हवामान बदलाच्या अभ्यासाची दिशा बदलणार ?

   

     हवामान बदलाच्या अभ्यासाची दिशा बदलणार का  ? , असा प्रश्न उपस्थित व्हावा असे निष्कर्ष  नुकतेच अमेरिका आणि युकेच्या संशोधकांनी केलेल्या संशोधकांतून समोर आलेले आहेत अमेरिकेतील सॅन दिएगो येथील स्क्रिप्स इन्स्टिट्यूशन ऑफ ओशनोग्राफीच्या डॉ क्लो गुस्टाफसन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे शोध लावले. या संशोधनासाठी या गटाने वापरलेल्या तंत्राला मॅग्नेटोटेल्युरिक्स म्हणतात. हे खडक, गाळ, बर्फ किंवा पाणी असो, खोलवर दफन केलेल्या पदार्थांचे गुणधर्म निर्धारित करण्यासाठी पृथ्वीच्या नैसर्गिक विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रांमधील फरकांची नोंद करते.
              या संशोधकांना  अंटार्क्टिका खंडाच्या पश्चिमेला असणाऱ्या एका हिमनदीवर  संशोधन करत असताना व्हिलन्स आइस स्ट्रीमच्या खाली काही शेकडो मीटर अंतरावर द्रव तरल स्वरूपातील  पाणी आढळले आहे   अंटार्क्टिकामध्ये बर्फाच्या प्रवाहाखाली भूजल सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. अंटार्क्टिका हवामान बदलावर कशी प्रतिक्रिया देते हे समजून घेण्यात हे आम्हाला मदत करू शकते. हिमनद्या आणि बर्फाच्या प्रवाहांच्या पायथ्याशी असलेले पाणी त्यांच्या हालचालींना वंगण घालण्याचे काम करते.या खोल जलाशयात किंवा बाहेर पाण्याचे हस्तांतरण एकतर बर्फ प्रवाह कमी किंवा वेगवान करण्याची क्षमता आहे. भविष्यातील हवामानाच्या परिणामांचे अनुकरण करणार्या मॉडेलना आता याचा हिशेब द्यावा लागेल असे मत यावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या चमूने व्यक्त केले आहे
       जगातील हवामान बदलाच्या दृष्टींने अत्यंत संवेदनशील खंड जागतिक हवामान बदलाच्या सर्वात जास्त अनुचित परिणाम होणारा खंड म्हणून अंटार्क्टिका सर्वांना माहिती आहे त्या पार्श्वभूमीवर अंटार्क्टिका या कायम बर्फाच्छादित असणाऱ्या आणि ज्याचा भूभागावर कित्येक मीटर बफ्राचे आवरण आहे असा शास्त्रज्ञाचा अंदाज होता त्यावर द्रव स्वरूपात पाणी सापडणे अत्यंत महत्व्वाचे ठरते . ही भूजल प्रणाली द्रव स्वरूपातील पाण्याने  भरलेली आहे आणि सच्छिद्र गाळांनी बनलेली आहे. हे जवळजवळ मोठ्या स्पंजसारखे आहे. आम्ही पाहतो तो
स्पंज' अर्धा किलोमीटर ते सुमारे दोन किलोमीटर [०.३ ते १.२ मैल] जाडीचा आहे, त्यामुळे तो खूपच खोल आहे,"असे मत या अभ्यास गटातील क्लो डी. गुस्टाफसन, यांनी व्यक्त केले आहे 
       या विशिष्ट बर्फाच्या आवरणाखाली  खाली नद्या आणि तलावांची व्यवस्था आहे.ते नवीन सापडलेल्या जलसाठ्यात  उपग्लेशियल नद्या आणि तलावांपेक्षा 10 पट जास्त पाणी असण्याची आणि .ते पाणी तिथे हजारो वर्षांपासून तेथे बंदिस्त  असावे असा शास्त्रज्ञाचा अंदाज आहे  तेथे काही जीव राहतात की नाही  याविषयी अजून शास्त्रज्ञांना माहिती नाही मात्र यामुळे पारंपरिक पद्धतीने अंटार्क्टिका खंडाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना आपल्या अभ्यासाची दिशा मात्र बदलायला लागणार आहे अंटार्क्टिका खंडाचा अभ्यास  प्रामुख्याने जागतिक हवामानबदलाची दिशा कोणती असेल ? यासाठी करण्यात येतो आता ज्या गोष्टीद्वारे अभ्यास करावयाचा ती गोष्टच बदलत असल्याने अभ्यासाच्या  पद्धतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे  तो कशा प्रकारे बदलेल हे येत्या काळात स्पष्ट होईलच ! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?