........ तर पाकिस्तानचे तीन तुकडे होतील

 

           ........  तर पाकिस्तानचे तीन  तुकडे  होतील हे विधान कोण्या एका भारतीयांचे नाहीये तर हे वक्तव्य केले आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे सध्याच्या राजनैतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते . या मुलाखतीत त्यांनी जर सध्याच्या केंद्र सरकारने आमची नव्या निवडणुका घेण्याची मागणी मान्य न केल्यास पाकिस्तानात गृहयुद्ध सुरु होऊ शकते ज्यामुळे पाकिस्तानचे खैबर ए पखवातुनावा ( ज्यास आता आता पर्यंत वायव्य सरहद्द प्रांत या नावाने ओळखले जात होते ) सिंधुदेश आणि बलुचिस्तान असे तीन भाग पडू शकतात अशी भीती व्यक्त केली आहे त्यांनी या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानचे सध्याचे केंद्र सरकार देशाची आर्थिक स्थिती हाताळण्यात पूर्णतः अपयशी ठरत आहे ज्यामुळे  ज्या देशांच्या प्रमुख धर्म इस्लाम आहे अश्या देशांची यादी केल्यास ज्या एकमेव देशाकडे अणुबॉम्ब आहेत त्या पाकिस्तानचे लष्कर आपले मनोधैर्य गमावू शकते ज्याचा शेवट पाकिस्तानचे त्रिभाजन होण्यात होऊ शकतो अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे त्यांनी या मुलाखतीत सांगितले आहे की , बाटलीतून जीन ( जीन हा त्यांचा  तोंडाचा शब्द  आहे आपण भारतीय परंपरेनुसार ब्रम्हराक्षस हा शब्द योजू शकतो ) बाहेर पडला आहे जो पुन्हा बाटलीत येणे अशक्य आहे आपण फक्त तो आपले कमीत कमी नुकसान कसे करेल हे बघायला हवे 
          खैबर ए पखवातुनावा या प्रांतामध्ये इम्रान खान संस्थापक अध्यक्ष असलेल्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे सरकार आहे तेथील मुख्यमंत्र्यांनी आम्ही आमचे राज्य पोलीसदल  इम्रान खान याना इस्लामाबाद शहरात आंदोलन करायला लागले तर तेव्हा इम्रान खान यांना संरक्षण देण्यासाठी पुरवण्यासाठी उच्छुक आहोत असे विधान केले आहे एखाद्या प्रातांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात असे विधान करणे अत्यंत धोकादायक आहे त्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांचे विधान बघायला हवे इम्रान खान नुकतेच माजी झालेले पंतप्रधान आहेत 
कोणत्याही देशाच्या शासनव्यस्थेत महत्त्वाचे ठरणारे पद म्हणून पंतप्रधान पद ओळखले जाते अश्या पदावर असणाऱ्या राहिलेल्या व्यक्तीची विधाने ही विनोदाची म्हणून घेतली जाऊ शकत नाही इम्रान खान यांनी पंतप्रधानपदावर असताना अनेक वादग्रस्त, पदाला न शोभणारी  विधाने केली असली तरी त्या प्रकारचे विधान म्हणून या कडे बघता येऊ शकत नाही पाकिस्तानची आर्थिक आणि राजकीय स्थिती बघता तर नाहीच नाही 
            पाकिस्तानचे विभाजन झाले तर भारताला चांगले असे काही जणांना वाटू शकते जे अत्यंत चुकीचे आहे पाकिस्तानात गृहयुद्ध सुरु झाले तर त्याचा अनुचित परिणाम भारतावर होईल पाकिस्तानची अधिकाधिक लोकसंख्या तसेच त्यांची जवळपास सर्व महत्त्वाची शहरे भारत पाकिस्तान सीमेपासून हाकेच्या अंतरावर आहेत त्यामुळे गृहयुद्ध सुरु झाल्यास तेथील लोक निर्वासित म्हणून भारताकडेच येऊ शकतात ते पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान इराण सीमेवरून इराणमध्ये जाण्याची शक्यता खूपच कमी आहे तसेच पाकिस्तानचे अणववस्त्रे कोणत्या नव्या देशाकडे जातील याचा तणाव समस्त जगाकडे असेल ज्यामुळे   भारतासाठी पाकिस्तानचे विभाजन न होता तिथे शांतता होण्यातच हित आहे चीनचे पाकिस्तानमध्ये अनेकविकासकामे सुरु आहेत त्यामुळे तेथे नुकसान न होण्यासाठी पाकिस्तानचे तुकडे न होण्यासाठी प्रयत्नशील राहील हे  सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील राजकारण अर्थकारण आणि अंर्तगत घडामोडी कोणत्या वळणाने जातात याकडे आपले लक्ष असणे आवश्यक आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?