आपण शहाणे कधी होणार ?

   

  आपण शहाणे कधी   होणार ? असा प्रश्न उपस्थित व्हावा असे आपल्या भारतीयांचे वागणे असल्याचे भारतीयांच्या हवामानबदलाविषयीच्या वर्तणुकीतून वारंवार दिसून येत आहे जगभरात सध्या बदलत्या हवामानने लोक खूप त्रस्त आहेत पूर्वी बगदाद शहराला फारच कमी धुळीची होती ज्यामध्ये आज पूर्णतः १८० अंशाचा बदल झाला आहे    इराकची राजधानी असेलल्या बगदादमध्ये धुळीची वादळे हि सध्याची नित्याची बाब झाली आहे एखाद्या दिवशी जर कमी धुळीची वादळे झाली तर काहीतरी गंभीर अपराध आपल्याकडून झाल्याने आज शहरात धुळीची कमी तर झाली ना ? असा प्रश्न नागररिकांना पडावा अशी तेथील परिस्थिती आहे ?बदलते जगातील हवामान आणि परिसरात वृक्षतोड मोठ्या प्रमाणत झाल्याने अशी स्थिती उदभवल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे या धुळीच्या वादळांमुळे तिथे श्वसनचे विकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत 
     युरोपमध्ये उन्हाळ्याच्या सुरवातीलाच गेल्या कित्येक वर्षातील तापमानाचे उच्चांक मोडीत निघत आहेत उन्हाळ्याच्या सुरवातीलाच भयावह वाटणारे तापमान असल्याने पुढे काय होणार या चिंतेत तेथील प्रशासन आहे लोकांनी विनाकारण बाहेर पडू नये नागरिकांनी अधिकाधिक पाणी आणि द्रव्यपदार्थाचा अन्नात समावेश करावा लहान मुले आणि वृध्द्व व्यक्तीची अधिकची काळजी घ्यावी अश्या सूचना तेथीलप्रशासन  जनतेला देत आहेत 
   याउलट आपल्याकडे काय स्थिती आहे ? हवामान बदलामुळे आपण सर्वच जण प्रभावावित होणार आहोत निसर्ग त्याच्या प्रकोप दाखवतना हे एका विशिष्ट धर्माचा म्हणून यावर कमी प्रकोप दाखवा हा एका विशिष्ट धर्माचा म्हणून यावर जास्त प्रकोप दाखवा असे न करता सर्व मानवानं एकाच तराजूत तोलून शासन करणार आहे मात्र जगभरात होणार  निर्सगाचा प्रकोप बघता हवामान बदलाविषयी आपल्याकडे ज्या व्यापक स्तरावर चर्चा होणे आवश्यक आहे त्या तुलनेत आपल्याकडे फारच कमी चर्चा होत आहे आपल्याकडे चर्चाच होत नाही असे नाही
आपल्याकडे देखील चर्चा होते मात्र ती आपल्या भारताची लोकसंख्या बघता अत्यंत तुटपुंजी आहे WION MEWS सारखी  एखादी  इंग्रजी वृत्तवाहिनी वगळता हवामानबद्दल या विषयावर सोमवार हे शुक्रवार रोज सायंकाळी साडेपाच वाजता अर्ध्या तसचे बातमीपत्र सादर करणारी एखाद दुसरीच वृत्तवाहिनी असेल आपल्या भारतात  प्रादेशिक भाषेतील वृत्तवाहिनी बघणारा वर्ग इंग्रजी वृत्तवाहिनी बघणाऱ्या लोकांच्या तुलनेत खूप मोठा आहे त्यामुळे असे प्रयत्न प्रादेशिक भाषेत होणे अत्यावश्यक आहे 
मागील वर्षी झालेल्या कॉपच्या अधिवेशनाच्यावेळी एक अहवाल प्रसिद्ध झाला होता त्यात येत्या काळात हवामान बदलामुळे जगात सर्वाधिक प्रभावित होणारे लोक भारतात असू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात आली होती काही दिवसापूर्वी आपण आसाम राज्यात पुरच्या संकटातून निसर्गाचे रौदस्वरूप बघितले आहेच मात्रअगदीच त्या प्रकारचे संकट नाही पण त्याच्या जवळ जाणारे संकट उत्तराखंड राज्यात आणि आपल्या कोकणात येऊ शकते प्रशासन त्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलत आहेच   जगभरात होणारे निर्सगाचे तांडव बघता आपल्याकडे असे संकट येण्याचौ शक्यता दिवसोंदिवस वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर  मात्र प्रशासन ज्या लोकांसाठी हि [पाऊले उचलणार आहे त्या लोकांना यासाठी तयार कारणे आवश्यक आहे आणि तिथेच भयाण शांतात आहे आणि दुःख तेच आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?