांगलादेश , इंडोनेशिया यासह काही देशांचा समावेश आहे . उभरत्या अर्थव्यस्थेचा विविध व्याख्या जगभरात करण्यात येतात त्यातील एका व्याख्येनुसार दुसऱ्या देशासाठी बाजरपेठ म्हणून त्या देशातील अर्थव्यवस्था किती अनुकूल आहेत याब;वर ती अर्तव्यवस्था उभारती अर्थव्यवस्था आहे की नाही हे बघितले वाजते या निकषांवर पाकिस्तानी अर्थव्यवस्था पूर्णपणे योग्य ठरते तसेच जगाने अद्याप मान्यता दिलेली नसली तरी पाकिस्तानच्या सरकारने जाहीर केल्यानुसार त्यांच्या देशांची अर्थव्यवस्था गेल्या आर्थिक वर्षात ६ % वाढली या निकषानुसार ते आपला दावा बळकट करू शकतात 
आजमितीस एससीओ या अद्याक्षरानी ओळखल्या जाणाऱ्या    शांघाय  कोऑपरेशन या संघटनेत भारत  चीन आणि पाकिस्तान यांच्यासह पूर्णवेळ सदस्य आहेही संघटना चीनच्या प्रभावाखालील आर्थिक विकासाठी प्रयत्नशील असणारी संघटना आहे एका संघटनेत चीन आणि पाकिस्तान हे दोन प्रमुख शत्रू असताना भारत BRICS या संघटनेत पाकिस्तानच्या समवेशला विरोध करणाराच हे सांगायला कोण्या ज्योतिष्याची गरज नाही मात्र चीनने हि फक्त मागणी केली आहे हे आपण लक्षात घेयला हवे अद्याप या प्रस्तावर काहीही कार्यवाही झालेली नाही हे आपण लक्षात घेणे अत्यावश्यक आहे 
एकंदरीत येणारे काही दिवस पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत हेच यातून सिद्ध होत आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?