मुद्दे आपले मुद्दे त्यांचे

     

     येत्या २१ मे रोजी ऑस्ट्रेलिया या देशात तेथील  आपल्या लोकसभा समकक्ष सदनाच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी  ऑस्ट्रेलिया  या देशातील वातावरण सध्या चांगलेच ढवळून निघत आहे . २१ मे ही प्रत्यक्ष मतदानाची तारीख असली तरी ज्या नागरिकांचे कोणाला मत देयचे हे ठरलेले आहे ते नागरिक ९ मे १८ मे दरम्यान आगाऊ मतदान देखील करू शकतात . नागरिकांनी पोस्टाद्वारे केलेले मत ऑस्ट्रेलिया निवडणूक आयोगापर्यंत ३ जुनपर्यंत फोहोचण्याची दक्षता नागरिकांना घ्यावी लागणार आहे . ऑस्ट्रेलिया देशातील लोकसभेची मुदत ३ वर्षे आहे मागील निवडणुका १८ मे २०१९ रोजी झाल्या होत्या  ऑस्ट्रेलियन संसद सुद्धा आपल्या सारखीच द्वि सदनी आहे आपल्या राज्यसभा समकक्ष ऑस्ट्रेलियन सदनाची सर्वसाधारणपणे मुदत ६ वर्षे आहे याला अपवाद आहे ऑस्ट्रेलिया  या देशाच्या केंद्रशासित प्रदेशातील सदस्यांच्या त्यांची मुदत मात्र ३ वर्षे आहे . जी त्यांच्या लोकसभेबरोबर संपते . मात्र ऑस्ट्रेलिया या देशातील राज्याच्या कडून निवडण्यात आलेले सदस्य मात्र ६ वर्षे पदावर राहतात . त्यांच्या लोकसभेत बहुमत असणारा पक्ष किंवा पक्षांची आघाडी सरकार तयार करते 
    आपल्यापैकी अनेकांना अमेरिकेत किंवा युकेत (इंग्लंड)मध्ये दोनच पक्ष आहेत असा गैरसमज असतो जो चुकीचा आहे अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक सोडून ग्रीन पार्टी सार्खे अनेक पक्ष आहेत मात्र प्रमुख पक्ष वगळता अन्य पक्षांची ताकद आपल्याकडील अपक्ष उमेदवारांसारखीच आहे त्यामुळे त्यांचा फारसा विचार होत नाही जी गोष्ट अमेरिकेत तीच गोष्ट युके (इंग्लंड ) आणि  ऑस्ट्रेलिया या देशांची  तर ऑस्ट्रेलिया देशातील राजकीय पक्ष आपला उमेदवार पंतप्रधानपदी निवडण्यासाठी २१ मे रोजी ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या समोर मताचे दान मागणार आहेत 
सध्या ऑस्ट्रेलिया या देशाच्या निवडणुकीत सत्ताधिकारी पंतप्रधान  स्कॉट मॉरिसन यांच्यातर्फे   हवामान बदल अर्थव्यवस्था आणि सुरक्षितेचा विश्वास या मुद्यांना धरून प्रचार केला जात आहे त्यांच्या मते आम्ही कोव्हीड १९ च्या काळात खूपच धैर्याने काम केले त्यामुळे लिबरल आणि नॅशनल यांच्या आघाडीस पुन्हा एकदा सत्ता द्यावी तर त्यांचे प्रमुख विरोधक आणि ऑस्ट्रेलियन राजकारणात सर्वाधिक काळ राहिलेले लेबर पक्षाचे अँथनी अल्बानीज यांनी आता नाही तर कधीच नाही असा नारा दिला आहे जर अँथनी अल्बानीज यांच्या पक्ष निवडून आला तर तर दशकाहून अधिक कलावधीनंतर ऑस्ट्रेलिया  या देशात पक्ष बदलेल ,सुमारे दोन ते अडीच महिन्यापूर्वी 
ऑस्ट्रेलिया  या देशात खूप मोठा पाऊस झाला होता तेव्हा त्या वेळी न्यू साऊथ वेल्स आणि टास्मानिया या राज्याच्या गव्हर्नरपदी असणाऱ्या व्यक्तीने गेल्या एक हजार वर्षात आमच्याकडे असा पाऊस झाला नाही असे विधान केले होते त्या पार्शवभूमीवर आपण पंतप्रधानाच्या दाव्याकडे बघायला हवे
      नुकतेच  २४ एप्रिल रोजी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली त्याच्या आधी काही महिने जर्मनीची त्यांच्या संसदेची निवडणूक झाली सध्या ऑस्ट्रेलिया या देशाबरोबर फिलिपाइन्स देशात राष्र्टाध्यक्षांची निवडणूक सुरु आहे या तिन्ही  ठिकाणी हवामान बदल हा कळीचा मुदा होता / आहे मागच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज या वार्षिक हवामानबदलाच्या परिषदेच्या वेळी भारत हवामान बदलामुळे नुकसान भोगणारा जगातील सर्वात मोठा दंश ठरू शकतो , असा अहवाल प्रसिद्ध झाला होता मात्र त्यांनतर झालेल्या कोणत्याच निवडणुकीत हा मुदा आला आहे आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्रातील विविध निवडणुकीत सुद्धा हा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता तशी कमीच आहे आपण जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहोत तेव्हा अन्य देशातील लोकशाहीच्या चांगल्या मुद्याची दखल घेऊन आपल्यात बदल करण्यातच शहाणपण नाही का ? 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?