सिंह हा सिंहच असतो .......

     

     सिंह हा सिंहच असतो  वय झाले म्हणून त्यांचा लांडगा किंवा तरस होत नाही .......  कितीही वय झाले तरी जंगलाचा राजा सिंहच असतो कोल्हा किंवा हरीण त्याची जागा घेऊच शकत नाही . सिंह हा निर्विवादपणे जंगलाचा राजा असतो हे पुन्हा एकदा भारतीय बुद्धिबळ विश्वात सिद्ध झाले आहे . भारतातील पहिले ग्रँडमास्टर आणि विद्यमान फिडे गुणकांचा विचार करता पहिल्या क्रमकाचे गुणांकन असलेल्या विश्वनाथन आंनद यांनी नुकत्याच झालेल्या स्पर्धेद्वारे ते सिद्ध केले आहे पाच महिन्यांनंतर पुनर्गमन करत आनंद यांनी आपल्यात अजूनही बुद्धिबळाचा खेळ शिल्लक असल्याचे आणि अजून काही वर्ष तरीखेळातून निवृत्ती घेणार नसल्याचे दाखवूंन दिले आहेत बुद्धिबळासह कोणत्याही खेळात कारकीर्द करण्याचे एक विशिष्ट वय असते बुद्धिबळ देखील त्यास अपवाद नाही बुद्धिबळ हा बैठा खेळ असला तरी बुद्धिबळ खेळण्यासाठी आवश्यक असणारी मानसिक क्षमता , विश्लेषणाची क्षमता , आणि अन्य शारीरिक क्षमता जसे तासनंतास बसण्याची क्षमता आदींचा विचार करता अन्य खेळांप्रमाणेच खेळाडूंना हा खेळ सोडावा लागतो अन्य खेळाच्या तुलनेत बुद्धिबळ सोडण्याचे वय थोडे जास्त असले तरी एका विश्वस्थ वयानंतर हा खेळ सोडावाच लागतो विश्वनाथन आनंद वयाच्या याच टप्यावर आहेत मात्र एखद्या कसलेल्या
पहिलवानांप्रमाणे बुद्धिबळ क्षेत्रात अजूनही घट्ट पाय रोवून बसले आहेतty यांच्यातील खेळाची ताकद अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे जी गोष्ट खरोखरीच कौतुकास्पद आहे 
       विश्वनाथन आनंद   सुपरबेट रॅपिड आणि ब्लिट्झ 2022 मध्ये अप्रतिम बुद्धिबळ खेळले या स्पर्धेच्या . शेवटच्या दिवशी खेळवलेल्या गेलेल्या डावांमध्ये  त्यांना दोन पराभव  बघावे लागले असले तरी आणि एक डाव अनिर्णित राहिला असला तरी , त्यानी उर्वरित खेळात  चिकाटी ठेवली आणि पुढील सहा डावात   4 गुण मिळवले. त्यांनी या स्पर्धेत खेळवलेल्या ३६ डावात साडे  तेवीस वीस  गुण मिळवले  मात्र , जॅन-क्रिझिस्टोफ डुडाने पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण शेवटच्या फेरीत विजय मिळवून ही स्पर्धा ३६ डावात २४ गूण मिळवत जिंकली ते या स्पर्धेत लेव्हॉन अरोनियनसह स्पर्धेत दुसऱ्या स्थानी राहिले  ही स्पर्धा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पार पडली 
सध्या नॊर्वे बुद्धिबळ स्पर्धा सुरु आहेत या ठिकाणी सुद्धा ते लक्षणीय खेळाचे प्रदर्शन करत आहेत विशवनाथांन आनंद यांनी १ जून रोजी खेळवल्या गेलेल्या  सलग डावात दुसरा विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी, वेसेलिन टोपालोव यांच्यावर विजय मिळवून, या विजयामुळे त्यांना  जागतिक शीर्ष 10 क्रमवारीत पुन्हा प्रवेश करण्यासाठी पुरेसे गुणकांन   मिळाले. त्याचे सध्याचे गुणांकन  रेटिंग आता 2760.7 आहे ज्यामुळे त्याचा सध्याचा क्रमांक 9 आहे. या आधी खेळल्या गेलेल्या डावात  विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याना  हरवलेले होते (  वेस्ली सोने यांनी सुद्धा मॅग्नस याना पराभवाची चव चाखायला लावली त्यामुले विद्यंमान बुद्धिबळ विश्वविजेता मॅग्नस यानातीन दिवसता
ओंड पराभव बघावा लागला आहे )  या विजयामुळे पारंपरिक प्रकारातील ( बुद्धिबळाच्या क्षेत्रात क्लासिकल नावाने परिचित ) या खेळप्रकारासहजलद ( रॅपिड ) आणि अति जलद * ब्लिटीझ ) या तिन्ही प्रकारात आपण अजून विजयाचे दावेदार असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे 
     आपल्याकडे वैयक्तिक खेळामध्ये प्रामुख्याने शारीरिक क्षमता जोखणाऱ्या भालाफेक गोळाफेक किंवा बँडमिंटन सारख्या खेळांना अधिक उत्तेजन मिळते मात्र या खेळाच्या स्पर्धांमध्ये प्रेक्षकांचा फारसा  सहभाग नसतो तसे बुद्धिबळाचे नाही बुद्धिबळाच्या स्पर्धांमध्ये खेळाडूंचे डावा मोठ्या पडद्यावर दाखवले जातात ज्यामुळे ते डावा बघता प्रेक्षकसुद्धा पुढची खेळी काय असेल याचा अंदाज बांधत खेळाडूंबरोबर अप्रत्यक्षरीत्या खेळायला लागतात असा प्रेक्षकांचा सहभाग अन्य खेळात नसतो त्यामुळे बुद्धिबळाला खेळांचा राजा असे म्हटल्यास वावगे ठरू नये या खेळाच्या राजाला विश्वनाथ आनंद यांच्या या यशामुळे सिहांसन मिळाल्यास तो क्षण प्रत्येक क्रीडाप्रेमींसाठी आनंदाचा असेल यात शंका नाही 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?