स्मरण ऐतिहासिक समुद्र उडीचे

         


       स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे  ऐकताच मन आदराने अणि आनंदाने  भरून येणारा खचितच एखादा मराठी माणूस असावा.   सावरकरांचे संपूर्ण आयुष्यच धगधगते अग्निकुंड होते असे  म्हंटल्यास ठरू नये . त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे त्यांनी त्यांना युनाटेड किंग्डम या देशातून भारतात आणताना फ्रांसच्या किनाऱ्यावर मारलेली उडी . २०२२  या वर्षी या ऐतिहासिक उडीला ११२  पूर्ण होत आहेत . याच उडीमुळे त्यांच्यावर हेगच्या आंतराष्ट्रीय न्यायालयात खटला चालला .एका भारतीय व्यक्तीचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी दोन युरोपीय राष्ट्र्रानी आंतराष्ट्रीय न्ययालयात दाद मागण्याचा जगातील हा बहुतेक एकमेव उदाहरण असावेमुक्ततेसाठी त्यांनी केलेला हा प्रयोग जरी दुर्दैवाने फसला असला तरी त्याचे मोल विसरता येण्यासारखे नाही  . जर हा प्रयोग यशस्वी झाला असता तर भारताला स्वातंत्र्य बऱ्याच आधी मिळाले असते  मात्र आपल्या दुर्दैवाने हे घडले नाहीऑनी बेझंट  या सावरकरांना मदत देण्यात काही कारणाने कमी पडल्या  आणि सावरकर ब्रिटिशांचा कैदेत पकडले गेले .आणि त्यांना 2 जन्मठेपेची 50  वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली

          .फ्रान्सचा किनारा जवळ आलेला आहे आपण पोहत फ्रान्स गाठले तर हे ब्रिटीश सरकार आपल्याया परदेशी भूमीवर अटक करू शकणार नाही काय म्हणावे?, या नियोजनाला माझ्याकडे शब्दच नाही या गोष्टीचे वर्णन करायला. मार्सेलीस या  ठिकाणी आर्यलंड मध्ये होमरुल चळवळ चालवणाऱ्या अँनी बेझंट यांचा मदतीने स्वातंञ्यवीर सावरकर  भुमीगत होऊन भारताच्या स्वातंञ्याची चळवळ पुढे नेणार होते. माञ दुर्दैवाने त्या

सावरकरांना भेटू शकल्या नाहीत आणि फ्रान्सच्या भुमीवर असूनही ब्रिटीशांनी स्वातंञ्यवीर सावरकरांना अटक केली पुढचा ईतिहास सर्वाना माहीती आहेचमाञ मला राहून राहून वाटते जर सर्व ठरवल्याप्रमाणेच घडले असते तर ? तर इतिहास फार वेगळ्या पध्दतीने लिहला गेला असता यात तिळमाञ शंका नाही असो इतिहासाच्या वस्तुनिष्ठ अभ्यासात या जर तर च्या गोष्टीना फारशे महत्व नसतेच याची मला पुर्ण जाणीव आहे

       पुण्यातील चाफेकर बंधुंच्या फाशी नंतर त्यांचा देशासाठी जीवन.समर्पित करण्याचा घरचा देवीसमोर घेतलेला संकल्प. सारेच अविश्वसणीय  नाशिक महानगरपालीकेने त्यांचा या जगप्रसिध्द उडीचा सम्माणार्थ नाशिक मधील पहिल्या तरणतलावाला त्यांचे नाव देवून त्यांचा सम्मान केलाय तसेच नाशिकमधील पहील्या उड्डाणपुलाला देखील त्यांचे नाव देण्यात आलंय  जी व्यक्ती विविध ठिकाणी पोचते तिला एखाद्या तलावात पोहणे आणि समुद्रातील पोहण्यातील फरक माहिती असेलच तलावातील पाणी वाहते नसते त्यामुळे दम लागण्याचा संभव फारसा नसतो याउलट स्थिती वाहत्या पाण्यात असते वाहत्या पाण्याला विरोध करत या ठिकाणी पोहावे लागते त्यामुळे येथे अधिक श्रम करावे लागतात स्वातंत्रवीर सावरकर यांच्या ऐतिहासिक उडीचा वेळी जहाजातून बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव देखील होत होता म्हणजेच अधिक कठीण असलेल्या ठिकणी अजून कठीण स्थिती स्थित निर्माण झाली होती त्यातून मार्ग काढत स्वातंत्रवीर सावरकर भारताच्या स्वातंत्र्याचा लढा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील होते

 स्वातंञ्वीर  सावरकरांच्या आयुष्यातील सुरवातीची  महत्वाची वर्षे नाशिक आणि पुण्यात व्यतीत केलेली दिसतात. त्यावेळी त्यांनी केलेली अंगमेहनीतीचा त्यांना यावेळी खूप खूप फायदा झाला . सावकरांच्या बलदंड तरीही लवचीक शरीराचा त्यांना खुप फायदा झाला अंगाला जखमा झालेल्या असताना समुद्राचे खारे पाणी वरून होणारा गोळ्याचा वर्षाव अश्या परीस्थितीत त्यांनी केलेले साहस अतूलनीयच होते आपल्या एखाद्या जखमेला

खारे पाणी लागल्यास होणाऱ्या वेदना असह्य असतात (किंबहुना त्यामुळेच जखमेवर मीठ चोळणे हा वाक्यप्रचार रूढ झाला असावा ) इथे सर्वत्र मिठाचे खारे पाणी म्हणजे किती असह्य वेदना सहन करत स्वातंत्रवीर सावरकर आपल्या भारतासाठी कष्ट करत होते याचा आपण केवळ अंदाजच करू शकतो .

 जगाच्या इतिहासात   एक महत्वाची घटना म्हणून याकडे बघितले जाते . स्वातंत्रवीर सावरकर यांनी  युनाटेड किंग्डम मध्ये वकिलीचे शिक्षण घेत असताना भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी केलेल्या प्रयत्नात त्यांना अटक होते . त्यानंतर त्या खटल्यासाठी त्यांना भारतात आणले जात असताना फ्रान्सच्या किनाऱ्यावर त्यांनी  उडी मारली , पुढचा इतिहास सर्वश्रुत आहेच .   भारताच्या महत्वाच्या क्रान्तिकारकांमध्ये त्यांचा समावेश होतो तो यामुळे आज देखील सी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनेक कल्पना मूर्त स्वरूपात आलेल्या नाहीत जर त्या आल्या असत्या तर चित्र खूपच वेगळे असते

त्यांच्या क्ष किरणे या निबंधाच्या ग्रंथातील अनेक संकल्पना तर जास्तच दुर्लक्षित राहिल्या जर या संकल्पना अस्तित्वात आल्या तर देशाच्या चित्रात खूपच सकारात्मक बदल होईल हे नक्की स्वातंत्रवीर सावरकर यांच्या या अतुलनीय साहसाच्या दिवशी आपण त्यांच्या कल्पना सत्यात आणण्याचा निर्धार तरी केला तरी ती त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल हे नक्की . स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयजयकार असो वंदे मातरम

#हि_माझी_एक_हजार_चौदावी_ब्लॉगपोस्ट_आहे



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?