अस्थिरतेच्या चक्रव्युहात पाकिस्तान

   

भारताबरोबर सीमा शेअर करणाऱ्या देशांचा विचार केला असता, भुतान वगळता सर्वत्र लोकशाहीचा नावाने खोळखंडोबा झाल्याचेच दिसून येत आहे. आपल्या बरोबर स्वातंत्र्य मिळालेल्या पाकिस्तानात छर जन्मापासूनच लोकशाहीचा खेळखंडोबा सुरु आहे. जो आज2022 साली देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मे2022 जेव्हा मी हा लेख लिहीत आहे तेव्हा पाकिस्तानात दोन महिन्यापुर्वीच सत्तेतून पायउतार झाल्याने प्रमुख विरोधी पक्ष झालेल्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षातर्फे देशात नव्या निवडणूका घेण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी मोठे आंदोलन सुरु आहे.पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी 26 मे रोजी तेथील सरकारला 6 दिवसात नव्या निवडणूकांची घोषणा करावी, अन्यथा होणाऱ्या परीणामाला तेच जवाबदार असतील असा इशारा दिला आहे.
    पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादच्या बाहेर मुख्यतः पेशावर येथून आंदोलक राजधानीत येवू नये यासाठी रस्त्यावर मोठ मोठे कंटेनर, वाहतूकीला अडथळा निर्माण होईल अस्या पद्धतीने गाड्या लावून मार्ग अडवण्यात आला.  रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात सैन्य तसेच पोलीस फौजफाटा तैन्यात करण्यात
आला.ज्यांनी शांतपणे जाणाऱ्या आंदोलकांवर अश्रूधूराच्या असंख्य नळकांड्या फोडल्या. महिला ज्येष्ठ नागरीक लहान मुले मुली कस्याचाच विचार न करता लाठीचार्ज केला.रबरी गोळ्यांचा आंदोलकांवर अक्षरशः पाउस पाडला. मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करत प्रसंगी हेलिकॉप्टरचा वापर करत इम्रान खान इस्लामाबाद येथील महत्तवाचा चौकात पोहोचले.तिथे  पाकिस्तानी सर्वौच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करत आणि विरोधकांकडून आलेल्या सुचनांचा मान राखत इम्रान खान यांनी मोठी सभा घेतली.आणि सरकारला सहा दिवसात निवडणूका जाहिर करण्याचा इशारा दिला. आंदोलकांनी विविध अडथळे दूर करत इस्लामाबादकडे आगेकुच केली.ज्यामुळे मोठ्या प्रमाणात इस्लामाबाद येथे पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे कार्यकर्ते जमले.या कार्यकर्त्यांचा मनात मोठे आंदोलन करण्यास संधी मिळेल, असी आशा होती.मात्र आंदोलन स्थगित झाल्याने कार्यकर्ते निराश होवून थोडीसी आडळ आपट करत आपल्या गावाकडे जात असल्याचे सध्याचे इस्लामाबाद येथील चित्र आहे.
आंदोलकांवर काहीही अत्याचार करणार नाही, असा सत्ताधिकारी वर्गाकडून देण्यात आलेल्या वचनाचा भंग झाल्याने याचे मोठे पडसाद आगामी काळात उमटतील असे व्हिआँन न्युजच्या बातमीत म्हटले आहे. जरी हा पाकिस्तानमधील अंतर्गत सत्तासंघर्ष असला तरी भारतावर याचे मोठे परीणाम होवू शकतात. जरी अद्याप लष्कराने यात हस्तक्षेप केलेला नसला ,आतापर्यंत लष्कराची भुमिका हा  राजकारणी लोकांंचा अंतर्गत प्रश्न आहे. लष्कर त्यात हस्तक्षेप करणार नाही, असी असली तरी लष्कर कधीही ती बदलून सत्ता ताब्यात घेवू शकते.जर पाकिस्तानात लष्करी राजवट आल्यास काश्मीरमधील शांततेस अडथळा निर्माण होण्याची शक्यता वाढते.
     आज महागाईमुळे तेथील जनता मेटाकुटीस आली आहे. एका बातमीनुसार पाकिस्तानला आगामी काळात देयचा कर्जाचा हप्ता सोडून राहिलेल्या परकीय चलनाद्वारे ते जेमतेम 2 महिने आयात करु शकतात. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात उर्जासंकट आहे.या उर्जासंकटामुळे पाकिस्तानच्या एकुण निर्यातीत जवळपास 40%वाटा उचलणारा कापड उद्योगसुद्धा  प्रचंड अडचणींचा सामाना करतोय.त्यात या राजकीय संकटामुळे भरच पडतेय. आपल्या भारतावरसुद्धा 1991जूलै मध्ये परकीय चलनसाठा संपण्याचे संकट आले होते.मात्र तेव्हा सर्व राजकीय पक्ष एकत्र आले होते.एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण खेळत नव्हते.आता जेव्हा पाकिस्तानवर हे संकट आले
आहे, तेव्हा याच उलट स्थिती आहे. दुष्कळात तेरावा महिना म्हणावे तर बलूचीस्तान या पाकिस्तानमधील उर्जा  संपन्न प्रांतातील फुटीरतावादी चळवळ सध्या जोरात आहे. ती पाकिस्तानात ठिकठिकाणी पाकिस्तानी , तसेच चीनी नागरीकांवर हल्ले करत आहे.चीनी नागरीकांवर होणाऱ्या हल्लांबाबत चीनने या आधीच पाकिस्तान सरकारकडे कडक शद्बात नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तान त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी युनायटेड अरब अमिरात, सौदी अरेबिया आदी देशांकडे हात पसरत आहे. मात्र त्यास तेथून फारसे काही हाती लागत नाहीये. अमेरीकेचा अफगाणिस्तानमधील रस संपल्याने तेथून देखील मदत मिळण्याचा मार्ग संपल्यातच जमा आहे.
एकंदरीत पाकिस्तान आणि सर्वसामान्य पाकिस्तानी नागरीक सध्या चोहोबाजूनी संकटात आहे. हे संकटे दुर होवून पाकिस्तानी नागरीकांना सुखाचे दिवस येण्यासाठी ही राजकीय अस्थिरता संपणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्याचे हाल कुत्रा देखील खाणार नाही, असे झाले तर आश्चर्य वाटायला नको.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?