या ज्वालामुखींना कधी सामोरे जणार आपण ?

 


  शुक्रवार १५ जुलैला सकाळी पुण्यात अक्षय माटेगावकर नावाच्या २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली सुप्रसिद्ध अभिनेत्री  केतकी माटेगावकर हिचा  अक्षय चुलतभाऊ होता . आपणास इंटरशिपमध्ये पुरेसे मार्क न मिळाल्याने चांगली नोकरी मिळणार नाही या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले . अक्षयची आई मुबई विद्यापीठात प्राध्यापक आहे तर वडील मुबईला एका कंपनीत उच्च पदस्थ अभियंता आहेत . तर त्याची चुलत बहिणी आघडीची अभिनेत्री  आहे . लौकिक अर्थाने त्याचे कुटूंब सुस्थितीत होते सर्व घराची जवाबदारी त्याच्या खांद्यावरच आहे त्याला नोकरी न मिळाल्यास घराचे खायला वांदे होतील अशी स्थिती नव्हती  उलट नोकरी न मिळाल्याने तो काही काळ जरी बेरोजगार राहिला असता तरी तो उपाशी मरण्याची स्थिती नव्हती  . असे असून देखील अक्षयने जेमतेम २१ व्या वर्षी आत्महत्या केली ज्या कारणाने अक्षयने आत्महत्या हे पाऊल उचलले ते बघता आजची युवापिढी कोणत्या अवस्थेत जगत आहे याचा डोळ्यात अंजन घालणारा पुरावाच म्हणावा लागेल 
     अक्षयचे घर प्रसिद्ध असल्याने त्याच्या आत्महत्येची बातमी माध्यमात आली मात्र ज्याचे घर प्रसिद्ध नाही अश्या कितीतरी अक्षयच्या आत्महत्येची बातमी वर्तमानपत्रात सहज दिसू शकणार नाही अश्या  एखाद्या कोपऱयात किंवा टीव्हीवर खालच्या स्क्रोलमध्ये येऊन गेली तरी खूप उत्तम अशी आजची स्थिती आहे . मात्र आपल्या भारतात याविषयी खूपच कमी बोलले जाते .अमीर खान यांच्या थ्री इडियट या चित्रपटात अमीर खान त्यांच्या सरांना विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न किती गंभीर आहे हे सांगतो . त्यावेळी सांगितलेली आकडेवारीमध्ये आज २०२२ मध्ये सुद्धा फारसा सकारात्मक बदल झालेला नाही हे सांगायला कोण्या ज्योतिष्याची गरज नाही असे असून देखील कोणत्याही राजकारणी व्यक्तीने याविषयी फारसे भाष्य केल्याचे आपणस दिसत नाही . भारताचे जे उज्ज्वल भवितव्य सांगण्यात येते त्याचा पाया तरुणाची संख्या आहे मात्र हीच तरुणाई कोणत्या स्थितीत आहे याचा विचार केल्याचे मला तरी दिसत नाही . कोव्हीड १९ ची साथ मोठ्या प्रमाणत असताना काही प्रमाणात मानसिक अनारोग्याविषयी काही अत्यंत उत्तम कार्य करण्यात आले मात्र उपासनेला दृढ चालवायचे याचा मात्र त्यांना विसर पडला असावा म्हणून त्यांनी त्यांचे कार्य बंद केलं त्याची शिक्षा अक्षय माटेगावकरला मिळाली . त्महत्या करणाऱ्या व्यक्तींना आपल्याकडे दुबळे समजण्याची चुकीची पद्धत आहे आपल्या सर्वांना अकबर बिरबल आणि माकडिणीची गोष्ट माहिती आहे गोष्टीत शेवटी माकडीण स्वतःच्या जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या पिलाच्या जीव घेण्यास देखील मागेपुढे बघत नाही प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो सध्या आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत पूर आला आहे अश्यावेळी पुलावरून खाली बघा डोळे गरगरतील किंवा मोठ्या मजल्यावरून खाली बघा तेव्हा सुद्धा डोळे गरगरतील आपण प्रकाशाला लाजवेल अश्या वेगाने स्वतःला वाचवण्यासाठी मागे येऊ मग अश्या पद्धतीत एखादी व्यक्ती स्वतःच्या जीव घेण्याचा विचार कशा करू शकते याचा विचार त्यांना दुबळा समजणाऱ्यानी करावा असे मला वाटते 
     व्यक्तीमधील परस्पर संवाद नसणे .स्पर्धेमुळे आपले कमकुवत दुवे दुसऱ्याला समजले तर तो त्याचा फायदा तर घेणार नाही ना ? या भीतीमुळे लोक उघडपणे मानसिक आरोग्याविषयी  मानसिक समस्येबाबत बोलत नाही , मानसिक आरोग्याविषयी असणारे प्रचंड अज्ञान .,मानसोपचार तज्ञांचे जागतिक मान्यतेपेक्षा प्रचंड प्रमाणात कमी असलेले प्रमाण , आदी विविध कारणांमुळे या आत्महत्या होतात . केंद्र सरकारने मानसिक समस्येविषयी एक 

हेल्पलाईन सुरु करण्याची पूर्तता केली मात्र ही हेल्पलाईन किती लोकांपर्यंत पोहोचली याची माहिती घेतली मी टीव्हीवर दूरदर्शन आणि खासगी वाहिन्या बघतो . सार्वजनिक हिताच्या जाहिराती फक्त दूरदर्शनवर दिसतात ज्याचा प्रेक्षकवर्ग खासगी वाहिन्यांच्या तुलनेत मोजका आहे खासगी वाहिन्यांना देखील त्याच्या प्राईम टाइमच्या मालिकांच्या ब्रेकमध्ये काही वेळ या जाहिराती दाखवण्याची अत्यंत गरज आहे तर आणि तरच या आत्महत्या काही प्रमाणत थांबतील 


#ही_माझी_एक_हजार_तेवीसावी_ब्लॉगपोस्ट_आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?