भारताचे आखाती देशाशी संबंध दृढ होणार !

       

   गेल्या काही महिन्याचा आढावा घेतला असता, मोदी सरकारतर्फे अनेक देशांशी नव्याने परराष्ट्र संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला अजात आहे या २०२२ वर्षी १ जानेवारीपासून अनेक देशाचे प्रमुख , परराष्ट्र आणि सरंक्षण  भारतात येऊन गेले  ऑस्ट्रेलियाचे विद्यमान सरंक्षण मंत्री , बांगलादेशचे सरंक्षण मंत्री जपानचे पंतप्रधान ,चीनचे परराष्ट्र मंत्री ,  युकेच्या सरंक्षण मंत्री ही त्यातील काही प्रमुख नवे .   भारताच्या राष्ट्रपती संरक्षण मंत्री , परराष्ट्र मंत्री पंतप्रधान यांनी मध्य आशिया , दक्षिणपूर्व आशियातील अनेक देश आपल्या शेजारील मालदीव श्रीलंका आदी अनेक देशांना भारताशी त्यांचे संबंध अधिक मैत्रीपूर्ण होण्याच्या उद्देश्याने भेटी दिल्या ऑस्ट्रेलियाचे जानेवारीमध्ये पंतप्रधान असणाऱ्या स्कॉट मॉरिसन आदी  नेक परदेशी नेत्यांनी भारताच्या नेत्यांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला . या मालिकेत आता  अजून  एक नवा समाविष्ट होणार आहे ते म्हणजे युनाटेड अरब अमिरात .
        युएई या आपल्या अद्याक्षरानी ओळखल्या जाणाऱ्या या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ७ परिषदेच्या जर्मनीतील अधिवेशनवरून येताना २८ जून रोजी एका दिवसाची धावती भेट देतील . भाजपाच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर तसेच  युएई देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष  तसेच दुबईचे राजे शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे निधन झाल्यानंतरचा कोणत्याही भारताच्या नेत्याचा हा पहिलाच युनाटेड अरब अमीरतचा दौरा आहे . युएई देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष  तसेच दुबईचे राजे शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या कार्यकाळात त्यांचे भारताविषयीचे धोरण खूपच अनुकूल होते त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या सम्मानार्थ भारताने आपल्या सरकारी इमारतीवरील आपला ध्वज
एका दिवसासाठी अर्ध्यावर  आणला होता तसेच भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांनी टीव्हीवरील एका चर्चेत   इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर त्या विधानाबाबत अत्यंत कडक प्रतिक्रिया युएई कडून देण्यात आली  होती तसेच भारताने जम्मू काश्मीरच्या संदर्भातील संविधानातील कलम ३७० रद्द केल्यानंतर युएई हा इस्लामी जगतातील पहिला देश होता ज्याने श्रीनगरमध्ये स्पेशल इकॉनॉमिकल झोन उभारण्यासाठी रुची दाखवली होती भारताच्या जागतिक स्तरावर होणाऱ्या व्यापाराचा विचार करता अमेरिकेनंतर सगळ्यात जास्त निर्यात ही युनाटेड अरब अमिरात होते जगात अधिकृतपणे २१० देश आहेत त्यातील भारताची दुसऱ्या क्रमांकाची निर्यात ही युनाटेड अरब अमिरात या देशात होते 
         तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्यात विशेष मेहनत घेऊन आखाती देशांमध्ये केलेल्या इब्राहिम अकोर्ड द्वारे इस्रायलला मान्यता देणारा पहिला देश हायुनाटेड अरब अमिरात होता राजैतिक मान्यता देण्यात आल्यानंतर या देशाशी व्यापारी संबंध देखील आजमितीस युनाटेड अरब अमिरातने केले आहेत भारताचे पूर्वापार इस्राईल आणि युनाटेड अरब अमिरात या दोन्ही देशांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत . दोन वर्षापूर्वीपर्यंत त्यांच्यात काहीसे शत्रुत्वाचे संबंध होते यूएईच्या पासपोर्टवरवर अधिकृतपणे हा पासपोर्ट इस्राईलसाठी वैध नाही अशा उल्लेख असे जो आता नाही भारताच्या दोन मित्र देशांमध्ये निर्माण झालेल्या या मैत्रीपूर्ण संबंधाच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे बघावे लागेल .(किंबहुना या करारामुळे मध्य आशियातील प्रत्येक देशाशी परराष्ट्र धोरणाचा विचा करताना याचा विचार करावाच लागेल अशी सध्याची स्थिती आहे ) अनेक भारतीय
युएई या देशात वास्तवावयास आहेत केरळची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात या भागातून येणाऱ्या परकीय पैशावर आधारित आहे.  पाकिस्तान  ऑर्गनझेशन ऑफ इस्लामिक कंट्री या इस्लाम हा धर्म प्रमुख राजकीय धर्म असलेल्या देशांच्या संघटनेत सातत्याने काश्मीरविषयी भारतविरोधी गरळ ओकत असला तरी युनाटेड अरब अमिराने काश्मीर हा  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतर्गत मुदा आहे अशी भूमिका घेतली आहे तसेच त्याने नुकतीच  पाकिस्तानला कर्ज देण्यास देखील नकारघंटा वाजवली आहे हे आपण लक्षात घेयला हवे 
एकंदरीत भारताचे महत्व जागतिक स्तरावर मान्य करण्यात आले आहे हेच या घडामोडीतून स्पष्ट होत आहे 

ही माझी एक हजार चार  वी ब्लॉगपोस्ट आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?