भारत ऑस्ट्रेलिया संबंध नव्या वळणावर

       


    भारत ऑस्ट्रेलिया संबंध नव्या वळणावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि  यास कारणीभूत ठरली आहे,  २१ मे रोजी तेथील लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर ऑस्ट्रेलिया देशात झालेले सत्तांतर . २१ मे रोजी झालेल्या निवडणुकीच्या निकाल अपेक्षेप्रमाणे लिबरल आणि समविचारी पक्षांच्या विरोधात लागला. विविध मतदान पूर्वकल चाचण्यांद्वारे हि गोष्ट दिसून येत होतीच जिच्यावर २१ मे रोजी झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाने शिक्कामोर्तब केले . ज्यामुळे स्कॉटमॉरिशन यांची सलग तीन लोकसभा जिंकण्याचा घोड दौडीला विराम लागला ऑस्ट्रेलियाच्या लोकसभेची मुदत ३ वर्षे असते या हिशोबाने ९ वर्षानांतर स्कॉट मॉरिशन पंतप्रधानाची खुर्ची सोडतील स्कॉट मॉरिशन यांची जागा घेतील लेबर पक्षातील अति डावे समजले जाणारे अँथनी अल्बानीजऑस्टेलियाच्या लोकसभेत ७३ जागा लेबर पक्षाने जिंकल्या आहेत  बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या ७६ जागांसाठी अन्य पक्षाकडून ३ जगाचा  पाठिंबा घेत ऑस्ट्रेलिया या देशाचे ३१ वे पंतप्रधान अँथनी अल्बानीज  यांनी मंगळवार २३ मे रोजी  मंगळवार  पदाची शपथ घेतली आहे  जेव्हा नव्या ऑस्ट्रेलियन पंतप्रधानाने शपथ घेतली तेव्हा आपल्याकडे सोमवारच्या रात्रीचे सुमारे ९ वाजले होते  मात्र ऑस्ट्रलियाच्या पूर्व किनाऱ्यावर मंगळवारची सकाळ झाली होती असो 

अँथनी अल्बानीज हे निर्वासितांच्या प्रश्नाबाबत मानवतावादी भूमिका घेण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहेत  अनेक भारतीय ऑस्टेलिया या देशात राहत आहेत त्या पार्श्वभूमीवर भारतीयांच्या प्रश्नाबाबत त्यांच्याकडून भरीव कार्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे यापूर्वी विविध भारतीय उदयॊगपतींबरोबरचे त्यांचे फोटो विशेष चर्चेत आले होते . त्यांच्याच पक्षाचे सरकार न्यू साऊथ वेल्स या प्रातांत असतांना भारतीय उदयॊगसमूह अदानी  यास कोळशाचे कंत्राट राज्य सरकारकडून मिळाले होते मात्र याआधी जेव्हा लेबर पक्षाचे  सरकार होते तेव्हा २००० ते २००९ या दरम्यान  तेव्हा भारताला युनेनियमचा पुरवठा करणे भारतीय नागरिकांवर वंशद्वेषाच्या रागातून हल्ला करणे 

यासारख्या घटनांमुळे भारत ऑस्ट्रेलियाया या देशातील संबंध काहीसे दुरावले होते  या काळात ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे मंत्रिमंडळात विविध जवाबदाऱ्या सांभाळत होते हे नाकरता येणार नाही मात्र त्यावरून त्यांच्या भविष्यातील कमगिरीविषयी पूर्वग्रहतयार करणे देखील चुकीचे आहे त्यांची भारताविषयीची  मते खूपशी भारताला अनुकूल अशी आहेत त्यांची भारतविषयक भूमिका त्यांनी मागच्या सरकारच्या काळात अनेकदा व्यक्त केली आहे जी भारताला पूरक अशी आहे याचा देखील विचार त्यांच्या  भविष्यातील कामगिरी कशी असेल याबाबत आखाडे बांधताना करणे अत्यावश्यक आहे 

.सध्या ऑस्ट्रेलिया या देशाबरोबर  भारताचे संबंध अत्यंत उत्तम स्थितीत आहेत परस्परांच्या विकासाचे अनेक प्रक्लप सध्या विविध स्तरावर कार्यान्वित झाले आहेत भविष्यात देखील अनेक प्रकल्प सुरु कारण्याबात बोलणी सुरु आहेत या २०२२ वर्षाच्या सुरवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यावेळचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिशन यांच्यात झालेल्या ऑनलाईन संवादात अनेक नवीन प्रकल्पचि घोषणा करण्यात आली  होती सध्याच्या जागतिक राजकारणाचा विचार करता देशात पूर्णतः विरोधी पक्षाचे सरकार आले तरी देशाची परराष्ट्रनीती पूर्णतः बदलत नाही तिच्यात जास्तीत जास्त ३ ते ४ टक्याचा फरक होतो त्या पार्श्वगावभूमीवर आपण या सत्तांतारकडे बघायला हवे   तसेच सध्याचे ऑस्ट्रलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे भारताला अनुकूल भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे संबंध दुरावण्याची शक्यता कमीच आहे तर संबंध अधिक मैत्रीपूर्ण होण्याचीच शक्यता आहे मात्र जगातील स्तरावर कोणच कोणाचा कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो १९६२ च्या चीनच्या युद्धात मदत न करणाऱ्या सेव्हिंयत सोशालिस्ट रशियाने १९७१ च्या बांगलादेश युद्धात केलेली मदत कोण नाक्रारेल किंवा त्यावेळी भारताच्या विरोधातील अमेरिका मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात आण्विक करारासाठी जागतिक स्तरावर कशी भांडली ? हे अभ्यासल्यास आपणस हि गोष्ट आपणस सहज लक्षात येते  मात्र पुढील ३ वर्षासनसाठी का होईना भारत ऑस्ट्रलिया संबंध मधुर राहणार अशी अशा ठेवण्यास हरकत नसावी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?