अस्मितांच्या प्रश्नाऐवजी या जीवघेण्या प्रश्नाकडे कधी बघणार आपण ?


 सध्या समाजजीवनाकडे नजर टाकल्यास अनेक अस्मितांचे प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे . काही शतके पूर्वी घडलेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी साध्य मोठ्या प्रमाणात मोहिमा राबवल्या जात आहे विविध अस्मिता  मानवास जगताना आनंद देत असल्यातरी निव्वळ अस्मितांवर जगता येणे अशक्य आहे . मानवास रोजच्या जगण्यात अस्मितांबरोबर अनेक भौतिक घटकांची देखील गरज असते यातील अनेक घटक निसर्गावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या अवलूंबून असतात . निसार्गातील चांगल्या वाईट घटनांचा या भोतिक घटकांचे प्रमाण कमी जास्त होण्यात होतो . सध्याच्या निसर्गाच्या लहरीपणा वाढला असताना याचा खूपच मोठ्या प्रमाणात मानवी आयुष्यावर परिणाम होत आहे या प्रश्नाबाबत मात्र हवी तेव्हढी चर्चा भारतात होताना दिसत नाही . जर्मनी सारख्या देशात केंद्रीय सत्तेच्या राजकारणात हवामान बदल  चर्चेत येऊन खूप काळ लोटला आता तेथील राज्याच्या निवडणुकीत हवामान बदलाच्या मुद्यावरून या मुद्यावरून सत्तांतरण होत आहे . आपल्याकडे राज्याच्या राजकारणात सोडा केंद्रीय राजकारणात देखील हा मुद्दा कोणी राजकीय नेत्याने घेतला आहे का ?

हा लेख लिहीत असताना ईशान्य भारतातील आसाम या राज्यात पडलेल्या पावसाने हाहाकार उडवला आहे काही लोकांचे प्राण गेले आहेत मालमत्तेचे प्रचंड प्रमाणत नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन काही प्रदेशाच्या अन्य जगाशी संपर्क तुटला आहे आसाम हे ईशान्य भारतातील प्रमुख राज्य आहे भारताच्या ईशान्य भारत

वगळता अन्य क्षेत्रातून  ईशान्य भारतातील इतर  कोणत्याही राज्यात जायचे असल्यास आपणास आसाम मधूनच जावे लागते असामामुळेच ती राज्ये भारताच्या मुख्य भूमीसी जोडलेली आहेत लोकसंख्येच्या विचार करता ईशान्य भारतातील सर्वाधिक लोकसंख्या आसाम मध्येच राहते  तसेच  भौतिक प्रगतीचा विचार करता ईशान्य भारतातील सर्वात प्रगत राज्य देखील आसामच आहे आणि त्याच राज्यात निर्सगाचे तांडव चालू आहे . देशाच्या सुरक्षेसाठी ईशान्य भारताचे महत्व अन्यन साधारण आहे . त्या पार्श्वभूमीवर आपण या घटनेकडे बघायला हवे 
आसाममध्ये अजून मासूम पोहोचला नाहीये सध्या आसाममध्ये मासूमपूर्व पाऊस चालू आहे आसामला मे महिन्यात पाऊस नवा नाही . मात्र त्याचे प्रमाण अत्यंत कमी असते .सध्या नेहमी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणत पाऊस पडत आहे . ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत . मोठ्या प्रमाणत पूर आला आहे तसे आसामला पूर देखील नवा नाही मात्र हा पूर डोंगराळ भागात येत असे आसामच्या शहरी भागात पूर येण्याच्या घटना यापूर्वी फरश्या घडलेल्या नाहीत सध्या आसामला आलेला पूर हा आसामच्या शहरी भागात मोठ्या प्रमाणत
पूर आला आहे तो देखील मे महिन्यात जेव्हा आसाममध्ये तुरळक पाऊस पडतो त्या काळात.  आता जर अशी स्थिती असेल तर जेव्हा पावसाचा मुख्य काळ असेल तेव्हा काय स्थिती असेल ? या प्रश्नाने तेथिल प्रशासन धास्तववाले आहेत 
या परिस्थितीला  मुख्यतः हवामान बदल  कारणीभूत आहे सध्या जगाच्या विविध प्रदेश्यात बदलत्या हवामानाने आपले रंग दाखवले आहेत . फ्रांस जर्मनी  तसेच युरोपातही अनेक दंश तसेच  ऑस्ट्रेलिया या देशांसह अमेरिकेची अनेक राज्ये यामध्ये हवामानबदल हा राजकारणाचा प्रमुख मुद्दा झाला आहे  मात्र आपल्याकडे हवामानबदलामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांची संख्या जगात सर्वाधिक असेल असे अनेक  जागतिक अहवालात सांगून सुद्धा हा मुद्दा आपल्या राजकारणात कुठेही नाही आहे की नाही गंमत आसाममधील निसर्गाच्या संकटामुळे यात बदल झल्यास ते खूप उत्तम ठरेल यात शंका नाही 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?