देवाने दिलेल्या संधीचा किती फायदा उचलणार आपण ?

       


 आपल्या जगात अधिकृतपणे २१० देश आहे त्यापैकी एक म्हणजे आपला भारत हा देश आहे जगातील सर्व धर्मियांच्या देवांचा विचार करता सर्व देवांचा या २१० देशांमध्ये अत्यंत आवडता देश आपला भारत देश असल्याचे वारंवार दिसून येत आहे. आपण मात्र या सुसंधीचा वापर करत स्वरक्षणार्थ काही करण्याऐवजी, सर्वकाही  देवाच्या भरोवश्यावर  सोडले असल्याचे चित्र आपल्या भारताच्या हवामान बदलाच्या संकटाच्या बाबतीत  कृती कार्यक्रम बघून वाटते आहे 

      आजमितीस जून२०२२ मध्ये चिली या देशात दुष्काळ पडून जवळपास १३ वर्षे झाली आहेत . सलग १३ वर्षे दुष्काळ पडल्याने येथील जंगलातील पाणवठे पूर्णतः सुकल्यात जमा आहे तेथील जंगलात फिरल्यास जागोजागी विविध मृत जनावरांचे अस्थिपंजर पडल्याचे दिसून येत आहे पाणवठे सुकल्यामुळे त्यावर अवलुबुन असणारे बोटिंग स्विमिंग या सारखे व्यवसाय पूर्णतः ठप्प पडले आहेत त्यावर पोट भरणारी जनता पूर्णतः बेरोजगार झाली आहे दक्षिण आणि उत्तर अमेरिकेचा एकत्रित विचार करता या खंडाच्या नैऋत्य दिशेला (दक्षिण पश्चिम ) पाऊस नसल्याने

जनता त्रासलेली असताना याच खंडाच्या वायव्य दिशेला ( उत्तर पश्चिम ) पावसाने जनजीवन ठप्प झाले आहे गेल्या ४५ वर्षात पहिल्यांदा अमेरिकेचे महत्त्वाचे अभयारण्य असेलेले यलो नॅशनल पार्क  पावसामुळे पूर्णतः बंद करण्याची नामुष्की अमेरिकेनं प्रशासनांवर आली आहे हा मजकूर लिहीत असताना यलो नॅशनल पार्क चे सर्वांच्या सर्व पाच दरवाजे बंद करण्यात आले आहेत तेथील नद्या मोठ्या वेगाने पात्राच्या बाहेर येत वाहत आहेत ज्यामुळे नदीकाठी असणाऱ्या मानवनिर्मित गोष्टी नष्ट होत आहे  ठिकाणी नॅशनल पार्कमधील डोंगरातून येणाऱ्या जोरदार प्रवाहामुळे डोंगरदऱ्यातून बांधलेला रस्ता ठिकठिकाणी खचला आहे ज्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून हंसाचा फक्त अंदाज घ्यावा लागतोय त्याची दुरुस्ती करणे किंवा मानवी बांधकामांला हानी पोहोचल्यामुळे होणाऱ्या मानवी जीवांची हानी किती झाली याचा फक्त अंदाज करावा लागतोय मदत पोहोचता येत नाही 

      मराठीत एक म्हण आहे पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने आपण या  अनुभवातून शहाणे होत स्वतःमध्ये बदल करायला हवेत मात्र त्या ठिकाणी आपल्याकडे खूपच शांतता आहे जगभरात विविध ठिकाणी निसर्ग ज्या प्रकारे आपले रौद्रस्वरुप दाखवत आहे त्या तुलनेत भारताबाबत   निसर्गाने खूपच दयाळूपणा दाखवला असल्याचे आपणास इतर भागातील या विषयीचा घटना अभ्यासल्यास आपणास सहजतेने लक्षात येते आपल्या महाराष्ट्रात मराठवाड्यात पावसाचे दुर्भिक्ष आहे मात्र जगभरातील अन्य क्षेत्रातील पावसाचे दुर्भिक्ष बघता मराठवाडा त्या तुलनेत खूपच समाधानकारक स्थितीत आहे आपल्याकडे पावास्मुळे महापुरामुळे विद्धवंस होणाच्या घटना तुलनेने अत्यंत
कमी आहेत या घटनेमुळे प्रभावित होणारा परिसर देखील फार मोठा नाही जगात याच्या तुलनेत एकाच वेळी मोठ्या संख्यने आणि विस्ताराच्या दृष्टीने देखील मोठ्या प्रमाणात मोठ्या असणाऱ्या प्रदेशात महापुरामुळे हानी होत आहे त्यामुळे जगातील सर्व धर्मियांचे सर्व देव भारताला सुधारण्यासाठी वारंवार संधी देत आहेतअसे म्हणण्यासारखी स्थिती आहे  मात्र आपण जेव्हा संकट येईल  तेव्हा बघू अशा काहीसा निष्कळाजीपणाचा अवलंब करत आहेत जे चुकीचे आहे आपण जर या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत राहिलो तर निसर्गाने भारताला रौद्ररूप दाखवल्यानंतर होणाऱ्या नुकसानीस आपणच जवाबदार असू निसर्ग नाही 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?