श्रीलंकेत नक्की चाललंय तरी काय

 आपल्या भारताच्या दक्षिणेला असणारा श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे आता आपणास माहिती असेलच या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून मोठ्या प्रमाणत चर्चेत आलेल्या आर्थिक संकट आता पुढील अत्यंत कडेलोटाच्या पातळीवर पोहोचले आहे  . वारंवार मागणी करून देखील शांतपणे आंदोलन करून देखील श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा न दिल्याने आणि श्रीलंकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणे दूरच ती अजून चिघळल्याने श्रीलंकेतील नागरिकांनाच संयमाचा बांध अखेर फुटला श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी देशभरात  लागू केलेला बंद मागे घेतल्यावर तासच होत नाही तोच तेथील नागरिकांनी राष्ट्रपती
भवनात घुसून तेथील सोयीसुविधांचा ताबा घेतला परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे बघून त्याच्या धीच राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनाबाहेर सुरक्षित आश्रय घेतला होताते कुठे आहे ते हा लेख लिहण्यापर्यंत काहीही समजले नाहीये  शनिवारी आपल्या भारतीय प्रमाणवेनुसार रात्री पावणेदहाच्या सुमारास श्रीलंकेच्या पंतप्रधानाचे खासगी घर जमावाने पेटवून दिले आहे पंतप्रधानां विक्रमसिंघे यांचे  खासगी घर पेटवण्याच्या सुमारे तासभर आधी श्रीलंकेच्या
पंतप्रधानांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवत दुसरे सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याची इच्छा ट्विटरवर व्यक्त केली होती श्रीलंकेच्या पंतप्रधानाच्या घरावर हल्ला झाल्यावर सुमारे अर्धातासाने श्रीलंकेच्या लोकसभेच्या अध्यक्षांनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे   १३ जुलै रोजी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे श्रीलंकेच्या संविधानानुसार राष्ट्रपतीने राजीनामा दिल्यानंतर तेथील लोकसभेचा अध्यक्ष देशाचा राष्ट्रपती होतो

आतापर्यंत राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्या समर्थनाची भूमिका घेणाऱ्या आणि श्रीलंकेच्या राजकारणात धार्मिक बाबीत बऱ्यापैकी वरचष्मा असणाऱ्या बौद्ध भिक्षुकांनी देखील यावेळी सरकार विरोधी भूमिका घेतल्याने सरकारच्या अडचणीत वाढच होत होती त्या पार्शवभूमीवर या घडामोडी आपण बघणे आवश्यक आहे . सन २००९ ला श्रीलंकेतील अंतर्गत यादवी संपून श्रीलंकेत शांतात निर्माण करण्यात राजपक्षे यांनी मोलाची भूमिका बजावली होती त्यामुळे श्रीलंकेच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात मोठे स्थान असलेल्या बौद्ध भिक्षुकांची राजपक्षे परिवाराला सहानभूती होती जी आता नाहीशी झाली आहे  श्रीलंकेत शांतात निर्माण करण्यासाठी राजपक्षे परिवारानेतेथील अप्लसंख्यांक असलेल्या तामिळी आणि मुस्लिम बांधवांवर मोठ्या प्रमाणत अत्याचार केले त्यांच्या मानवी हक्काबाबतचा मुद्यावरून अनेकदा श्रीलंकेला पाश्चात्य देश आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत असतात . श्रीलंका जर अंतराष्ष्ट्रीय नाणेनिधीकडे गेल्यास आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडे गेल्यास या मानवी हक्काच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित करत काही सामाजिक बंधने लागू करू शकते त्यामुळे ते टाळण्यासाठी श्रीलंकन सरकार अन्य  पर्याय वापरत यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला त्यात अपयश आल्याने श्रीलंकेतीलआर्थिक  स्थिती दिवसोंदिवस बिघडत गेली ज्याचे प्रत्यंतर आता दिसत आहे 
या संकटातून बाहेर पाडण्यासाठी श्रीलंकेला अत्यंत कमी पर्याय उपलब्ध आहेत श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत परदेशी लोकांकडून होणाऱ्या पर्यटनामुळे मिळणाऱ्या परकीय चलनाचे मोठे योगदान आहे श्रीलंकेच्या राजकीय संकटामुळे तिथे युरोपीय देशातून आणि अमेरिकन नागरिक पर्यटनासाठी किती जातील याबाबत फारच
अनिश्चितता आहे सबब भारतासारख्या देशांवर श्रीलंकेच्या पर्यटनाला गती देण्याचं आव्हान आहे . 
श्रीलंकेच्या आर्थिक दुरवस्थेला पुढील कारणे आहेत 
१) राष्ट्राध्यक्षांनी एका रात्रीत श्रीलंकेतील शेतीतील रासायनिक खतांवर बंदी घालून यापुढे देशातील सर्व शेती सेंद्रिय खतांवर होईल या घेतलेल्या निर्णयामुळे श्रीलंकेतील शेती उपादान खूपच मोठ्या प्रमाणत घटले परिणामी श्रीलंकेला अन्नधान्य आयात करण्याची वेळ आली आपल्याकडेही असे काही निर्णय घेण्यात आले आहेत मात्र ते निर्णय यशस्वी ठरले हे आपण लक्षात घेयला हवे मात्र श्रीलंकेत ते अयशस्वी ठरले ज्याचे फळ आता श्रीलंका भोगत आहे 
२) श्रीलंकेची  अर्थव्यवस्था पर्यटन या एकाच घटकांभोवती केंद्रित केली कोव्हीड १९ मुळे जागतिक पर्यटन घटल्याने परकीय चलनाचा ओघ घटला 
३) स्वस्तात मिळतेय म्हणून चीनकडून मोठ्या प्रमाणत कर्ज घेणे 
४) लोकांना खुश करण्यासाठी विविध वस्तूंचे कर कमी करणे तसेच अनेक अनावश्यक सवलती देणे ज्यामुळे सरकारकडे कमी पॆसे जमा झाले मात्र सरकारी खर्च वाढला 
श्रीलंकेतील संसदेत त्यांच्या पंतप्रधानांनी जुलै महिन्याच्या सुरवातीच्या आठवड्यात सांगतीतल्याप्रमाणे श्रीलन्केचे आर्थिक संकटाची स्थिती २०२३ डिसेंबरपर्यंत राहणार आहे २०२५ च्य अखेरपर्यंत श्रीलंकेची आर्थिक स्थिती २०१९ च्या स्थितीस येईल मात्र त्यानंतर झालेल्या या राजकीय संकटामुळे हि स्थिती अजून जास्त दिवस राहणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे आता अन्य पर्याय संपल्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे श्रीलंका गेल्यास साध्य काहीसा शांत बस्त्यात गेलेला तामिळी वाघांचा मुद्दा पुन्हा चर्चेत येऊ शकतो ज्याचा भारतावर देखील परिणाम होऊ शकतो त्यामुळे हे संकट फक्त श्रीलंकेचे राहत नाही त्यास भारताचं देखील कंगोरा जोडला जातो त्यामुळे या घडामोडी आपल्यासाठी महत्वाचा आहेत 

 #हि_माझी_एक_हजार_सतरावी   _ब्लॉगपोस्ट_आहे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?