गर्वसे कहो हम भारतीय है

 

  गर्वसे कहो हम  भारतीय है  
हें वाक्य आपण अनेकदा बोलतो ऐकतो . आपल्या भारताच्या गौरवशाली परंपरा आणि आणि दैदिप्तमान कामगिरीच्या सम्मानार्थ हे वाक्य वापरतो नुकतीच घडलेली एक घटना हे वाक्य आपणस पुन्हा हे वाक्य पुन्हा एकदा म्हणण्याची संधी देत आहे  Chessable Masters online rapid chess tournament  बुद्भिबळाच्या सध्या सुरु असणाऱ्या स्पर्धेत १६ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर प्रग्यानंदयांनी विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याला पराभवाची चव  चाखायला लावणे हीच ती भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची घटना होय . या स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेरीस  २० मे  रोजी  त्यांनी हा भीम पराक्रम केला  आर प्रग्यानंद यांनी मॅग्नस कार्लसन याचा पराभव करण्याची ही  २०२२ या वर्षातील दुसरी वेळ   या आधी याच वर्षी २१ फेब्रुवारी रोजी   Airthings Masters.या स्पर्धेत  आठव्या फेरीत त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून विश्वविजते असणाऱ्या मॅग्नस कार्लसन याना पराभवाचे पाणी पाजायला भाग पडले. Tarrasch variation पद्धतीने खेळल्या गेलेल्या या डावात काळ्या मोहऱ्या घेऊन खेळताना आर  प्रग्यानंदयांनी यांनी प्रतिस्पर्धी विश्वविजेता मॅग्नस कार्लसर्न यांना १९ व्या चालीतच नमवले होते 
        त्यानंतर जेमतेम ३ महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा विश्वविजेते मॅग्नस कार्लसन यांना अस्मान दाखवूंन आपला तो विजय म्हणजे चान्गल्या नशिबामुळे लागलेली लॉटरी नसून आपला खेळ उत्तम आहे याचा स्पष्ट पुरावाच जगासमोर सादर केला आहे . भारत  येत्या काही काळात बुद्धिबळातील जागतिक महासत्ता होणार आहे ज्याचे नेतृत्व नाशिकरांचे आयकॉन सुपर ग्रँडमास्टर  विदित गुजराथी यांच्यासह आर  प्रग्यानंद हे करणार 
असल्याचे या विजयातून स्पष्ट होत आहे    गेल्या काही दिवसात भारतीय बुद्धिबळपटू जी चमकदार लक्षणीय कामगिरी करत आहेत त्यातून वारंवार ही गोष्ट सिद्ध होत आहे मात्र वैयक्तिक खेळ म्हंटले कि मैदानी खेळच असे वाटणाऱ्या माध्यमांनकडून फारसे लक्ष दिले जात नाही हे एक दुर्दैवच असो 
             आर  प्रग्यानंद  यांनी कालसं बरोबर खेळताना ४० व्या चालिला प्रतिस्पर्ध्याला गुडघे टेकायला भाग पडले तो पर्यंत डाव बरोबरीत सुटेल असा बुद्धिबळप्रेमींचा अंदाज होता मात्र या ४० व्य चालिला मॅग्नस कार्लसन यांनी शेवटच्या रांगेतून होणारे आक्रमण रोखण्यासाठी आपल्या घोड्याला अत्यंत चुकीच्या ठिकाणी ठेवले त्यांची ती घोडचूक होती या घोडचुकीनंतर त्यांनी लगेचच आपला पराभव मान्य केला . या विजयामुळे तीन गुणांच्या विजयासह, प्रग्नंधाने यांनी णांकन 12 गुण मिळवले आहेत तर  तर कार्लसन स्पर्धेच्या 2 व्या दिवशी चीनच्या वेई यीच्या मागे लीडरबोर्डवर दुसऱ्या स्थानावर आहेत 
 या विजयामुळे द्धीबरोबरच शारीरिक क्षमता जोखणाऱ्या (निरोगी शरीरातच निरोगी मन काम करते हा सुविचार प्रसिद्ध आहेच . जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या उत्तम स्थितीत नसला तर तुम्ही कुठेही लक्ष केंद्रित करू शकणार नाही आणि त्यासाठी इतर खेळाइतकीच शाररिक तंदरुस्ती बुद्धिबळासाठी आवश्यक आहे )  बुद्धिबळाच्या क्षेत्रात सुद्धा भारतीय कुठे कमी नाही हेच या विजयातून दिसून येत आहे . भारतीयांनी भारतात शोधलेल्या गेलेल्या या खेळात (बॅडमिंटन हा खेळ जरी पुण्यात शोधला गेलेला असला तरी त्याचे शोधकर्ते ब्रिटिश होते) भारतीय अव्वल स्थानी पोहोचत आहे हि आपल्या सर्व भारतीयांसाठी गर्वसे काहो हम भारतीय है हे म्हणायला लावण्यासारखीच स्थिती तर आहे  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?