आता तरी आपण जागे होणार का ?

       

 आता तरी आपण जागे होणार का ? असा प्रश्न पडावा ? अश्या घडामोडी सध्या ईशान्य भारतात घडत आहेत जिथे तेथील सामाजिक प्रश्नाबाबत राजकीय प्रश्नाबाबत माहितीचा प्रचंड प्रमाणात अभाव असतो तिथे ती माणसे सध्या  कोणत्या प्रकारे जीवन जगत आहेत याची माहिती असणे तसे अशक्यच.  संघ परिवारातील विविध संघटनामुळे तेथील समाजाची मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे तेथील समाज देशाच्या मुख्य प्रवाहात येत आहे मात्र त्यांची सध्याची स्थिती बघता त्या प्रयतांची गती प्रचंड प्रमाणत वाढविण्याची गरज असल्याचे सध्या ज्या बातम्या त्या भागातून येत आहे त्यातून प्रतीत होत आहे 
         सध्या सदर भागातील प्रमुख राज्य असणारे आसाम आणि मेघालय या राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे निसर्गाच्या रौद स्वरूपामुळे तेथील काही जणांना प्राणास देखील मुकावे लागले आहे .रेल्वे सारख्या मूलभूत सोयीसुविधां मोठ्या प्रमाणात उद्धवस्त झाल्या आहेत . ज्यामुळे मुळातच प्रगतीच्या दृष्टीने अन्य भारताच्या काहीसा मागे असणारा ईशान्य भारत प्रगतीबाबत पुन्हा मागे गेला आहे
त्याना पुन्हा शून्यातून सुरवात करावी लागणार आहे . आजमितीस ईशान्य भारतातील आठ राज्याचा (सिक्कीमचा समावेश करून ) विचार करता फक्त आसाम राज्यात रेल्वेचे मोठ्या प्रमाणात जाळे आहे या भागातील अनेक राज्ये त्यांच्या राजधान्या अजून रेल्वेच्या नकाश्यावर आलेल्या नाहीत ते प्रदेश रेल्वेच्या नकाश्यावर आणण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणत सुरु आहेत या प्रयत्नाला तेथील हे लहरी हवामान काही प्रमाणात बाधा आणू शकते .  
         समस्त भारताचा विचार करता सर्वाधिक निसर्गाचा जवळ जाणारा समाज म्हणून ईशान्य भारतातील समाज ओळखला जातो .तेथील समाजजीवनात निसर्गाला पुजण्याचे अनेक स्थानिक विधी करण्यात येतात  ईशान्य भारतातील समाजजीवनाचा मोठा आधार तेथील निसर्ग आहे मग ते पर्यटन असो किंवा किंवा निसर्गाच्या आधारे करण्यात येणारे शेती सारखे काही व्यवसाय असो सारेच निसर्गाच्या जवळ जाणारे मात्र  आज निसर्गाच्या जवळ असणारा नागरिकच निसर्गाच्या रौदस्वरुपामुळे त्रासला गेला आहे या वर्षाचा पाऊस पूर गेल्या कित्त्येक वर्षातील उच्चांक मोडत आहे त्यामुळे मुळातच तोकडी असणारी व्यवस्था पूर्णतः मोडकळीस येत आहे ज्याचा मोठा फटका तेथील समाजजीवनला बसत आहे हवामानबदल या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञांच्या मते हवामानबदल दिवसोंदिवस अधिकाधिक लहरी वागणार आहे जर आजच ही स्थिती असेल तर भविष्यत काय वाढून ठेवले आहे याची कल्पनाच केलेली बरी 
दक्षिण अमेरिका खंडातल्या कोलंबिया हा देश असो किंवा हिंदी महासागरातील ऑस्ट्रोलीया देश असो असो अथवा जर्मनी सारखा युरोपातील देश तसेच फिलिपिन्स सारखा पॅसिफिक महासागरातील देश असो जगभरातील अनेकदा देशातील तेथील राजकारणाचा कळीचा  राजकारणातील मुद्दा हा जागतिक हवामानबदल हा झाला आहे भारताच्या तुलनेत या देशांची लोकसंख्या अत्यंत कमी आहे  जगात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या अस्नणाऱ्या आपल्या
भारतातील राजकारण कोणत्या मुद्यावरून खेळण्यात येते हे आपण जाणतातच आपण आपल्या राजकारणी लोकांना तुम्ही हवामानबदलाविषयी काही बोलले तरच आम्ही तुम्हला मत देऊ अशी लोकचळवळ उभी रहाण्याची नीता आवश्यकता असल्याचे भारतातील निसर्गाचा प्रकोप बघता सहजतेने लक्षात येते 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?