पाकिस्तान अशांतेच्या वळणावर


 आपल्याकडील पश्चिमेकडचा   देश आपले शत्रू राष्ट्र अर्थात पाकिस्तानात सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी होत आहेत . ज्याचा केंद्रबिंदू पाकिस्तानमधील पंजाब राज्य आहे .  आपल्याबारोबर शत्रुत्व असल्याबरोबर आपल्या तीन राज्य (गुजरात राजस्थान , पंजाब )आणि दोन केंद्रशासित प्रदेशाबरोबर  ( जम्मू काशीर आणि लडाख ) पाकिस्तान सीमा शेअर करत असल्याने त्यातील घडामोडी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत 
       तर १७ जुलै रोजी पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेच्या २० जगासांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत इम्रान खान  यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाला   १५ जागा मिळाल्या आहेत पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाच्या (नूर गट ) नेतृत्वाखालील १७ पक्षांच्या आघाडीला ४ जागा मिळाल्या आहेत तर १ जागेवर अपक्ष निवडून आला आहे . रावळपिंडी येथील एका जागेवर (विधानसभा मतदार संघ क्रमांक पी पी २७ ) मतमोजणीत फेरफार करून ती जागा पाकिस्तान मुस्लिम लीगला  (नूर गट ) दिली असल्याचा आरोप करत पाकिस्तानी तेफरीके इंसाफ या पक्षाने फेरमोजणीची मागणी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे केली आहे त्यावर हा लेख लिहण्यापर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेतल्याचे वृत्त नाही . या निकालामुळे पाकिस्तान तेहरीके इन्साफ या
पक्षाकडे पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेत १८८ सदस्य झाले आहेत जे बहुमतापेक्षा २ ने जास्त आहेत तर प्रमुख विरोधी पक्षाकडे पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या विचार करता १७८ सदस्यांच्या पाठिंबा आहे थोडक्यात पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या  मुलाने  अर्थात हमजा शरीफ  याने   बहुमत गमावले आहे  देशाच्या आर्थिक स्थितीमुळे घेतलेलं कटू निर्णय आणि असिफअली झरदारी यांच्या चुकीच्या प्रचारतंत्राच्या एकत्रित परिणाम होऊन असा मोठा पराभव झाला असल्याचे मत पाकिस्तान मुस्लिम लीगच्या नूर गटातर्फे व्यक्त करण्यात येत आहे 
  पाकिस्तानात बलुचिस्तान , सिंध,  पंजाब  खैबर ए पख्तुन्वा , (पूर्वीचा वायव्य सरहद प्रांत )आणि पाकिस्तानने अनधिकृतपाणे स्वतःच्या ताब्यात ठेवलेल्या भारतीय भूभागाच्या  म्हणजेच आझाद काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान या सहा विधानसभा आहेत त्यातील   खैबर ए पख्तुन्वा आणि आझाद काश्मीर मध्ये या आधीच पाकिस्तान तेहरीके इन्साफ यांचे सरकार होते . त्यामधे आता पाकिस्तानी  पंजाब या देशातील लोकसंख्येच्या  दृष्टीने क्रमांक एकच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरा असेल्या पंजाबची भर पडली आहे सिंध या पाकिस्तानमधील लोकसंख्येच्या दृष्टीने   दुसऱ्या असलेल्या प्रांतात  पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सरकार आहे . तर पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या पाकिस्तानी मुस्लिम लीगचे  (नूर गट ) गिलगिट बाल्टीस्थानमध्ये सरकार आहे बलुचिस्तानमध्ये स्थानिक बलुचिस्तान अवामी लीगचे सरकार आहे तर त्या बलुचिस्तान अवामी लीगच्या खालोखाल पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे . 
   पंजाबमध्ये सत्ता गेल्याने केंद्राने लवकरात लवकर संसदेच्या निवडणूक घ्याव्यात अशी मागणी पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाच्या विविध नेत्याकडून करण्यात येत आहे  पाकिस्तानचे पंतप्रधान फक्त इस्लामाबादचे पंतप्रधान राहिले असल्याचे वतव्य पाकीस्तान तेहरीके इन्साफ पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने केले आहे  शहाबाज शरीफ यांच्या या आधीच्या वातव्याचा आधार घेत त्यांनी इस्लामाबादचे क्षेत्रफळ सुद्धा अत्यंत कमी केले आहे जर
विविध करणे देत पाकिस्तान तेफरीके इन्साफ ची सत्ता असलेल्या विधानसभा भंग केल्यास देशातील मोठ्या लोकसंख्येवर परिणाम होणार असल्याने पाकिस्तानी संसदेला विसर्जित करण्याशिवाय शासनासमोर दुसरा पर्याय उरणार नाही अशी शक्यता डॉनमध्ये व्यक्त करण्यात आली आहे 
,      या विजयामुळे काही दिवसापूर्वी काहिस्या शांत बस्त्यात गेलेले इम्रान खान यांचे आंदोलन पुन्हा एकदा जोर पकडण्याची दाट शक्यता आहे  सध्याची पाकिस्तानमधील आर्थिक स्थिती बघता त्यास पाठिंबा सहजतेने मिळू शकतो .पाकिस्तान तेफरीके इन्साफ यांच्या विविध नेत्याची जी विधाने आंतराष्ट्रीय माध्यमांमध्ये येत आहेत ते बघता इम्रान खान येत्या काळात या जनाधारच्या आधारे मोठे आंदोलन सहज सुरु करू शकतो या राजकीय धुमश्चक्रीत पाकिस्तानची आर्थिक स्थिती अजून ढासळू शकते ज्यामुळे दुसरा श्रीलंका भारताच्या पश्चिमेकडे तयार होण्याची दाट शक्यता आहे . १८ जुलै रोजी पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत तो पर्यंतच्या ऐतिहासिक नीचांकावर अर्थात २१५ पाकिस्तानी रुपया या स्थितीवर पोहोचला आहे . इम्रान खान यांच्या कार्यकाळात १२% आसपास असणारा महागाईचा दर  शहाबाज शरीफ यांच्या अडीच तीन महिन्याच्या कार्यकाळात महागाईचा दर ३३ % झाला आहे या वाढत्या महागाईचा वापर करत इम्रान खान सहजतेने आंदोलन करू शकतात . 
         पाकिस्तानच्या सध्याच्या संविधानाच्या  (एकहत्तर हा आईन ) कलम ६ नुसार तेथील केंद्र सरकार इम्रान खान यांच्या विरोधात देशात विनाकारण अशांतता निर्माण केली या आरोपाखाली देशद्रोहाचा खटला दाखल करू शकते असे झाल्यास त्यांना फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते किंवा पाकिस्तनाच्या अन्य पंतप्रधानासारखे ते देश सडून इतर देशात आश्रय घेऊ शकतात . मात्र  सध्याची लोकभावना बघता तेथील संसद अश्या प्रकारे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची शक्यता काहीशी कमी आहे कारण इम्रान खान यांच्यावर कार्यवाही केल्यास पाकिस्तानातं मोठे आंदोलन होईल जे शांत करणे प्रशासनाला अवघड जाईल  
 अस्थिर अशांत पाकिस्तान म्हणजे भारताला रोगाने मेलो तर उत्तम मात्र रोगावरील उपचार नको असे  म्हणण्यासारखी स्थिती आहे पाकिस्तान भारताचा शत्रू असला तरी शांत पाकिस्तान असणेच भारताला हितकारक आहे
#हि_माझी_एक_हजार_चोविसावी_ब्लॉगपोस्ट_आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?