पंडीत नेहरुंचे हे थोरपणच !

   

आपल्या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मु यांनी नुकतीच शपथ घेतली. त्या आदिवासी (वनवासी) समाजाच्या आहेत. या समाजातून देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदावर जाणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती आहेत. आतापर्यत आपल्या भारतात अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समाजबांधवातून ,तसेच शीख धर्मियातून ,दलित समाजबांधवातून आणि अत्यल्प असणाऱ्या ख्रिचन समाजबांधवातून आलेल्या व्यक्तींनी राष्ट्रपती पद भुषवले आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही किती खोलवर रुजली आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. लोकशाही इतक्या खोलवर रूजवण्याचे काम करणाऱ्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहारलाल नेहरु आणि अन्य तत्कालीक नेत्यांचे आपण कायमच कृतज्ञ असू.
दुसऱ्या महायुद्धानंतर पुढच्या तीन ते चार वर्षांत जगभरात सुमारे 90 देश वसाहतवादाच्या रोखडातून मुक्त झाले.या स्वातंत्र्य झालेल्या देशांनी लोकशाहीची विविध रूपे स्विकारली. आज सुमारे 75 वर्षानंतर या देशातील लोकशाही कोणत्या टप्प्यावर आहे? आणि भारतातील लोकशाही कोणत्या टप्प्यावर आहे? याचा विचार करता आपणास स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाहीची पायाभरणी करणाऱ्या पंडीत नेहरु यांच्यासह तत्कालीन नेत्यांचे थोरपण लक्षात येते.भारतासारखी विविधता नसलेल्या ,एकच भाषा बोलणारे, एकाच धर्माचे जवळपास सर्व लोक असणाऱ्या म्यानमार,अल्जेरीया, चाड, सिरीया आदी त्यावेळी स्वातंत्र्य मिळालेल्या अनेक देशात लोकशाहीचा खेळ खंडोबा झाल्याचे आपणास सध्या दिसत आहे. तेथील अल्पसंख्याक नरकात असावे, असे आयुष्य जगत आहेत. म्यानमारमध्ये लष्करी सत्ता आहे. पाकिस्तानमध्ये लोकशाहीचा देखावा आहे. श्रीलंका या देशात विविध राजघराण्यांनीच आलटुन पालटून लोकशाहीचा देखावा करत राज्य केले आहे. सिरीया मध्यपूर्वेतील देशात किंवा अल्जेरीया, चाड ,ट्युनेशिया, डेमाँक्टिक रिपब्लिक कांगो, इथोपिया या  आफ्रिका खंडातील देशात लोकशाही
जवळपास संपली आहे .तिथे एका व्यक्तीची हुकुमशाही सुरु झाली आहे. काही वर्षापुर्वी या देशातील विद्यमान हुकुमशहा लोकशाहीच्या मार्गाने निवडून आले होते. निवडून आल्याए त्यांनी लोकशाही संकेत पायदळी तूडवत स्वतःला त्या देशाच्या राजेपदावर आरुढ होण्यासाठी आवश्यक ते बदल केले काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयात मी एक विनोद बघीतला होता.एकदा पंडित नेहरु त्यांचा आवडत्या कुत्र्यासह माँस्कोला जातात.तिथे ते स्टँलिनशी बोलत असताना स्टँलिनचे कुत्र आपल्या भारतीय कुत्र्याला म्हणत तू स्वर्गसुखात राहतो आहेस याचा मला हेवा वाटतो .आपले कुत्रे म्हणते काय थट्टा करतोस? तू किती गुटगुटीत मी कसा मरतूकडा ! त्यावर स्टँलिनचे कुत्र म्हणतो गुटगुटीत असणे किंवा मरतूकडा असणे म्हणजे स्वर्गसुख नव्हे. तू तूझ्या देशात मुक्तपणे ओरडू शकतो. मी मात्र ओरडू शकत नाही. मुक्तपणे व्यक्त होवू शकत नाही. म्हणून मी म्हटले तू स्वर्गसुख अनुभवत आहे. आता यातील विनोदाच भाग सोडुन देवूया मात्र वसाहतवादाचे शिकार झालेल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या देशातील  लोकशाहीची सद्यस्थिती बघीतली की आपल्या भारतातील लोकशाही किती महान हे समजते.मी वर काही देशांची नावे उदाहरणादाखल दिली आहेत. त्याच देशात लोकशाहीची थट्टा करण्यात आली आहे, असे समजू नये.तर सर्वच वसाहतवादाचे शिकार झालेल्या देशात भारतासारखा अपवाद वगळता सारखीच स्थिती आहे. आपण आफ्रिका खंडातील, देशाच्या लोकशाहीचा अभ्यास केल्यास ही गोष्ट चटकन समजते
.2014साली आधीच्या सरकारच्या विचारसरणीच्या पूर्णतःविरुद्ध विचारसरणीचे सरकार आले. हा सत्ताबदल कोणताही प्रकारचा रक्तपात न होता झाला ,दक्षिण अमेरीका खंडात असे बदल प्रचंड प्रमाणात रक्तपात होवून झाले आहेत. मात्र भारतात हा बदल शांततेत झाला,याला कारण स्वातंत्र्योत्तर काळात पंडीत नेहरु आणि तत्कालीन नेत्यांनी भारतात लोकशाही तळागळापर्यत पोहचवण्यासाठी केलेले प्रयत्न. 
   पंडीत नेहरु यांच्या प्रशासनात काही चुका झाल्या असतील, किंबहुना झाल्याच आहेत, मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या देशातील लोकशाहीचा प्रवास बघता एक चहा विक्रेता देशाचा पंतप्रधान आणि एक रिक्षाचालक देशातील महत्वाच्या राज्याचा मुख्यमंत्री होतो. इतक्या सर्वसामान्य जनतेतून लोकशाहीतील ही महत्तवाची पदे भुषवली जातात, ही गोष्ट विशेष महत्तवाची आहे.भारताखेरीज अन्य वसाहतवादी देशात असे उदाहरण खचितच सापडेल .मी वसाहतवादी देश म्हणतोय हे लक्षात घ्या .पाश्चात्य देशात असे उदाहरण असले तरी हे देश 
वसाहतवादाचे शिकार नव्हते ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. तूलना नेहमी काहीतरी साम्य असणाऱ्या  वस्तूंमध्येच होवू शकते.काहीही साम्य नसणाऱ्या वस्तूंमध्ये एखाद्या गोष्टीवरून तूलनाच होवू शकत नाही असो.
काही जण प्राचीन भारतात लोकशाही असल्याचे सांगतील, त्यांना मी सांगू इच्छितो की ती लोकशाही कालांतराने ब्रिटीश येण्याचा आधी सुमारे नउशे वर्ष ती नष्ट झाली त्यामुळे ते संकेत समाजातून पुर्णतः नष्ट झाले होते.ते संकेत पुर्णतः नव्यानेच पंडीत नेहरुंना समाजात रुजवावे लागले ,ते त्यांनी पुर्णपणे रुजवले असेच म्हणावे लागते.त्या बदल समस्त भारतीय पंडीत नेहरुंची कायम ऋणी राहिल, हे मात्र नक्की.
#ही_माझी_एक_हजार_एकतिसावी_ब्लॉगपोस्ट_आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?