काही अनुत्तरित प्रश्नाची पुन्हा आठवण

     

 रविवार २९ मे रोजी पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिदू मुसावाला यांची हत्या झाली ,पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर १० जणांना ताब्यात घेतले  या हल्ल्याची जावबदारी कॅनडा येथील गॅंगस्टार ग्लोडन  याने घेतली टोळीयुद्धाच्या बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे सिदू मुसावाला यांच्या शरीररावर ४० गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली या हत्येमुळे पंजाब पुन्हा एकदा अशांत झाल्याचे दिसून येत आहे पंजाबचा इतिहास बघता १९८४ च्या खलिस्तानवादी आदोलनंतर पंजाब हा अशांत होण्यास काही अंशी सुरवात झाली . १९८४ ला पेटलेला वणवा १९८९ च्या काळात टप्याटप्याने शांत झाला जो पुन्हा सुरु करण्यासाठीचे प्रयत्न होत असतात १९८९ नंतर पंजाबमध्ये प्रत्यक्ष चळवळ सुरु न करता अन्य विविध मार्गाने पंजाब अशांत करण्याचे प्रयत्न सुरु झाले ज्यामध्ये पंजाबमध्ये मादक पदार्थाची सवय लावणे पंजाबमध्ये गुन्हेगारीला वाढण्यास साह्य करणे आदी प्रकार सुरु झाले त्याचेच प्रत्यत्तर आपणस रविवार २९ मे रोजी दिसले असे म्हटल्यास वावगे ठरू नये . या खलिस्तान मोहिमेमुळे तेव्हापासून पंजाबमधील समाजजीवन पूर्णतः हलवले गेले जे  आजमितीस देखील पूर्णतः शांत झाले आहे असे समजणे चुकीचे ठरेल पंजाबचा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास बघता १९४७ ते १९८३ आणि १९८३ ते आजपावेतो असे दोन कालखंड आपणस दिसतात .पहिल्या कालखंडात पंजाब खुपसा शांत आढळतो तर दुसऱ्या कालखंडात पंजाब खुपंच अशांत झालेला दिसतो 
       खलिस्तान चळवळीचे  वस्तूनिष्ठ अध्ययन केल्यास असे लक्षात येते की पंजाबच्या स्थानिक राजकारणात एका पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्या वेळच्या कॉग्रेसने खेळलेल्या पण फसलेल्या चालीचे अपत्य म्हणजे म्हणजे खलीस्तान चळवळ ज्यामुळे भारताच्या एकात्मतेला मोठा धोका निर्माण झाला.  परिणामी एका शुर लढवय्या
समाजाच्या प्रार्थना समाजात लष्कर घुसवावे लागले ज्याची परिणीती महात्मा गांधीच्या हत्येनंतर ज्या प्रकारे एकासमाजाला लक्ष्य करण्यात आले त्याची पुनरावत्ती करण्यात झाली.  पंजाबचे भौगोलिक स्थान जर विचारात घेतले तर आपणास एक गोष्ट सहज लक्षात येते,  की पंजाब मधून सहजतेने काश्मीर मध्ये जाता येते काश्मीर ला लागून असणाऱ्या  हिमाचल प्रदेशातून काश्मीरमध्ये जाणे फारशे सोपे नाही.  आताआतापर्यत म्हणजे 2 ते 3 वर्षापूर्वीपर्यत तो प्रदेश वर्षातील 8 महीने बफाच्छादीत असल्याने त्याप्रदेशात जाता सुध्दा येत नव्हते.  आता त्या प्रदेशात थोड्या खालचा प्रदेशात बोगदा झाल्याने आता हा मार्ग वापरता येतो,  हा मार्ग जगातील सर्वात उंच गाडी रस्ता आहे.  तेथील हवेत प्राणवायुचे प्रमाण अत्यल्प आहे.  म्हणजेच तेथून काश्मीरचे नियंञण करणे अवघड आहे.  जर दुर्दैवाने पंजाब स्वतंञ्य झाले असते तर आपणास काश्मीर वर नियंञण ठेवणे अवघड झाले असते, आणि  आपण काश्मिरमधील दहशतवादी कारवायांचा आढावा घेतला तर आपणास असे लक्षात येते की,  पंजाब शांत होतो ना होतो काश्मीर पेटण्यास सुरवात झाली त्यामुळे आपण कितीही नाराज असलो तरी गांधी नेहरू घराण्यातील इंदिरा गांधी यांनी देश फुटण्यापासून वाचवला हे माञ नाकारून चालणार नाही
  शीख धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात झालेली लष्करी कारवाईत जरी जलसिंग भिंद्रवाले याची हत्या करण्यात आली तरी हा प्रश्न तिथे संपला नाही फक्त या संघर्षांचे लढण्याचे ठिकाण आणि लढण्याची रणनीती बदलली ज्याचे प्रत्यंतर आपणस २९ मे झालेल्या हत्येमधून दिसते त्यानंतर पंजाबमध्ये अमली पदार्थाचा मोठ्या प्रमाणात व्यापार सुरु झाला जयवर उडता पंजाब हा चित्रपट देखील येऊन गेला आहे तसेच पंजाबमधील या व्यसद्धित्तेवर अनेक माहितीपट देखील आले आहेत ज्या सर्वांमध्ये यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे पंजाबमधील अनधिकृत चोरटा शास्त्रात पुरवठा देखील या घटनेनंतर प्रचंड वाढला ज्यामुळे पंजाबमधील गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली ज्यामुळे पंजाबचे वातवरण पूर्णतः विस्कळीत झाले हे मात्र विसरता कामा नये 
     मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी झालेल्या हत्येचे धागेदोरे कॅनडा या देशात जोडले गेले आहेत आपल्या पपंजाबला देशापासून तोडण्याचे अनेक प्रयत्न आजदेखील कॅनडा देशात सुरु आहेत तेथील अनेक खासदारांची या विषयीची विधाने आपण यासाठी अभयसु शकतो शेतकऱ्यांचे आंदोलन चालू असताना देखील कॅनडातील खासदारांची मते भारताला काहीशी प्रतिकूल होती हेही आपणस आठवत असेल गायक सिदू मुसावाला याच्या हत्येचे धागेदोरे कॅनडा या देशात जातात . ते केवळ तिथे शीख धर्मियांची संख्या जास्त आहे म्हणून असे समजणे अयोग्य आहे 
पंजाबमधील शीख बांधवांचे आपल्या भारताच्या प्रगतीत सरंक्षणात मोठे योगदान आहे त्यामुळे तो शांत असणे आवश्यक आहे सध्या आपणस पंजाब अशांत होत असल्याची जी लक्षणे दिसत आहेत त्यावर योग्य ती कार्यवाही करून या किडीला वेळीच ठेवणे आवश्यक आहे यातच भारताचे हित आहे 

 , 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?