भारताच्या पराष्ट्र धोरणात बदलाचे वारे


भारताच्या परराष्ट्र धोरणात येत्या काळात आमूलार्ग बदल होणार आहेत  याची साक्ष देणाऱ्या घटना सध्या नवी दिल्लीत आकारास येत आहेत १९ जून रोजी  भारत आणि बांगलादेश या दोन देशात  Joint Consultative Commission चे आयोजन नवी दिल्लीत करण्यात आले होते यामध्ये दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करण्याबाबत  आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ के अब्दुल मोमेन यांच्यात चर्चा करण्यात आली यावरील शाई वाळते वाळते तोंच  ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान  जे त्यांचे सरंक्षण मंत्री देखील आहेत असे  रिचर्ड मार्ल्स २० ते २३ जून दरम्यान भारताच्या भेटीवर आले आहेत

       मागच्या महिन्यात २३ मे रोजी पदाची सूत्रे हाती घेतल्यवरचा त्यांचा हा पहिलाच दौरा होता दौऱयावर जाण्याआधी ऑस्ट्रेलियात पत्रकारांना संबोधित करताना ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्सयांनी सांगितले कीभारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण संबंध वाढवण्यात मंत्री राजनाथ सिंग यांचा मोलाचा वाटा आहे आणि आमच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा संरक्षण स्तंभ वाढवण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”  भारत हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वात जवळच्या सुरक्षा भागीदारांपैकी एक आहे आणि भारत-पॅसिफिकमधील आमच्या भागीदारांसोबत ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिकदृष्ट्या सखोल संबंधांना पुनरुज्जीवित करण्यावर सरकारचा भर आहे. “हिंदो-पॅसिफिकमध्ये अनेक दशकांपासून शांतता आणि समृद्धी आणणाऱ्या नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्थेवर दबाव येत आहे, कारण आम्हाला भौगोलिक व्यवस्थेत बदल होत आहेत,”  

    ऑस्ट्रेलिया खुल्या, सर्वसमावेशक आणि लवचिक इंडो-पॅसिफिकच्या समर्थनार्थ भारतासोबत काम करण्यास तयार आहे.त्यांच्या या वक्तव्यना केवळ ते भारताच्या दोऱ्यावर जात असल्याने वक्तव्य म्हणून बघता येणार आहे सध्या ऑस्ट्रेलियात साताधिकारी असणारा लेबर पक्ष आणि सध्याचे पंतप्रधान सत्तेत येण्यापासूनच कितीतरी आधीपासून भारताला साह्य करणाऱ्या भूमिकेसाठी ओळखले जातात    विविध भारतीय उदयॊगपतींबरोबरचे सध्याच्या पंतप्रधानाचे  फोटो या आधी  अनेकदा विशेष चर्चेत आले होते . त्यांच्याच पक्षाचे सरकार न्यू साऊथ वेल्स या प्रातांत असतांना भारतीय उदयॊगसमूह अदानी  यास कोळशाचे कंत्राट राज्य सरकारकडून मिळाले होते  

सध्या ऑस्ट्रेलिया या देशाबरोबर  भारताचे संबंध अत्यंत उत्तम स्थितीत आहेत परस्परांच्या विकासाचे अनेक प्रक्लप सध्या विविध स्तरावर कार्यान्वित झाले आहेत भविष्यात देखील अनेक प्रकल्प सुरु कारण्याबात बोलणी सुरु आहेत या २०२२ वर्षाच्या सुरवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यावेळचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिशन यांच्यात झालेल्या ऑनलाईन संवादात अनेक नवीन प्रकल्पचि घोषणा करण्यात आली  होती  त्यावेलो भारतीय चलनातील १५०० करोडच्या मदतीमध्ये सौर पॅनलइलेट्रीक कार , मोबाईल या सारख्या उपकरणाच्या निमिर्तीसाठी अत्यंत महत्वाचा असणाऱ्या लिथियम सारख्या धातूच्या बाबत भारत सक्षम होण्यासाठी करावयाच्या संशोधनासाठी तसेच प्रदूषणविरहित ऊर्जा निर्मितीसाठी भारताची प्रगती होण्यासाठी १९३ करोड रुपयाची तरतूद केली होती ३६ कोटी रुपये दोन्ही देशांनी एकत्रितरित्या राबवायच्या अवकाश संशोधनासाठी तर १५२ कोटी रुपये भारत ऑस्ट्रेलिया सहकार्य केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आले  या सहकार्य केंद्रामार्फत परस्पर सांस्कृतिक आदानप्रदान , व्यापारी संबंध वाढवणे , तसेच शिष्यवृत्ती देणे ही कार्ये करण्यात येतील ९७ कोटी रुपये व्यापरात सहकार्य कोशल्य विकास आणि संशोधनासाठी राखून ठेवण्यात आले आहेस्ट्रेलिया  नेटवर्क जाणीव प्रसारभारती यांच्यात मेमरिंदम ऑफ अंडरस्टँडिंग अर्थात एम यु करण्यात आले आहे ज्यानुसार डीडी नॅशनल आणि डीडी सह्रयाद्री या दोन वाहिन्यांचे कार्यक्रम  ऑस्ट्रेलियात दाखवलेजाणार आहे त्या पार्शवभूमीवर आपण हे करार बघायला हवे 

    ऑस्ट्रेलिया भारताच्या चीनविरोधी कार्यक्रमचा मोठा साथींदार आहे तसेच कॉमनवेल्थचा देखील घटक आहे अनेक भारतीय ऑस्ट्रेलियात राहतात त्या पार्श्वभूमीवर या भेटीचे महत्व अन्यय साधारण आहे हे लक्षात येते भारताचे परराष्ट्र धोरण आता पूर्वीप्रमाणे मावळ ना राहता आक्रमक होत आहे याचीच ते साक्ष देत आहे बदलत्या भारताचे ते उत्तम प्रतीक आहे जे स्वागतार्ह्यच आहे यात शंकाच नाही 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?