पुन्हा एकदा भारताला संधी


निसर्गाचा भारत हा देश विशेष लाडका असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे जगभरात निसर्गाचा कोपाने विविध देशाच्या प्रशासनला अक्षरक्षा घाम फोडला असताना भारतावर त्या तुलनेत फारच कमी संकट येत असल्याचे दिसत आहे एका अर्थाने निसर्ग आपल्या भारतीयाना हवामानबदलाविषयी काहीतरी ठोस करण्याविषयी वारंवार सूचित करत आहे आपण भारतीय मात्र निसर्गाच्या या निसर्गाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे आपण हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी काहीही करत नाहीये जर या मुळे नाराज होऊन निसर्गाने तो इतर देशांना लावतो तो न्याय आपल्या भारतीयांना लावल्यास आपले हाल कुत्रा देखील खाणार नाही  सांगायला कोण्या ज्योतिष्याची गरज नाही 
      ऑस्ट्रेलिया ,दक्षिण आफ्रिका या देशात पावसाने आपले रौद्ररूप दाखवल्यानंतर गेल्याच आठवड्यात ब्राझील या देशाला निसर्गाने आपला हिसका दाखवला पाऊसामुळे भूस्खलन होऊन ब्राझीलमध्ये ९१ ज्यांना प्राणास मुकावे लागले आणि सुमारे दहा हजार लोक विस्थापित झाले आहे तर एक हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले आहेत ब्राझीलच्या भूस्खलनाची जी दृश्ये आंतराष्ट्रीय माध्यमामध्ये आली आहेत त्यानुसार ब्राझीलमध्ये सुद्धा डोंगरानजीक अतिक्रमण करून बांधण्यात येऊन अनियंत्रित शहरीकरण झालेले दिसत आहे जो आपल्याकडे देखील मोठा प्रश्न आहेच पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने आपण यातुन शहाणे होत कृती करणे आवश्यक आहे मात्र या बाबत आपणाकडे हवी त्या प्रमाणत चर्चा होत नाही चर्चाच होत नसल्याने कृती होणे दूरच चर्चा न करता कृती होणे भारतात तरी शक्य नाही ज्यामुळे भारताला हवामानबदलाच्या मोठा फटका बसणार आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे 
गेल्या काही महिन्याचा आढावा घेतला असता आपणास एक गोष्ट सहजपणे दिसते ती म्हणजे पावसाचे अत्यंत कमी वेळात खूप मोठ्या प्रमाणात कोसळणे . काही वर्षांपूर्वी एका महिन्यात कोसळणारा पाऊस काही तासात कोसळतो त्यामुळे  जगभरातील ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका आदी देशातील व्यवस्था कोलमडून पडत आहेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका देशातील व्यवस्था भारतापेक्षा उत्तम सुस्थितीत आहेत हे कोणीही नाकारणार 
नाही जर त्या देशांच्या व्यवस्था कोलमडून पडत असतील तर आपल्या भारताविषयी न बोललेलेच बरे 
    निसर्ग या घटनांद्वारे आपणास वारंवार इशारा देत आहे गरज आहे तो इशारा समजून पण त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याची अन्यथा ज्या प्रमाणे कोव्हीड १९ ची साथ जोरात असताना ज्या प्रमाणे कोव्हीड १९ मुळे झालेल्या मृत्यूचे आकडे माध्यमात येयचे त्या प्रमाणे हवामानबदलामुळे आज झालेले मृत्यू या प्रकारची आकडेवारी माध्यमात आली तर आश्चर्य वाटायला नको !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?