आयुष्य समृद्ध करणारी बुद्धिबळ स्पर्धा


        
     मागील महिन्यात अर्थात एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यात नाशिक महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जलद आणि अति जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या शिवधनुष्यासमान असणाऱ्या स्पर्धेच्या आयोजनात खारीचा वाटा माझ्या देखील होता.  मला या स्पर्धेच्या आयोजनतेतील सहभागाने खूप काही शिकवले . लोकांचे वेगवेगळे अनुभव . एखादा मोठा सोहळा आयोजित करताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात . त्यावर डोकयावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून यशस्वीपणे मात कशी करायची याचे प्रात्यक्षिकासह शिक्षण मला या स्पर्धेच्या आयोजनातील सहभागामुळे कोणताही खर्च न करता मोफत मिळाले  नाशिकरोड येथील महाराष्ट इव्हायर्मेंट इंजिनीरिंग ट्रेनींग आणि रिसर्च अकेडमीच्या (मित्रा) प्रांगणात झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे एका शब्दात वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास 
आयुष्य समृद्ध करणारी बुद्धिबळ स्पर्धा असेच करावे लागेल 
      व्यवस्थापनाच्या अनेक बाबींचे  प्रात्यक्षिक मला या वेळेस अनुभवायला मिळाले . जे बुद्धिबळाशी संबंधित असले तरी एक खेळाडूं म्हणून कधीच अनुभवायला मिळाले नसते . ज्यामध्ये खेळावयास आलेल्या खेळाडूंसाठी करावयाच्या खेळ साहित्याची जमवाजमव , त्यांची निगा राखणे .खेळाडूंकडून त्यांची तोडफोड तर होत नाहीना ?
याबाबत दक्षता घेणे . तसेच खेळाडूंना खेळावयास दिलेले घड्याळ   योग्य पद्धतीने कार्यरत आहे ना ? त्यात काही समस्या तर येणार नाहीना ? त्याची बॅटरी योग्य स्थितीत आहे ना ? जर दुर्दैवाने एखादे घड्याळ खेळ चालू असतानाच बंद पडले तर दुसरे घड्याळ देण्यासाठी तयार आहे ना ? याबाबतची सर्व माहिती मला प्रात्यक्षिकासह अनुभवयाला मिळाली जी कोणत्याही खेळात स्पर्धक म्हणून अनुभवयास मिळणे अवघड आहे 
           या खेरीज कोणत्याही आयोजन प्रसंगी पडणारे अनेक अनुभव या स्पर्धेदरम्यान मला अनुभवायास मिळाले .जसे देशभरातून राहावयास येणाऱ्या खेळाडूंची राहण्याची आणि जेवणाची  योग्य ती व्यवस्था करणे ही व्यवस्था बघतना निव्वळ परमार्थ न बघता संघटनेचे हित देखील कसे जोपासता येईल ? याचा विचार करणे . स्पर्धा आयोजनासाठी लागणाऱ्या आर्थिक निधीची तरतूद करणे तसेच एखादे आयोजन यशस्वी करण्यात पारंपरिक माध्यमे आणि सोशल मीडिया कोणत्या प्रकारे साह्य करतात तसेच अडथळे आणू शकतात याचे फार मोठे धडे यावेळी मला मिळाले स्पर्धा झाली त्यावेळी राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याने माध्यमांच्या आमच्या स्पर्धेला महत्व देण्याऐवजी राजकीय घडमोडणीना अधिक महत्व देण्याच्या स्वाभावामुळे भारतीय खेळात का मागे पडतात ?याची पुन्हा एकदा शिकवणं मला या स्पर्धेमुळे मिळाली 
     या खेरीज अनेकदा आपल्याकड़े खेळातील करियर म्हणजे एकतर स्वतः खेळाडू किंवा प्रशिक्षक याच दोन गोष्टींचा समावेश करण्यात येतो मात्र एखाद्या खेळात पंचगिरी करणे हे सुद्धा खेळातील उत्तम करियर म्हणून बघता
येऊ शकते हे मला या स्पर्धा आयोजनात नव्याने कळले 
एकंदरीत ७ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत नाशिकरोड येथील महाराष्ट इव्हायर्मेंट इंजिनीरिंग ट्रेनींग आणि रिसर्च अकेडमीच्या ९मित्रा) प्रांगणात झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या आयोजनात भाग घेणे मला खूप काही शिकवून गेले 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?