स्वागतार्ह्य पाऊल

       

 लोकांच्या एकूण संख्येपेक्षा साडे अकारपट जास्त शस्त्रात्रे असणारा जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ४ टक्के लोकसंख्या असून देखील जगाच्या एकूण वैयक्तिक शस्त्रास्त्रांचा विचार करता ४६ टाके शस्त्रात्रे असणारा देश राज्यघटनेच्या दुसऱ्या घटना दुरुस्त्रीने नागरिकांना शस्त्रात्रे बाळगण्याचा अधिकार देणारा देश , आणि शस्त्रात्रे निर्माण करणाऱ्या  लोकांचा देशाच्या राजकारणात वरचष्मा असणारा देश म्हणजे अमेरिका आणि या अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी एक महत्वाचे राज्य म्हणजे न्यूयॉर्क.    अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार केंद्राला काहीसे मर्यादित अधिकार आहेत  तेथील राज्यांना अनेक विषयवार कायदे करण्याचा अधिकार आहेत त्याचाच फायदा घेत २ जून रोजी देशातील अन्य  राज्यांना पथदर्शी ठरेल असा कायदा या न्यूयॉर्क येथील सिनेटने केला  ज्यावर ६ जून रोजी तेथील गव्हर्नर असणाऱ्या कॅथी होचुल यांनी  स्वाक्षरी केल्याने त्याचे आता कायद्यात रूपांतर होईल
   .   न्यूयॉर्कच्या सिनेटमुळे केलेल्या कायद्यामुळे समस्त अमेरिकेपुढील मोठा यक्षप्रश्न झालेल्या गोळीबाराचा प्रश्न काही अंशी सुटला आहे   न्यूयॉर्कच्या सिनेटने केलेल्या कायद्यामुळे आता तेथील गनवापरावर अनेक बंधने आली आहेत टेक्सास या राज्यात एक नुकतेच प्रौढ झालेल्या एका युवकाने केलेल्या बेछूट गोळीबारामुळे अमेरिकेतील बंदुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणत चर्चेत आला होता त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन बायदन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी जाहीरपणे अमेरिकेतील बंदुकीच्या प्रश्नाबाबत ठोस काहीतरी करण्याची गरज व्यक्त केले होते अमेरिकेच्या   केंद्रीय सिनेटमध्ये सुद्धा अमेरिकेतच हा प्रश्न का निर्माण होतो या बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्या पार्शवभूमीवर डेमोकर्क्टिका पक्षाची  सत्ता असलॆल्या  न्यूयॉर्क राज्यात  तेथील सिनेटने केलेले हे
कायदअत्यंत स्वागतार्ह्य पाऊल म्हणूनच बघावे लागतील 
 न्यूयॉर्क राज्यात एक महिन्यापूर्वी एका विद्वेषातून वांशिकदृष्ट्या अल्पसंख्यतक असलेल्या  १० व्यक्तीची बंदुकीद्वारे हत्या केल्यानंतर न्यूयॉर्क राज्यात बंदुकीविषयीचे नियम कडक करण्याबाबची चर्चा मोठ्या जोरात करण्यात येत होती समजतील या चर्चेची दखल घेत तेथील सिनेटने हे कायदे समत केले हे एकूण १० कायदे असून यामुळे हॅन्डगन घेण्याचे वय आधीच २१ असलेल्या न्यूयॉर्क राज्यात    अर्धस्वयंचलित रायफल घेण्यासाठीचे वय सुद्धा १८ ऐवजी २१ वर्ष करण्यात आले आहे तसेच अर्धस्वयंचलित रायफल कोण घेऊ शकते याबाबतचे पात्रता निकष सुद्धा कडक करण्यात आले आहे तसेच पोलीस आणि त्यासारख्या कायद्यसुवस्था बघणाऱ्या अन्य व्यवसायात नसलेल्या लोकांना बंदुकीच्या गोळ्यांपासून सरंक्षण करणारे जॅकेट खरेदी करण्यावर यापुढे न्यू यॉर्कमध्येबंदी असेल तसेच सदर व्यक्तीकडून स्वतः किंवा समाजला धोका आहे असे न्यायालयास वाटले तर न्यायलायलाला संबंधित शस्त्र तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्याचा अधिकार या कायद्यांमुळे मिळाला आहे मागच्या महिन्यात न्यूयॉर्क राज्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या वेळी हल्लेखोराने बंदुकीच्या गोळ्यांपासून सरंक्षण करणारे जॅकेट वापरून गोळीबार केल्याने सरंक्षणच्या हेतूने बंदुकीच्या गोळ्यांपासून सरंक्षण करणारे जॅकेट वापरण्यास बंदी घालण्यात अली आहे
बंदूक वापरण्याचे वय किमान वय २१ केल्याने न्यूयॉर्क राज्य आता
फ्लोरिडा, हवाई, इलिनॉय, व्हरमाँट आणि वॉशिंग्टन या राज्याच्या यादीत आले आहे या राज्यात या आधीच बंदूक वापरण्याचे किमान वय २१ आहे यामध्ये अधिक राज्य सहभागी झाल्यास अमेरिकेतील बेछूट गोळीबाराचा प्रश्न सहज सुटण्यास नक्कीच मदत होईल आता न्यूयॉर्कचा कित्ता इतर कोणती राज्ये गिरवतात हे बघणे उत्सुकतेचे ठरेल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?