मनाच्या माध्यमातून व्यक्तीमत्तवाचा ठाव घेणारी कार्यशाळा ...युवा स्पंदन


आपल्या सभोवताली व्यक्तीच्या बाह्यरुपावरुन व्यक्तीमत्वाचा ठाव अनेकदा घेतला जातो.यामुळे बाह्य कपडे  कसे असावेत ? चेहऱ्यावर खोटे खोटे का  असेना हास्य कसे ठेवावे ? याबाबत अनेक कार्यशाळा सातत्याने होत असल्याचे आपण पहातो.मात्र आपल्या शाररीक हालचालीवर, देहबोलीवर प्रचंड नियंत्रण असणारा आणि  सहजतेने न दिसणारा घटक म्हणजे मन. आपल्या इतिहासातील अनेक महान व्यक्तींचा जीवनक्रम अभ्यासल्यास त्यांनी मनाचा चांगला अभ्यास केल्याचे दिसून येते.मात्र सध्या मन हा विषय काहीसा दुर्लक्षीला गेला आहे. आपल्या व्यक्तीमत्वावर प्रचंड परीणाम करणाऱ्या या घटकावर काही मोजक्या संस्थाच काम करतात .अस्या मोजक्या संस्थांमध्ये नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या अमोल कुलकर्णी यांच्या मनोवेध फाउंडेशचा उल्लेख करावाच लागेल. या संस्थेमार्फत लोकांना शिबिराच्या माध्यमातून वारंवार मनोव्यापाराचा आपल्या व्यक्तीमत्वावर काय परीणाम होतात?  चांगल्या व्यक्तीमत्व असणाऱ्या व्यक्तीची मनोवस्था काय असते? सकारात्मक मानसिकता म्हणजे काय? दुर्बल मानसिकता म्हणजे काय ? ती कसी ओळखावी? अस्या विविध विषयांवर माहिती देण्यात येत असते.
      नूकतेच असे शिबिर त्र्यंबकेश्वरपासून 6किमी अंतरावर असलेल्या पिंपळद येथील विवेकानंद केंद्र सेवा प्रकल्पाचा निसर्गरम्य , टेकडीने आच्छादलेल्या, शांत रमणीय ठिकाणी झाले . तीन दिवस झालेल्या या शिबिरासाठी वयवर्षे 15 पासून 65 पर्यतच्या वयोगटातील  महाविद्यालयातील व्याख्याते, आयुर्वेद डाँक्टर, आयटी क्षेत्र, एल आय सी एजंट  अस्या  विविध व्यवसायात कार्यरत असणाऱ्यासह शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झालेल्या मोठ्या व्यक्तींसह गिटार वादन करणारे ,हाँलीबाँल  खेळणाऱ्या, तसेच अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या  शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच गृहिणी आदी समाजातील सर्वच लहानथोर  शिबिरार्थी सहभागी झाले होते.एकुण 19 शिबिरार्थी या शिबिरात सहभागी झाले होते.हे शिबिरार्थी नाशिक शहराच्या विविध भागासह ओझर कसबे सुकेणे आदी नाशिकच्या सभोवतालच्या  ग्रामीण भागात राहणारे होते.एक महिला  शिबिरार्थी ठाणे शहरातून सहभागी झाल्या होत्या.या 19 शिबिराथींपैकी एक मी होतो  मानसशात्रविषयक अनेक बाबी मला या शिबिरात माहिती झाल्या 
          प्राचीन समृद्ध वैभवशाली भारतीय संस्कृती ची भारतीयांसह जगाला नव्याने ओळख करून देणाऱ्या, आपले विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह अनेकांच्या प्रेरणेचे स्त्रोत, सर्व परीत्याग केलेला व्यक्ती ही साधूची पारंपरिक भुमिका बदलून त्याला समाजसेवेची जोड देणाऱ्या (रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन)स्वामी विवेकानंद  यांच्या नावे असलेल्या या वास्तूत शिबिरार्थी यांनी अहंकार (इगो) आणि स्वाभिमान (सेल्फ इस्टिम) यातील फरक काय ?आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक असते? अहंकाराचे प्रकार काय असतात?प्रत्येक प्रकाराची गुणवैशिष्ट्ये काय असतात. या प्रकारच्या व्यक्तीमत्तवाच्या व्यक्ती जीवनात कस्या प्रकारे अयशस्वी होतात?अहंकाराचा ऐवजी स्वाभिमान अंगी कसा बाणवावा? स्वाभिमान असणाऱ्या व्यक्तीची कोणती गुणवैशिष्ट्ये असतात. या प्रकारच्या गुणवैशिष्ट्ये असल्याने जीवन कसे योग्य होते. स्वप्न (dream) आणि ध्येय (goal) यातील फरक ?जीवनात यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे. ते अंगी कसे बाणवावे? याविषयी तसेच जीवनात अचानकपणे कठीण प्रसंगालग सामोरे जावे लागले ?,तर काय करावे याचे प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण घेतले.शिबिरात एकाग्रता आणि स्मरणशक्तीवर आधारित मानसिक खेळ आणि शारीरिक खेळांचा मनमुराद आनंद शिबिरार्थींनी घेतला.
    या शिबिरार्थी नी स्वतः अनेक जवाबदाऱ्या घेतल्या.यावेळी चांगल्या कामासाठी चाँकलेटचे बक्षीस तर चुकीच्या कामासाठी प्रातनिधीक स्वरुपात कापसाची हातोडी डोक्यावर मारण्याची शिक्षा शिबिरार्थींना देण्यात आल्या.एकंदरीत माझ्यासह सर्व शिबिरथींना खूप काही या शिबिरातून शिकायला मिळाले असे म्हणटल्यास वावगे ठरू नये 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?