कथा महाराष्ट्राच्या टायटॅनिकची

आपल्या सर्वांना लंडन या शहरांतून न्यूयॉर्क या शहरांत जाणाऱ्या आणि दुर्घटनाग्रस्त झालेल्या टायटॅनिक या जहाजाची गोष्ट माहिती असेलच या जहाजाच्या दुर्घटनेवर  तयार झालेला चित्रपट देखील आपण अनेकदा बघितला असेल .मात्र या टायटॅनिकच्या जहाज दुर्घटनेशी  साम्य असणारी दृघटना आपल्या महाराष्ट्रत देखील घडली होती मात्र दुदैवाने या घटनेला टायटॅनिक या दुर्घटनेच्या  तुलनेत खूपच कमी प्रसिद्धी मिळालीएस एस रामदास बोट दुर्घटना या नावाने ओळखली जाणारी या दुर्घटनेला  भारताच्या नौदल इतिहासात एक मोठा काळा डाग म्हणून ओळखले जाते किमान नारळी पौर्णिमा झाल्याशिवाय समुद्रात जाण्यास अटकाव करणारा सध्याच्या निर्बध याच दुर्घटनेनंतर लागू करण्यात आला

  १७ जुलै १९४७आषाढ महिन्याच्या अमावास्येला मुबई पासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या दुर्घटनेत  ६०० लोकांना  प्राणास मुकावे लागले होते मृतांमध्ये बहुसंख्य कोकणात राहणारे  लोक होते काही ब्रिटीश लोक सुद्धा यात मृत्युमुखी पडेल मात्र त्यांची संख्या कमी होते बहुसंख्य भारतीयच होते . २०२२ साली या दुर्घटनेला  ७५ वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्याने या दुदैवी घटनेत प्राणास मुकलेल्या व्यक्तींना भावपूर्ण आदरांजली .मुबईच्या भाऊंच्या धक्क्यावरून सकाळी आठ वाजता ७५५ प्रवाश्याना घेऊन रेवस येथे निघालेल्या एस एस रामदास या बोटीला निघाल्यापासून एक ते दीड  तासात मुबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या  काश्याच्या दगड परिसरात जलसमाधी मिळालीबोटीवर असलेल्या व्यक्तीपैकी फक्त १५० जण या दुर्घटनेत  वाचू शकले .

 दुर्घटना  झाल्यानंतर लोक जिवाच्या आकांताने पोहत असताना उरणहून मुबईच्या दिशेने मासे विक्रीसाठी निघालेल्या पाच गलबतांना इतक्या  मोठ्या प्रमाणत लोक पोहायला कशी काय उतरली ?अशी शंका येऊन त्यांनी  प्रवाश्यांच्या जवळ नेऊन विचारले असता त्यांना या संकटाविषयी समजले आणि त्यांनी आपली सर्व मासळी समुद्रात फेकून लोकांना वाचवण्यास सुरवात केली त्यांनी वाचवलेले लोक आणि रेवस आणि मुबईच्या किनाऱ्यावर पोहून आलेले व्यक्तीच या संकटातून वाचू शकले बाकी सर्व समुदाच्या अथांग समुद्रात कयमस्वरूपासाठी गडप झाले

इंडियन को ऑपरेटीव्हीव स्टीम  नेव्हिगेशन कंपनी    असे मूळ नाव असलेल्या मात्र जनसाम्यात माझी  आगबोट कंपनी  या नावाने विख्यात असलेल्या या कंपनीचे  एस एस रामदास हे जहाज ११७९ फूट लांब , २९ फूट रुंद तीन मजली होते या जहाजावर हजार लोक प्रवास करू शकतील अशी सोय करण्यात आली होती दुर्घटनेच्यावेळी त्या जहाजवर ७५० लोक होते  त्यापैकी ६०० लोक मृत्युमुखी पडले . जी संख्या टायटॅनिकवर मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या तुलनेत निम्मी आहे ११ नोव्हेंबर १९२७ रोजी कोकण किनाऱ्यावर काही तासाच्या अंतराने बुडालेल्या एस एस जयंती आणि एस एस तुकाराम या जहाजांच्या एकत्रित मृत्युमुखी पडलेल्या लोकांपेक्षा हि संख्या जास्त आहे १९४२ च्या स्वदेशीच्या  धोरणामुळे प्रेरित होऊन काही लोकांनी ही कंपनी स्थापन केली होती एस एस रामदास ही बोट १९३६ साली स्कॉटिश लोकांनी तयार केलेली होती १९४२च्या वेळी दुसऱ्या महायुद्धात  लष्करी जहाज म्हणून सुद्धा वापरली गेली होत

दुर्घटनेच्या  दिवशी हवामान खात्याने वादळाचा कोणताही इशारा अंदाज दिल्याने रामदास बोट नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता प्रवाश्यास निघाली बोट प्रवाश्यास निघाली तेव्हा आकाश स्वच्छ होते पावसाळी ढग

आकाश्यात नव्हते . मात्र बोटीने जेमतेम १५ नॉटिकल मैलाचे अंतर (नॉटिलकल मैल ही समुद्रातील अंतर मोजण्यासाठी वापरत असल्याचे एकक आहे एक नॉटिकल मैल म्हणजे सुमारे पावणे दोन किलोमीटर ) पार केले असेलवेळ असेल सकाळी नऊ सव्वा नऊची हवामानाने अचानक आपले रंग बदललेलं आणि मोठ्या वादळाला सुरवात झाली एस एस रामदासवर मोठं मोठ्या लाटा आदळू लागल्या बोटीच्या डेकवर पावसाचे पाणी साठू लागले डेकवरील लोकांनी सरंक्षणासाठी जवळील पोते गोणपाट छत म्हणून ठेवले मात्र निसर्गला ते जणू मान्यच नव्हते पावसाने ते मोडून टाकले ज्यामुळे पाणी आत पुन्हा येयला लागले   . जहाजाचे कप्तान असलेल्या  मूळच्या सावंतवाडी येथील रहिवाशी असलेल्या शेख सुलेमान   यांनी वादळाचा अंदाज घेत  जहाजाची गती कमी केली अश्यातच बोट काश्याच्या दगडनपाशी आली त्यावेळी अचानक जहाजाचे कप्तानशेख सुलेमान  याना समोरून अचानक ३० ते ४० तेलाची रिकामी पिंपे येताना दिसली त्याच्याशी जहाजाची धडक होऊ नये यासाठी त्यांनी जहाजथोडेसे उजवीकडे वळवले वादळाच्या लाटेमुळे जहाज उजव्याला बाजूला थोडेसे कलंडले लोक घाबरली लक्ष एकाच बाजूला जाऊ लागली सर्व लोक एकाच बाजूला आल्याने जहाज अजूनच कलंडले जहाजाच्या कप्तानाने लोकांना लांब लांब बसण्याची विनंती केली मात्र घाबरलेल्या लोकांनी तसे केले नाही त्यामुळे जहाज

कलंडलेच राहिले परिणामी वादळाच्या एका लाटेत बोट समुद्रात बुडाली बोट बुडत असताना ज्यांना पोहता येत होते त्यांनी चटकन उड्या मारून बोटीपासून दूर जात जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरु केला काही जणांनी लाईफ सेव्हिंग जॅकेट घालून जीव वाचवण्याचा प्रयन्त केला ज्यांना ते करायला मिळाले नाही ते बुडाले पोहणाऱ्या लोकांपैकी काही जणांनी रेवसच्या दिशेने पोहायला सुरवात केली काही जणांनी मुंबईच्या बाजूने पोहायला सुरवात केली पोहणारे रेवसला गेल्यावर त्यांनी कंपनीच्या कार्यालयात बोट बुडाल्याचे सांगितले ही माहिती मुंबईला कळवण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांनी आपला एक प्रतिनिधी अलिबागला पाठवला कारण रेवसला तार करण्याची सोय नव्हती जी तेथून एक तास अंतरावर असलेल्या अलिबागला होती इकडे मुबईच्या दिशेने पोहणारे लोक दुपारी साडेतीनच्या सुमारास मुबईला पोहोचले तेव्हा कुठे जगाला एस एस रामदास बोट बुडाली असल्याचे

समजले . या दुर्घटनेनंतर केलेल्या चौकशीत अनेक बाबी समोर आल्या इतक्या मोठ्या जहाजावर वायरलेस यंत्रणा नव्हती त्यामुळे वादळात जहाजाला मदत मिळू शकली नाही . या बोटीचे अवशेष मिळण्यासाठी १३ लाख रुपये खर्चून एका इटलीच्या कंपनीस कंत्राट देण्यात आले मात्र काही कारणाने व्यवाहार पूर्ण होऊ शकला नाही पुढे दहा वर्षांनी १९५७ साली समुद्राने एका लाटेद्वारे ते मुबईच्या किनाऱयावर स्वतः आणले आणि एका मोठ्या अध्यायाची अखेर झाली

आज या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत या ७५ वर्षात दुर्घटनेतून धडा  घेत आवश्यक त्या कार्यवाही केल्याने त्यानंतर अशी घटना कोकण किनारपट्टीवर घडलेली नाही हे आपले सुदैव . या दुर्घटनेटनंतर कोकणच्या किनाऱ्यावर  अनेक मृतदेह  येऊ लागले या मृतदेहांपैकी  काही मृतदेह माशांनी अर्धवट खाल्लेललेहोते त्यामुळे त्यांची ओळख देखील पटू शकत नव्हती कोकणच्या लोकांना अश्या ओळख पटलेल्या ना पटलेल्या मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्याची वेळ आली काही मृतदेह ओळखू आल्याने बुडालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना

आपल्या माणसाचे अखेरचे दर्शन देखील घेता आले नाही कोकणच्या इतिहासातील वाईट घटना म्हणून ही ओळखली जाते कोकणच्या संस्कृतीत आषाढ अमावस्या ही  एक सण म्हणून साजरी करण्यात येते त्यामुळे मुबईहून गावी गेल्यावर सण साजरा करायचा म्हणून निघालेल्या लोकांनाच तो प्रवास अखेरचा ठरला त्यांच्या आप्तेष्टांवर आपल्या लोकांवर सण साजरा करण्याच्या ऐवजी त्यांच्यावर अत्यंसंसकार करण्याची वेळ या दुर्घटनेने आणली  या दुर्घटनेत प्राणास मुकलेल्या सर्व  जीवाना भावपूर्ण आदरांजली

#हि_माझी_एक_हजार_पंधरावी_ब्लॉगपोस्ट_आहे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?