मानवा तूझी वेळ संपत आहे

     

पावसामुळे इशान्य भारतात गेल्या आठवड्याभरात १२५ लोकांचा मृत्यू,  पावसाने ओढ दिल्यामुळे तूर्कीये (पुर्वीचे नाव तूर्की) , देशात आणिबाणी जाहिर करण्याची स्थिती, बदलत्या हवामानामुळे लोकांच्या ताणतणावात वाढ झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे निरीक्षण, आसाम आणि मेघालयमध्ये जून महिन्यात सरासरीच्या १३४% पाउस, सुमारे २५% ,बांगलादेश पुरामुळे पाण्याखाली {६४पैकी१७ जिल्हे}, मेस्किकोमध्ये दुष्काळामुळे पाण्याचे रेशनिंग करायची वेळ सरकारवर .या बातम्या आहेत, जूनच्या तिसऱ्या आठवड्यात बदलत्या हवामानामुळे लोक कसे अडचणीत आलेले आहेत, हे सांगणाऱ्या.
       हवामान बदल या संकटावर मात करण्यासाठी मानवाचा हाती असणारा वेळ झपाट्याने संपत आहे. हेच या बातम्यांमधून दिसून येत आहे. आपल्या महाराष्ट्रात इतकी वाईट स्थिती आलेली नसली तरी ही अशी वेळ आपल्यावर येणारच नाही, असे समजणे म्हणजे मुर्खांचा नंदवनात राहण्यासारखे आहे. आपण या संकटाला सामोरे जाण्यासाठी तयारी करण्यातच शहाणपण आहे. प्रशासन त्यांचा स्तरावर प्रयत्नशील आहेच मात्र सर्वसामन्य जनतेने देखील असी स्थिती उदभवलीच तर गोंधळून न जाता या स्थितीला धैर्याने सामोरे जाण्याची गरज आहे. हे धैर्य मिळवण्यासाठी सर्वसामान्य जनतेने प्रयत्न करायला हवेत.जर सध्या आसाम मेघालय  या राज्यांबरोबर बांगलादेश या देशात जशी पुराची अभूतपूर्व स्थिती उद्भवली किंवा तुर्कीये (पूर्वीचे नाव तुर्कि )सारखी पावसाने ओढ दिली तर दोन्ही वेळेस करावयाच्या गोष्टी आणि टाळायचा गोष्टी कटाक्षाने अमलात आणावयास हव्यात . किमान याची माहिती घेण्यासाठी सामान्य व्यक्तीने प्रयत्नशील राहिले पाहिजे
सध्याचे हवामान बदलाचे संकट समस्त मानवजातीसमोरील संकट आहे हे संकट एखाद्या धर्माच्या किंवा जातीच्या माणसावर कमी प्रमाणत कोसळेल तर दुसऱ्या धर्माच्या जातीच्या लोकांवर कमी प्रमाणात कोसळेल असे नाही . निसर्गाला मानवाचे धर्म आणि जाती हे मानवाने केल्ले भेद समजत नाही निसर्गला फक्त त्याच्याशी जुवळुन घेणारे आणि त्याच्याशी जुवळुन ना घेणारे हे दोनच फरक कळतात . त्याला अनुकूल भूमिका घेणाऱ्या लोकांना तो काही करत नाही तर त्याच्या विरोधात जाणाऱ्या लोकांना तो त्याचा प्रसाद देतो सध्या निसर्ग मानवाच्या विविध कृतीमुळे आपल्यावर प्रचंड नाराज आहे त्यामुळे आपण निसर्गपूरक आचरण केले पाहिजे  
   सध्याचा तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञानाने आपले जीवन खूपच बदलले आहे ते पूर्वपदावर आणणे अशक्य आहे मात्र विज्ञानाने दिलेल्या सोयीसवलतीचा फायदा घेत निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचवण्याचा प्रयत्न आपण नकीच करू शकतो आणि असे प्रयत्न  करण्यातच    आपल्या समस्त मानवजातीचे कल्याण आहे


(हि माझी  999 वी  ब्लॉगपोस्ट आहे )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?