भारताची ताकद अखेर जगाला मानवीच लागली !

         

 
   भारत उभरती महासत्ता आहे ,तिचे महत्व कमी करून, तिला जागतिक व्यासपीठावरून डावलून ,जगाचे घोडे पुढे चालू शकणार नाही याची अखेर उपरती झाल्याने जर्मनीकडून त्यांच्या देशात होणाऱ्या जी ७ या परिषदेच्या अधिवेशनासाठी  अखेर भारताला बोलवणे आले . २६ आणि २८ जून २०२२ या दरम्यान जर्मनीतील बवेरियन आल्प्स च्या श्लॉस एल्मौ येथे हे अधिवेशन  होईल  हे  जी ७  परिषदेच्या अधिवेशनाचे ४८ वे अधिवेशन असेल रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतरच्या काळात होणारे हे पहिलेच जी ७ चे अधिवेशन असेल  . भारताने संयुक्त राष्ट्रसंघात रशियाविरुद्धच्या प्रस्तावावर पश्चिम युरोपीय देशांना पूर्णपणे अनुकूल होईल अशी भूमिका ना घेतल्याने या वेळेस भारताला जी ७ परिषेदेच्या अधिवेशनात सहयोगी सदस्य म्हणून  बोलवायचे का ? यावरून  ७ देशांमध्ये मतभेत झाले होते.  मुख्य आयोजक असलेला जर्मनीचे मत भारताला न बोलवायचे असे  होते  त्यावरून तीन महिन्यापूर्वी बराच वादंग झाला होता .अखेर अंत भला तो सब भला या हिंदी वावयप्रचारानुसार जी ७ च्या ४८ व्य अधिवेशनासाठी भारताला  आमंत्रण देण्याचे ठरले २६ ते २७ जून दरम्यान जर्मनीत होणाऱ्या अधिवेशनासाठीपंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे प्रतिनिधित्व करतील. या अधिवेशनासाठी भारताबरोबर इंडोनेशिया दक्षिण आफ्रिका आणि सेनेगल या देशांना देखील आमंत्रण देण्यात आले आहेसन २०१७ पासून होणाऱ्या अधिवेशनाचा विचार करता भारताला सहयोगी आमंत्रित सदस्य म्हणून बोलवायचे हे सलग चौथे वर्ष आहे

             जगातील प्रमुख मोठ्या ताकदवान  अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांची संघटना म्हणजे जी   होय .संघटना स्थापनेच्या वेळी तिच्यात देश होते कालांतराने अमेरिकेच्या प्रभावाखालील या संघटनेत रशियाचा देखील समावेश करण्यात आला आणि जी चे रूपांतरण जी मध्ये झाले मात्र रशियाने २०१४ ला यूक्रेनवर आक्रमण करून त्यांच्यायुक्रेनच्या दक्षिण पूर्वेला देशाच्या मुख भूमीपासून काहीसा दूर एका बेटाच्या स्वरूपात असलेल्या क्रिमियाचा ताबा घेतल्यानंतर   रशियाला या संघटनेतून बाहेरचा रास्ता दाखवण्यात आला ज्यामुळे  जी चे रूपांतरण पुन्हा जी मध्ये झाले आजमितीस संयुक्त संस्थाने अमेरिका , कॅनडा या अमेरिका खंडातील देशांसह आशिया खंडातील जपान तसेच युरोप खंडातील युनाटेड किंग्डम , जर्मनी , फ्रांस आणि इटली या देशांसह युरोपीय युनियन या संघटनेचे सदस्य आहेत सदस्य असलेल्यांपैकी युरोपीय युनियन हा कोणताही एक देश नाहीये तर युरोपातील देशानी  आर्थिक हितसंबंध आणि अन्य प्रकारचे हितसंबंध निर्माण करण्यासाठी केलेली संघटना आहे मी जरी अन्य प्रकारचे हितसंबंध असा उल्लेख केलेला असला तरी या संघटांचेच आत्मा आर्थिक हितसंबंध हाच आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे आजमितीस युरोपीय युनियनचे २७ पूर्णवेळ सदस्य आहेत आणि युक्रेन, उत्तर मॅसेडोनिया तसेच  मोल्दोव्हा या प्रमुख देशांसह एकूण देश सदस्यत्वासाठी पूर्ण कारवायांच्या कार्यवाहीत विविध टप्यावर आहेत

  जी देशातील औद्योगिक उत्पादनासाठी भारताची बाजरपेठ अत्यंत महत्त्वाची आहे भारतातील  लोकांची वाढलेली क्रयशक्ती या देशांसाठी बाजारपेठ तयार करते त्यामुळे भारत या देशांसाठी अत्यंत महत्वाचा देश आहे या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या वर्षी, यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इटालियन पंतप्रधान मारियो द्राघी, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि यूएस अध्यक्ष जो बिडेन उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवेशनात जागतिक सुरक्षा हवामान बदल , सह आर्थिक स्थैर्य यावावर विचार मंथन होण्याची शक्यता आहे काही दिवसापूर्वीच अमेरिकेच्या पूर्णतः तज्ञाच्या मते जागतिक महामंदी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर ही परिषद अत्यंत महत्वाची आहे  भारत उभरती महासत्ता आहे ,तिचे महत्व कमी करून, तिला जागतिक व्यासपीठावरून डावलून ,जगाचे घोडे पुढे चालू शकणार नाही याची जाणीव जागतिक नेत्यांना झाल्याचे भारताला आमंत्रण देण्यावरून दिसून येत आहे हे नक्की

ही माझी एक हजार दोन वी ब्लॉगपोस्ट आहे 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?