तिने बघितले आहेत ५०० कृष्णविवराचे जन्म

   

 आर्थिक ताकदीमुळे आगामी भविष्यकाळात जगाचे आशास्थान म्हणून ओळखला जाणारा भारत विज्ञान क्षेत्रात त्यातही खगोलशात्रात मोठी दमदार आशादायक वाटचाल करत आहे   आपण दिवाळीत उडवतो त्या प्रकारचे मात्र त्या पेक्षा काहीसे मोठे रॉकेटची  सायकलद्वारे  वाहतूक करत  सुरवात झालेल्या भारतीय अवकाश संस्थेकडून  अर्थात इसरो कडून सध्या येणाऱ्या बातम्यांनी हीच गोष्ट सिद्ध होत आहे . नुकतीच इसरोची एक सहयोगी संस्था असलेल्या पुण्याच्या  इंटर  युनिव्हरसिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी (आयुका )  च्या मार्फत कृष्णविवरासंबंधी एका आपल्या समस्त भारतीयांना गौरवास्पद वाटेल अशी घोषणा करण्यात आली . त्यांनी सन २०१५ पासून राबवण्यात येणाऱ्या अॅस्ट्रोसॅट या प्रकल्पांतर्गत ५०० व्या कृष्णविवराच्या जन्म झाल्याचे संकेत टिपले आहेत 
     कृषिविवर ही ताऱ्याच्या मृत्यूची अशी एका अवस्था आहे की ज्यामध्ये ताऱ्यातून त्यांच्या प्रचंड अश्या गुरुत्वाकर्षणामुळे सेकंदाला ३ लाख किंलोमीटर या वेगाने प्रवास करणारा प्रकाश किरण देखील त्यातून बाहेर पडत नाही . आपण पृथ्वीवर उभे राहून सेकंदाला १३ किलोमीटर या वेगानेएखादा दगड वॉर आकाशयात भिरकावला अंतर तो आपल्या पृथ्वीवरून बाहेर पडून अवकाश्यात जाऊ शकतो यावरून आपणास प्रकाश सुद्धा बाहेर पडून शकत नाही म्हणजे काय गुरुत्वाकर्षण असेल याचा अंदाज बांधता येतो प्रकाश हि सध्या मानवास माहिती असणाऱ्या  गोष्टींमध्येय सार्वधिक वेगाने जाणारी गोष्ट आहे . (काही अवकाशीय कण या पेक्षा जास्त वेगाने जाऊ शकतात असा शाश्त्रज्ञाचा अंदाज आहे मात्र त्याबाबत खात्रीसार माहिती अद्याप शास्त्रज्ञांना मिळालेली नाही ) आपल्या सूर्याच्या वस्तुमानाच्या सुमारे १ पूर्णांक चार इतके वस्तुमान असणाऱ्या ताऱ्यांचे कृष्णविवर होऊ शकते असे भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक( ब्रेन डेड मुर्दाबाद )  डॉक्टर चंदशेखर यांनी सांगितले आहे 
               
कृषिविवर विविध प्रकारे तयार होऊ शकते त्यापकी  तयार होण्याचा  एक मार्ग म्हणजे गॅमा रे बर्स्ट.या स्फोटांमध्ये प्रचंड ताऱ्यांचा मृत्यू इतका शक्तिशाली असतो की त्यामुळे  संपूर्ण विश्वात अतिशय वेगाने
अतिशय तीव्र स्वरूपाची अतिनील किरणे पाठवली 
जातात  (हि किरणे तयार होण्याचा आणखी एक मार्ग तयार करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे दोन न्यूट्रॉन ताऱ्यांची टक्कर ) . गुरुत्वीय लहरी निर्माण करणाऱ्या घटना. स्फोट आणि कृष्णविवराची निर्मिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ अशा स्फोटांमधून गॅमा-किरण आणि क्ष-किरणांचा अभ्यास करतात.त्याच प्रकारचा अभयस इसरॉकडून अॅस्ट्रोसॅट या प्रकल्पात केला जातो 
अॅस्ट्रोसॅट ही जगातील सर्वात संवेदनशील अंतराळ दुर्बिणींपैकी एक आहे ज्यामध्ये पाच उपकरणे आहेत जी एकाच वेळी अल्ट्राव्हायोलेटऑप्टिकल आणि एक्सरे  रेडिएशनमध्ये विश्वाचा अभ्यास करू शकतात.या उपकरणांपैकी एक म्हणजे कॅडमियम झिंक टेलुराइड इमेजर (CZTI)  ज्याने नुकतेच पाचशेव्यांदा ब्लॅक होलचा जन्म पाहिला आहेअसे इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA) ने  प्रसिद्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
भारतासारख्या विज्ञानाला अर्थसंकल्पात दिली ना तुला तरतूद,  किती दिली? याला महत्व नाही . देण्यास महत्व आहे या प्रकारचा सवतासुभा करणाऱ्या देशातील संशोधकांनी मिळवलेले हे यश खरोखरीच अभिनंदनास्पद आहेआपले शास्त्रज्ञ अत्यंत कमी पैशात खूप मोलाचे कार्य करत आहे नासा आणि इतर परदेशी संस्था जेव्हा खूप मोठं मोठे शोध लावल्याचे आपण बघतो तेव्हा ते खगोल संशॊधांवर किती किती खर्च करतात आपण किती करतो ? याचा विचार करता आपण खूप मोठी झेप घेत असल्याचे सहज दिसून येईल . मात्र पूर्वी इतके चित्र वाईट नाही सध्या विज्ञानाच्या संशोधनास आपल्याकडे पूर्वीपेक्षा अधिक निधी मिळतो ही वाढ अशीच राहिल्यास आपणही नासाच्या तोडीस तोड संशोधन करू हि काळ्या दगडावरील रेघ आहे हे सूर्य पूर्वेला उगवतो इतकेच खरे ठरेल यात शंका नसावी  . 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?