बांगलादेशात जाण्यासाठी तिसरा रेल्वेमार्ग सुरु !

   

   सरकार भारताच्या शेजारील देशांशी भारताच्या संपर्क वाढवण्यावर विशेष भर देत आहे त्याअंतर्गत नेपाळ आणि बांगलादेश या दरम्यान रेल्वे वाहतूक  वाढण्यासाठी विशेष प्रयत्न भारताकडून करण्यात येत आहे भारत बांगलादेश या दरम्यान सध्या २ प्रवाशी गाड्या चालवल्या जातात कोलकत्ता  ते ढाका आणि कोलकत्ता ते खूणला या या दरम्यान या गाड्या चालवल्या  जातात ज्यामध्ये १ जून पासून न्यू जलपाईगुडी ते ढाका या दरम्यान चालल्या जाणाऱ्या प्रवाशी गाडीची भर पडणार आहे  कोलकत्ता ते ढाका दरम्यान चालवण्यात येणाऱ्या रेल्वेला मैत्री एक्स्प्रेस कोलकत्ता ते  खूणला या दरम्यान चालवण्यात येणाऱ्या रेल्वेला बंधन एक्स्प्रेस तर नव्याने  न्यू जलपाईगुडी ते ढाका दरम्यान चालवण्यात येणाऱ्या एक्स्प्रेसला मैथिली एक्स्प्रेस असे संबोधतात 
स्वातंत्र्यापूर्वी त्या वेळेच्या पूर्ण बंगाल (आताच बांगलादेश ) आणि आताच्या पश्चिम बंगाल ) या दरम्यान ७ रेल्वेमार्ग अस्तित्वात होते . फाळणी झाल्यावर हे मार्ग कालांतराने टप्याटप्याने बंद करण्यात आले . जे आता  दोन्ही देशातील संवाद वाढवण्यासाठी पुन्हा टप्याटप्याने पुन्हा सुरु करण्यात येत आहेत ज्यानुसार ही रेल्वेसेवा सुरु होत आहे या खेरीज अन्य दोन मार्गावरून भारत आणि बांगलादेश या दरम्यान मालवाहतूक सध्या करण्यात येत आहे . थोडक्यात बांगलादेश आणि भारत या दरम्यान विविध प्रकारे एकूण पाच रेल्वेमार्ग सध्या वापरात आहेत 
१ जून पासून  भारत आणि बांगलादेश याच्या दरम्यान सुरु होणाऱ्या रेल्वेबाबत दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनीमान्यता   पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  बांगलादेशच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्बांच्या प्रित्यर्थ बांगलादेश  दौऱयावर गेले असता दिली होती हि रेल्वे सुरु करण्याचे नियोजन मार्च २०२१  मध्येच होते मात्र कोव्हीड १९मुळे ते खोळंबले जे आता होत आहे 
    ही गाडी ट्रेन नंबर १३१३१  आणि १३१३२ या  क्रमांकाने चालवण्यात येणार आहे भारतातून ही गाडी रविवारी    आणि बुधवारी बांगलादेशसाठी निघेल  आणि बांग्लादेशहून सोमवारी आणि गुरुवारी निघेल. ही गाडी न्यू जलपाईगुडी ते ढाका हे सुमारे ५३४ किमीचे अंतर साडेनऊ तासात पार पडेल या प्रवेशादरम्यान ही गाडी एकदा सुटल्यावर  या मार्गावरील भारताचे शेवटचे स्थाहनक असलेल्या हल्दीबाडी आणि बंगलादेशातील पहिले स्थानक असेलल्या चिल्हती  या दोन स्थानकाखेरीज कुठेही न थांबता आपल्या शेवटच्या स्थानकांवर थांबेल भारतीय प्रमाणवेळेनुसार ही रेवले सकाळी सव्वा आकाराला ढाक्यासाठी निघेल आणि बांगलादेश स्टॅण्डर्ड टाईमनुसार रात्री दहाच्या सुमारास पोहोचेल तर ही रेल्वे ढाक्याहून  बांगलादेश स्टॅण्डर्ड टाईमनुसार रात्री दहाच्या सुमारास न्यू जलपा गुदि साठी निघून भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सव्वा सातला भारतात
पोहोचेल बांगलादेशमध्ये डिझेलवरच रेल्वे चालवण्यात येत असल्याने ही गाडी पूर्णतः डिझेल इंजिनवरच मार्गक्रमण करेल . या गाडीत चार फर्स्ट एसीचे आणि चर एसी चेअर कारचे डब्बे असतील तर दोन दोन  डब्बे हे जनरेटरचे असतील  यासाठी कोलकत्ता आणि न्यू जलपाई गुदी या ठिकणी आरक्षण करण्याची सोय करण्यात अली आहे ही गाडी भरत आणि बांगलादेश दरम्यान चालणाऱ्या अन्य दोन रेल्वेप्रमाणे म्हणजे वर्षातील सहा महिने सुरवातीपासून शेवट्पर्यंत भारताचे इंजिन आणि बांगलादेश रेल्वेचे डब्बे आणि पुढील सहा महिने सुरवातीपासून शेवट्पर्यंत बांगलादेशचे इंजिन णि भारताचे डब्बे या पद्धतीने चालणार की भारत पाकिस्तान या दरम्यान ज्या प्रमाणे प्रवाशी रेल्वे चालवण्यात येत होती त्या प्रमाणे भारतीय हद्दीपर्यंत भारतीय रेल्वे आणि पाकिस्तान हदीपर्यंत त्यांची रेल्वे त्यानंतर आपली रेल्वे या पद्धतीने चालणार याबाबत हा लेख लिहण्यापर्यंत रेल्वेकडून काहीही सांगण्यात आले नव्हते 
         या एक्स्प्रेसमुळे ईशान्य भारतातील पर्यटनवाढीसह . परिसरात व्यापारवृद्धीसाठी साह्य होण्याबरोबरच समस्त भारतीयांना बांगलादेशात जाण्यासाठी स्वस्त पर्याय देखील उपलब्ध होईल ज्यामुळे दोन्ही देशातील संबध सुधारतील अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे जी खरीच फलद्रुप होते का ? हे येत्या काळात स्पष्ट होईलच मात्र तो पर्यंत आपण सकारत्मकपरिणामच हत्ती लागतील अशी अशा धरूया 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?