भारत होऊ शकतो चीनला मागे टाकून क्रमांक एकचा देश

           

  पुढील दीड वर्षात भारत  चीनला मागे टाकून होऊ शकतो  जगात होणार क्रमांक एकचा   देश   संयुक्त राष्ट्र संघाचा अहवालातील निष्कर्ष ! असे वाचल्यावर आपणास आनंद होऊ शकतो कायम आपल्यावर कुरघोडी करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या चीनचे नाक आपण ठेचणार या भावनेतून आपणस आनंद होऊ हाकतो संयुक्त राष्टसंघाचा अहवालातील निष्कर्ष खोटा कशा काय असू शकेल असेही स्पष्टीकरण आपल्यापैकी काही जण त्यासाठी देतील तर मित्रानो थांबा पुढील दीड वर्षात आपण चीनला कोणत्या गोष्टीत मागे टाकणार आहोत हे जाणून घ्या !  तर जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सोमवार १ १ जुलै रोजी प्रकाशित अहवालात हे सांगण्यात येत आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कार्यरत विभागाच्या लोकसंख्या या उपविभागातर्फे हा अहवाल प्रकाशित कऱण्यात आला आहे या अहवालाचे नाव अवलोकन लोकसंख्या २०२२ (The World Population Prospects 2022) आहे आपण तो इंटरनेटवर बघू शकतात .
     या अहवालात चालू वर्षी जगाची लोकसंख्या ८ अब्ज होईल आणि सध्याच्या पद्धतीने लोकसंख्या वाढत राहिल्यास २०२३० पर्यंत ८ अब्ज ५० लाख तर २०५० पर्यंत ९ अब्ज ७० लाख होईल त्यानंतर २०८० लोकसंख्येची वाढच होतच राहील २०८० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्ज ४० लाख होईल जी २१०० पर्यंत स्थिर राहील या अहवालामध्ये आगामी जगाची लोकसंख्येपैकी ५० % लोकसंख्या भारत , चीन पाकिस्तान , फिलिपाइन्स , या आशियाई देशांबरोबर इजिप्त , नायजेरिया , इथोपिया , टांझानिया , आणि रिप्लबिक ऑफ कांगो या ९ देशातच
असेल असेही या अहवालात सांगण्यात आले आहे जगात  सध्या २१० देश आहेत (ऑलम्पिक संघटनेचे सदस्य , {स्विझर्लंड, स्वीडन  सारखे सुमारे ७ देश संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य नाहीत मात्र ऑलम्पिक संघटनेचे सदस्य आहे }) हे आपण लक्षात घेयला हवे . संयुक्त राष्टसंघाचे महासचिव अँटिनियो गुटेरेस यांनी हा अहवाल जगासमोर मांडला .     आपला भारत सध्याचं  लोकसंख्येच्या समस्येने त्रस्त आहे लोकसंख्येमुळे आपल्या साधनसंपत्तीवर प्रचंड ताण येत आहे ज्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत तसेच अनेक नवीन समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे आपल्यासाठी हा अहवाल खूप महत्त्वाचा आहे यात सांगितल्याप्रमाणे स्थिती आली तर त्यास कोणत्या  प्रकारे सामोरे जायचे ? याबाबचे आपण नियोजन करायला हवे . सरकारतफे यासाठी विविध योजना अमलात आणल्या जात आहेत त्याची गती वाढायला हवी . लोकसंख्या वाढीबाबत कोणत्याही एका समाजघटकाला जवाबदार धरून त्याविरुद्ध आकस धरू नये तर आणि तरच आपण या संकटाला तोंड देऊ शकू .नाहीतरी लोकसंख्यवाढ ही समस्या दूर राहून अन्य समस्याच सुरु होण्याची शक्यता आहे . आपल्या भारतात  स्वातंत्र्यपूर्व काळात १९१० च्या दशकांत रघुनाथराव धोंडोपंत कर्वे यांनी समाजाच्या रोष पत्करत प्रसंगी न्ययालयीन खटल्याला सामोरे जात कुटूंबकल्याण आणि लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम समाजाला समजावे यासाठी कार्य केले . त्यांनी ज्या काळात या विषयवार बोलणे देखील पाप समजले जाई त्या काळात हा विषय मासिकाद्वारे त्यांनी जनतेसमोर मांडला . सन २००१ साली अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ध्यासपर्व या चित्रपटात त्यांचा जीवनसंघर्ष चित्रित केली आहे . आपण सध्या त्यांनी सांगितलेले धोके सध्या मोठ्या
प्रमाणत अनुभवत आहोत हे सहजतेने समजून येईल आणीबाणीच्या काळात लोकसंख्यावाढ नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न व्यापक प्रयत्न झाले . या अश्या काही मोजक्या गोष्टी वगळता भारतात लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी  मोठ्या प्रमाणत संघटनामक प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही त्यामुळेच ही स्थिती उप्तन्न झाल्याचे म्हणता येऊ शकते . मात्र अजूनही वेळ पूर्णतः हातातून गेलेली नाही अजूनही आपण प्रयत्न केले तर याचा त्रास कमी करू शकतो मात्र लोकसंख्यावाढ नियंत्रणात आणण्यासाठी काही करण्यासाठी आपल्याकडे अत्यंत कमी वेळ आहे हे आपण लक्षात घेयला हवे तर आणि तरच या अहवालाला आपण या गंभीरपणे घेत आपल्या समस्या सोडवण्यासाठी काहीतरी केले असे म्हणता येईल अन्यथा समस्या कोणत्या प्रकारे सोडवायची हे  समोर दिसत असताना देखील आपण त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत समस्येविषयी खडे फोडले असेच म्हणावे लागेल 

#हि_माझी _एक_हजार_एकोणिसावी_ब्लॉगपोस्ट_आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?