श्रीलंका अंतर्गत यादवीच्या दिशेने ?


आपल्या शेजारील श्रीलंकेची स्थिती दिवसनोंदिवस अधिक बिकट 
होत आहे आर्थिक संकट कमी की काय ? म्हणून आता श्रीलंकेत आता राजकीय संकट निर्माण होताना दिसत आहे तेथील राष्ट्रपती   गोटाभाई राजपक्षे यांनी पंतप्रधानपदी असणाऱ्या आपल्या संख्या मोठ्या भावाचा महिंद्रा राजपक्षे  राजीनामा घेतला आहे .राष्ट्रपती गोटाभाई राजपक्षे  आणि पंत प्रप्रधानचे  सर्वात छोटया भाउ  जे  तिथे आरोग्यमंत्री म्हणून काम बघत होते  त्यानी अर्थात   नमल राजपक्षे  या आधीच राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती  गोटाभाई राजपक्षे यांनी   मात्र  जनाधार आपण राजीनामा द्यावा असा असला तरी कोणत्याही स्थितीत राजीनामा देणार नसल्याचे जाहीर केले आहे राजपक्षे घराण्यातील दोन सदस्यांनी राजीनामा दिल्यामुळे   श्रीलंकेवर लोकशिच्या मार्गाने निवडून येण्याचा दिखावा करत अप्रत्यक्षपणे एकाधिकारशाहीने राज्य करणाऱ्या राजपक्षे घराण्याला काहीसा लगाम लागला आहे . तास श्रीलंकन लोकशाहीला घराणेशाहीचा मोठा इतिहास आहे आतापर्यत श्रीलंकेवर बंदरनायके , राजपक्षे आणि विक्रमसिंघे या तीन घरण्याचीच आलटून पालटून सत्ता आहे (आपल्या दक्षिण  आशियाच्या लोकशाहीत ही एक अनोखी पंरपरा आहे आपल्या भारतात नेहरू गांधी घराणे . पाकिस्तानात भुत्तो ,आणि शरीफ घराणे आणि
श्रीलंकेत  बंदरनायके , राजपक्षे आणि विक्रमसिंघे या घराण्याचा तर  बांगलादेशात खालिदा  झिया आणि शेख हसीना या दोन व्यक्तीचा  प्रभाव मोठ्या प्रमाणावर  आहे )  सोमवार ९ मे रोजी राजीनामा देणारे पंतप्रधान २००५ ते २०१५ पर्यंत राष्ट्रपती होते तर सध्याचे राष्ट्रपती पंतप्रधान , असो 
सध्या श्रीलंकेत  सर्वठिकाणी अभूतपूर्व हिंसाचार सुरु आहे ज्यामध्ये विद्यमान सत्तारूढ पक्षाच्या एका खासदारांसह८  जणांना प्राणास मुकावे लागले आहे सम्राट अशोकामुळे जवळपास संपूर्ण श्रीलंका बौद्धधर्मीय झाला . जगात शांतताप्रिय राहण्याची शिकवण देणारा धर्म म्हणून बौद्ध धर्म ओळखला जातो मात्र आर्थिक संकटामुळे उध्दभवलेल्या राजकीय अशांतेमुळे हा निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण असलेला हा देश यादवी युद्धाच्या दिशेने निघाला आहे .तसे श्रीलंकेला यादवी युद्धाच्या देखील काळा इतिहास देखील आहे श्रीलंकेवर ब्रिटिशांचे राज्य असताना  बाहेरून आलेल्या तामिळी जनतेला ब्रिटिश धार्जिणी असल्यामुळे मिळालेल्या विकासाच्या संधी  आणि मूळच्या सिल्ली जनतेला नाकारण्यात आलेल्या विकासाच्या संधी,  यामुळे दोन्ही समाजात पडलेली दरी बुझवण्याच्या प्रयत्नात स्वातंत्र्यनंतर तामिळी जनतेवर अनेक बंधने लादण्यात आली ज्यामुळे तामिळीमध्ये श्रीलंकेपासून वेगळे होत स्वतंत्र देश उभारण्याची ईच्छा येऊ लागली जयतून श्रीलंकेत मोठे यादवी संकट उभे राहिले यावर २०१३ च्या आसपास मद्रास कॅफे नावाचा चित्रपट देखील आला आहे ज्यामध्ये तामिळी लोकांचा ते तामिळी आहेत याच कारणाने केलेला नरसंहार आणि त्यास कारणीभूत आहे या संशयातूनत भारताचे एक उमदे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्यापर्यंतचे सर्व काही नाट्यमय रित्या दाखवले आहे {या चित्रपटाच्या सुरवातीच्या अर्ध्या भागात प्रचंड मोठया प्रमाणात हिंसा दाखवली आहे } त्याचीच पुनरावर्ती पुन्हा एकदा होते का ? अशी शक्यता निर्माण झाली आहे  आतापर्यंत एका विशिष्ठ वर्गाला या हिंसक आंदोलनाची झळ बसल्याची बातमी
आलेली नाही मात्र हिसंक जमावाची सारासार विचार करण्याची शक्ती नसते तो कोणाचाही गैरसमजीतून सुद्धा विध्वंस करू शकतो त्यामुळे तामिळी वर्गाला पुन्हा मार बसण्याची शक्यता नाकारतात येत नाही . 
श्रीलंकेतील तमिळी नागरिकांची मुळे आपल्या तामिनाडू राज्यात आहेत  श्रीलंकेतील तामिळी नागरिकांची स्थिती हा आपल्या तामिळनाडू राज्यातील राजकारणातील संवेदनशील मुदा आहे श्रीलंकेतील तामिळी नागरिकांच्या विषयी तामिळींनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात सहानभूती आहे त्यामुळे हा मुद्दा निव्वळ श्रीलंकेला राहत राहत नाही त्याला भारताचा कोपरा मिळतो परिणामी  तो आपला देखील मुद्दा आहे तो शांततेत चिनी प्रभाव न वाढतच सुटणे  भारताच्या हिताचे आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?