या खऱ्या प्रश्नांना कधी कोणत्या तयारीने सामोरे जणार ?


सध्या आपल्या भारतात ज्याचा रोजच्या जगण्यात फारच कमी संबंध असणाऱ्या  किंबहुना रोज जगताना काहीच संबंध येत नसलेल्या मुद्यांना काहीसे अधिक महत्व देण्यात येत असल्याचे  सर्वसाधारण समाजात काय बोलले जाते याचा कानोसा घेतल्यास सहजतेने लक्षत येते या गौण महत्त्वाच्या मुद्यांमध्ये एका महत्तवाच्या मुद्याकडे आपले मोठ्या प्रमाणत दुर्लक्ष होत असल्याचे आपणस सहजतेने दिसते तो मुद्दा म्हणजे हवामान बदल होय 
आज  जून महिन्यात जगातील एक फार मोठा भूभाग हवामान बदलामुळे चिंतेत आहे ज्यामध्ये चीनपासून मध्यपूर्व आखाती देश . पश्चिम युरोपीय राष्ट्रे आणि बलाढ्य अश्या अमेरिका देशाचा पश्चिमेकडील पॅसिफिक किनाऱ्याचा भाग तसेच दक्षिण पूर्वेकडील भाग अशा जगभरातील सर्व ठिकाणच्या समावेश होत आहे आपल्याकडे कोणते मुद्दे चर्चेत आहेत आपल्या प्राधान्यक्रमात हवामानबद्दल हा मुद्दा किती खालच्या क्रमांकावर आहे हे काही नव्याने सांगायला नकोच असो  
  चीनमार्फत हवामानबदलाचे संकट ओळखून करावयाच्या उपायांची माहिती देण्यासाठी तेथील सरकारतर्फे हवामान बदल कृती पहिले पंधरा दिवस आरखडा २०३५ प्रसिद्ध करण्यात आला आहे ज्यामध्ये हवामानबदलामुळे चीनमधील कृषिक्षेत्र मोठ्या प्रमाणत उत्तरेकडे सरकल्याचे आणि बदलते हवामान चीनसाठी मोठा धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे बदलत्या हवामानामुळे किनारी प्रदेशाला मोठा धोका आहे तसेच आगामी काळात मोठ्या प्रमाणत लहरी हवामानाला सामोरे जावे लागू शकते अशा इशारा देण्यात आला आहे हवामानबदलाच्या संकटाला संरे जाण्यासाठी २०२२ ते २०२६ पर्यंत पाण्याच्या वापर १६ % कमी करणे तसेच नद्या तलाव सरोवरे हे कमी कालावधीत जास्त पाऊस पडला तयार काही काळासाठी का होईना पाणी धरून ठेवण्यासाठी सक्षम करण्यासाठी कारवायांचा उपाय योजनेचा समावेश कऱण्यात आला आहे 

स्पेन या देशात वाढत्या तापमानामुळे जमीन अधिक कोरडी पडत आहे या कोरड्या जमिनीमुळे पीक उत्पादनात
मोठया प्रमाणत घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे सर्वसाधारणपणे स्पेन देशात जुलैच्या शेवटच्या पंधरवडा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात देशात सर्वाधिक तापमान नोंदवले जाते मात्र हे तापमान आतच मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जून महिन्याचे सुरवातीचे पहिले पंधरा दिवस यातच नोंदवले गेले आहे मे महिना स्पेनच्या इतिहासात गेल्या १०० वर्षातील सर्वाधिक उष्ण मे महिना होता या महिन्यात अनेक ठिकाणी ४० अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले गेले आहे एदेशाच्या दक्षिणेकडील एका शहारत तर ४७ अंश सेल्सियस तपमानची नोंद करण्यात आली 
अमेरिका हा देश सर्व प्रकारच्या हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात आहे देशाच्या काही भागात प्रचंड ताकदीची चक्रीवादळे येत आहेत या चक्रीवादळामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित होत आहे प्रामुख्याने देशाच्या आग्नेय दिशेला हि चक्रीवादळे त्रास देत आहे देशाच्या पश्चिमेच्या भागाचे उत्तरेकडून दक्षिणेकडे सामान भाग केल्यास उत्तरेकडील भागात पूर्वी कधीचनोंदवले नाही इतके तापमान नोंदवण्यात येत आहे मधल्या भागात प्रचंड असे पूर आले आहेत अनेकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची वेळ अमेरिकेच्या प्रशासननवर आली आहे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी एक तृतीयनांश संख्या सध्यालहरी हवामानामुळे त्रस्त आहे 
        जगाच्या नकाश्यात एका कोपऱ्यात असणारा न्यूझीलंड हा देश देखील हवामानबदलाच्या संकलातून सुटू शकलेला नाही  मे जून महिन्यात न्यूझीलंडच्या किनाऱ्यावर एक फूट उंचीचे पाच किलोपर्यंत वजन असणारे किरोरे या जातीचे पेंग्विन पक्षी येतात सध्या मात्र त्यांची कलेवरे येत आहेत गेल्या तीस दिवसात न्यूझीलंडच्या किनाऱ्यावर या पक्ष्यांची ५०० प्रेते   आल्याची नोंद आहे संशोधकांच्या मते वाईट स्थिती अजून येयची आहे पेंग्विन चा जातीतील पक्षी प्रामुख्याने समुद्रातील छोटे मासे खाऊन जगतो हे पक्षी पाण्यात जास्त खोलीवर जात नाहीत मात्र हे ज्या प्राण्याची शिकार करतात ते छोटे मासे वाढत्या तापमानमुळे चांगले हवामान मिळावे यासाठी अधिक खोल पाण्यात गेल्याने या पेंग्विनला भुकेने प्राण सोडावे लागत आहे या वाढत्या तापमानानला आपण मानवाचं जवाबदार आहोत हे ढळढळीत सत्य आहे 
एकंदरीत जागतिक हवामानबदलाच्या प्रश्नावर चर्चा नव्हे तर काहीतरी ठोस करण्याची गरज यातून दिसून येत आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?