आपण तयार आहोत का ?

    

        बुधवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार  रात्री अडीचच्या सुमारास अफगाणिस्तानमध्ये ५पुर्णांक शतांश रिक्टर स्केलचा भुकंप झाला.ज्यामध्ये एक हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. अफगाणिस्तानमधील ज्या भागात भूकंप झाला त्या भागात भुगर्भ तज्ज्ञांच्या मते छोटे भुकंप होवू शकतात.मोठ्या तिव्रतेचे भुकंप त्या भागात  अतिशय अपवादात्मक स्थितीत होवू शकतात. तरी देखील त्या भागात मोठा म्हणता येईल असा५ पुर्णांक ९शतांश तिव्रतेचा भुकंप झाला.या भुकंपामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नांचा उहापोह करण्यासाठी हा लेखप्रपंच
        भुगर्भतज्ज्ञांंनी या आधी अनेकदा इशारा दिला आहे की, उत्तर भारतात गंगेच्या आणि सिंधू नदीच्या खोऱ्यात खुप मोठ्या तीव्रतेचा सात ते साडेसात रिक्टर स्केल तीव्रतेचा भुकंप येवू शकतो.मात्र सध्याची उत्तर भारतातील सामाजिक, आणि प्रसाशनाची त्या वेळी दृष्टीने किती तयारी आहे?याचा आढावा घेतल्यास समोर येणारे चित्र फारसे आशादायक नाही. किमानपक्षी प्रसाशनाची तयारी असेल देखील ,मात्र सामाजिक तयारी काहीच नाही, हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही. दिल्लीत काही दिवसापूर्वी दोन मोठ्या
आगीच्या
घटना घडल्या. त्यामध्ये अग्नीशामक यंत्रणांना दुर्घटना स्थळी पोहोचण्यासाठी, बराच खटाटोप करावा लागला. पिंडी ते ब्रम्हांडी, पळसाला पाने तीनच या म्हणीप्रमाणे सर्व भारतात सर्वसाधारण असीच स्थिती आहे.त्यामुळे भुकंपाची घटना घडल्यास बचावकार्यात मोठ्या प्रमाणात अडथळा येणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे. या अडचणीवर देखील मात करता येवू शकते.मात्र याबरोबरच या दुर्घटनांना सामोरे जाण्यासाठी, समाजाला तयार करण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. दुर्घटना घडल्यावर आपण बचाव कार्य उत्तम स्थितीने करु, मात्र दुर्घटना घडल्यावर बचाव कार्याला काही वेळ लागेल. या दरम्यान काही जीव प्राणास मुकु शकतात. ते टाळण्यासाठी समाजाला शिक्षण देणे अत्यावश्यक आहे, आणि तिथेच अडचण आहे. दुर्घटनेला सामोरे जाण्याचे आपले सामाजिक भान खुपच कमी आहेसोशल मिडीयाद्वारा फारसी शहानिशा करता, शाळेत शिकवण्यात येणारे मुलभुत विज्ञान सुद्धा विचारत घेता मेसेज फाँरवर्ड करणे आणि गरजूंना मदत करण्याचा उत्साहात नविन प्रश्न निर्माण होण्याचा धोका आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे.
.        कित्येक लाखो  वर्षापासून भारतीय प्लेट  ही युरेशिया प्लेटच्या खाली जात आहे त्यामुळे सदर भागात भुकंपाच्या धोका होताच त्यातच  सध्या विविध कारणांमुळे पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जगभरात होणाऱ्या ज्वालामुखी उद्रेकाच्या घटना ,भुकंपाच्या घटना वाढलेल्या घटना बघता ही गोष्ट सिद्ध होत आहे. या पार्श्वभूमी.वर उत्तर भारताच्या बाबतीतील भुकंपाचा धोका सातत्याने वाढत आहे. मात्र याबाबत आपली उदासिनता पुर्वी आहे, तसीच आहे किंबहुना वाढतच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये.हा धोका ज्या भागात आहे, तेथील राजकारणी त्यांचा राजकरणासाठी कोणत्या मुद्यांचा वापर करतात .भूकंपापामुळे होणाऱ्या विध्वंसाला सामोरे जाण्यासाठी आपला भाग किती सक्षम आहे याबाबत तेथील राजकारणी किती बोलतो याचा विचार करता समोर येणारे चित्र फारसे अनुकूल नाहीये एखादी दुर्घटना घडल्यावर काही काळ नगरविकास
खात्याला जवाबदार धरून प्रश्न विचारले जातात कालांतराने हे मुद्दे लोक विसरतात आणि नेहमीचे मुद्दे चर्चेत येतात
 त्यामुळे पुन्हा एकदा अशी दुर्घटना घडू नये यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या याची माहिती कधीच समाजासमोर येत नाही ज्या चित्रात बदल होणे आवश्यक आहे.नागरीकांनीही रोजच्या जगण्यात आवश्यक असणाऱ्या गोष्टींबाबत आपण ज्यास मत देवू इच्छितो, ती व्यक्तीची काय मते धारणा आहेत. याचा विचार करुणच मत देवयास हवे.काही वर्षांपूर्वी उत्तराखंड राज्यात लोक प्रार्तविधी करतात ,म्हणून उत्तराखंड राज्यात भुस्खलन होते असे विधान केले होते.अस्या लोकांना जर सत्तेपासून दूर ठेवलेतर आणि तरच अफगाणिस्तान सारखा मोठ्या तिव्रतेचा भुकंप होवूनसुद्धा आपल्याकडे तूलनेने कमी हानी होईल.
 
ही माझी  एक हजारावी ब्लॉग पोस्ट आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?