पाकिस्तानातील राजनैतिक संकट अधिक गहिरे

       

    पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सुरु असणारे राजनैतिक संकट दिवसोंदिवस वेगवेगळे वळण घेत आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी पाकिस्तान मुस्लिम लिग कायदे गट(PML Q)च्या 10 आमदरांना निलंबित केल्यानंतर सदर मुद्दा पाकिस्ताताच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. तिथे होणाऱ्या सुनावणी दरम्यान सत्ताधिकारी पाकिस्तान डेमाँक्टिक अलायन्सकडून  अनेक चूकीच्या गोष्टी करण्यात आल्या.ज्या हा लेख लिहीत असताना देखिल करण्यात येत असल्याचे डाँनच्या बातमीत सांगण्यात येत आहे.
     ःया  खटल्याचा सुनावणी करणाऱ्या 3 न्यायाधीशांवर पक्षपाती होण्याचा आरोप करत ट्टिटर या माध्यमातून त्यांना शिवी देणे तसेच  असभ्य भाषेत त्यांचा उल्लेख करणे त्यांनी आमच्या विरोधात निर्णय दिला तर आम्हला रस्त्यावर येवून लढा उभारा लागेल अस्या प्रकारची वक्तव्ये करणे आदी प्रकार सत्ताधिकारी पाकिस्तान डेमाँक्टिक अलायन्सकडून करण्यात येत आहे. या आघाडीत एकुण 17पक्ष आहेत. ज्यातील प्रमुख पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नुर गट आहे. सध्या पाकिस्तानात, पाकिस्तान मुस्लिम लीग नुर गटाचा पंतप्रधान आहे. पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या मुलगा पाकिस्तानी पंजाबचा मुख्यमंत्री आहे. मुलाची सत्ता वाचवण्यासाठी शहाबाज शरीफ  पाकिस्तानी पंजाबच्या प्रशासनात बऱ्याच मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत आहे. शहाबाज शरीफ यांची पुतणी आणि पाकिस्तानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदी राहिलेले (सलग नाही, चार ते पाच तूकड्यांचा कालावधी एकत्र करुन)नवाज शरीफ यांची मुलगी मरीयन नवाज हे ट्टीटरवर फालो करणाऱ्या जवळपास पाचशे ट्टिटर अकाउंटवरुन सुमारे दहा हजार ट्टिट करण्यात आले होते. या सर्व ट्टिटमध्ये सर्वोच्च न्यायालयात सदर खटल्याचा न्यायनिवाडा करणाऱ्या तिन्ही न्यायाधीशांबाबत आई आणि अंगावरुन अत्यंत असभ्य लिखाण करण्यात आले होते.
सत्ताधिकारी गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात न्यायनिवाडा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे पुर्ण पीठ असावे, असी मागणी करण्यात येत आहे. आम्ही या तीन न्यायाधीशांच्या नियुक्तीला विरोध करत आहोत.सर्वोच्च न्यायालयाच्या पुर्ण पीठ जो निर्णय देइल ,तो आम्हाला मान्य असेल असे सत्ताधिकारी गटाकडून सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाचे पुर्ण पीठ बसवावे ,इतका मोठा नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरी देखील पुर्ण पीठ बसवायचे असल्यास ते सप्टेंबर पर्यत शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या तीन न्यायाधीशांबाबत सत्ताधिकारी पक्षातर्फे पक्षपाती असण्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याच न्यायाधीशांनी याच वर्षाच्या एप्रिल महिन्यात इम्रान खान यांच्या विरोधात निकाल दिला होता ,त्यावेळी सदर न्यायाधीशांचे कौतूक याच सत्ताधिकारी गटाकडून करण्यात आले होते.या सर्व गदारोळात  या खटल्याचा दुसरा पक्ष असलेल्या पाकिस्तान तेहरीके इसांफ या गटाकडून काहीच वक्तव्ये करण्यात आलेले नाही.
     या सर्व गदारोळात पाकिस्तानची आर्थिक स्थिती दळमळीत होत आहे.25जूलै रोजी पाकिस्तानात एका  डाँलरचा भाव 235पाकिस्तानी रूपये इतका झालेला आहे. कराची येथील दोन्ही( कराची स्टाँक एक्सेंज आणि पाकिस्तान स्टाँक एक्सेंज)  शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण होत आहे. पाकिस्तानकडील परकीय चलनाचा साठा प्रचंड वेगाने शुन्याकडे चाललाय. पाकिस्तानी सरकारचे विविध देशांकडून आर्थिक मदत घेण्याचे प्रयत्न अयशस्वी होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेण्याचा प्रक्रीयेस फारशी गती मिळत नाहीये.सबब या आर्थिक संकटामुळे सर्वसामान्य जनता प्रचंड त्रासलेली आहे.
आपल्या भारतात देखील १९७५ पासून १९८९ पर्यंत सुरु  असलेल्या राजकीय सामाजिक धार्मिक ढवळा ढवलीचा परिणाम (आणीबाणी . खलिस्तान आंदोलन , मंडल कमिशन , आदी अनेक मुद्दे याच काळातील ) आपण २४ जुलै १९९१ साली अनुभवाला  या अशांत काळामुळे अर्थव्यवस्थेची होणाऱ्या दुर्दशेकडे आपल्या कोणाचेच फारसे लक्ष गेले नाही ज्यामुळे जेमतेम, काही  दिवस पुरेल इतकाच परकीय चालनसाठा आपलीकडे असल्याचे आणि 
सरकारी उद्योग मोठ्या प्रमाणत अडचणीत असल्याचे आपणस समजले मात्र या सर्वातून बाहेर काढण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर मनमोहनसिंग सारखे जगविख्यात अर्थशास्त्रद्न्य होते त्यामुळे आपण तरुन गेलो मात्र विविध अंतराष्ष्ट्रीय माध्यमातून येणाऱ्या बातम्या बघता पाकिस्तानकडे अश्या प्रकारचा अर्थनिपून असण्याची शक्यता कमी वाटत आहे सबब या राजकीय अस्थिरतेमुळे जर पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अडचणीत आली तर त्याचे पाकिस्तानवर मोठे परिणाम होतील पाकिस्तान आपला शत्रू असला तरी अशा पाकिस्तान आपल्याला परवडणारा नाही पाकिस्तानमधील या राजकीय उलथापालथी बंद होऊन पाकिस्ताननी सत्ताधीशांनी देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष देण्यातच भारताचे सुद्धा हित आहे 

#हि_माझी-एक_हजार_तिसावी_ब्लॉगपोस्ट_आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?