पूर्व आणि पश्चिमेचा सेतू भारत

       


   सध्या जगाचे राजकारण वेगाने बदलत आहे जागतिक राजकारणात मोठे मोठे गृप स्थापन होण्याऐवजी अनेक लहान लहान गृप स्थापन होत आहे फक्त ४ ते ५ देशांच्या सुद्धा एका गृप बनत आहे . पूर्वीप्रमाणेच याही जागतिक राजकारणाच्या बदलत्या  स्थितीत भारताचे जागतिक राजकारणातील स्थान दिवसोंदिवस अधिक महत्त्वाचे होत आहे ,१४ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी इस्राईलमध्ये सुरु असणाऱ्या आय  यु टू  या  गृपच्या अधिवेशनामध्ये  ऑनलाईन माध्यंमांद्वारे साधलेला संवाद हेच स्पष्ट करत आहे . इंडिया ,इस्राईल , यूएस ( अमेरिका ) आणि युएई (दुबई शारजा ,अबुधावी ही प्रसिद्ध शहरे असणारा देश )  या चार  सहभागी देशांच्या अद्याक्षरांवरून या गटाला आय टू  यु टू  हे  नाव देण्यात आले आहे  यातील  टू  हा शब्द २ हा अंक दर्शवतो . (इंगजीत दोनला टू म्हणतात ) तर आय हे अक्षर इंडिया आणि इस्राईल या दोन देशांचे प्रतिनिधित्व करते या दोन्ही देशांचे इंग्रजी स्पेलिंग आय या अक्षरापासून सुरु होते म्हणून आय २ तर यु हे अक्षर यूएस आणि युएई या दोन देशांचे प्रतिनिधित्व करते . अश्या प्रकारची संघटना स्थापन करावी . अशी संकल्पना भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या मागच्या वर्षी ऑक्टोबरच्या इस्राईलच्या दौऱ्याच्या वेळी मांडली त्यावेळी या देशांच्या पररराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली आता या देशाच्या सरकारच्या प्रमुखांची बैठक होत आहे . आय २ यु २ या गृपमधील सहभागी  सरकारच्या प्रमुखांची ही पहिलीच बैठक आहे 

एकेकाळी भारत पाकिस्तानपेक्षा जास्त हाडवैरी असेलेले  युनाटेड अरब अमिरात आणि इस्राईल हे देश या संघटनेद्वारे एकत्र आले आहेत युनाटेड अरब अमिरातीच्या पासपोर्टवर हा पासपोर्ट इस्राईलसाठी वैध नाही असे छापलेले असे त्यांनी इस्रायलला एक देश म्हणून मान्यता देखील दिलेली नसे त्या पार्श्वभूमीवर आपण हे  बदल बघायला हवेत युएई आणि इस्राईल या दोन देशांच्या दरम्यान समेटासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे योगदान आहे त्यांचा कारकिर्दीच्या अखेरच्या काही महिन्यात त्यांनी घडवून आणलेल्या इब्राहिम अकोर्ड मुळे अरब देश आणि अमेरिकेचे ५१ वे राज्य म्हणून ज्या देशांच्या गमतीने उल्लेख करण्यात येतो असा इस्राईल यांच्यात शांतता करार झाला इस्राईलच्या प्रमुख धर्म असलेल्या ज्यू आणि अरब देशांच्या प्रमुख धर्म असलेल्या

इस्लाम यांच्यातील साम्य असलेल्या इब्राहिम या ईश्वराच्या प्रेषितांच्या नावावरून त्यास इब्राहिम अकोर्ड म्हनतात . या करारामुळे आखाती देशातील जागतिक राजकारणाचे संदर्भ पूर्णतः बदललेले आहे आय २ यु २ हा गृप त्याचेच प्रत्यंतर आहे  या गृपमधील सर्व राष्ट्राशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत इस्रायलला अमेरिकेचे ५१ वे राज्य म्हणावे इतके दोन्ही देशांचे संबंध मधुर आहे जॉन बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यवरचा आपल्या  आखाती देशांच्या दौऱ्याची सुरवातइस्राईलपासून केली आहे त्यांचा हा दौरा १३ ते १६ जुलै दरम्यान असेल याच दौऱ्यादरम्यान हा संवाद होत आहे . या दौऱ्यात ते इतिहासात प्रथमच इसाईर्लनंतर सौदी अरेबियाला जाणार आहेत  

या पहिल्या अधिवेशनामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , इस्राईलचे सध्याचे काळजीवाहू पंतप्रधान नफ्ताली बेनेट युनाटेड अरब अमीराताचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन बायडेन आदींनी सहभाग नोंदवला इस्राईलमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अस्थिरता आहे सन २०१९ पासून आतपर्यंत ४ निवडणुका झाल्या आहेत आता पाचव्या निवडणुकीची तयारी सुरु आहे या अस्थिरतेच्या काळात काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नफ्ताली बेनेट कार्यभार बघत आहे 

या बैठकीत परस्परांच्या देशात जाणे सोईस्कर व्हावे म्हणू वाहतुकीच्या सोयीसवलती उभारणे , सध्या जगाला भेडसावणाऱ्या ऊर्जा आणि अन्न संकटावर मात्र कशी करायची तसेच परस्पर आर्थिक विकास साधण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे रशिया आणि युक्रेन हो दोन मोठे गहू उप्तादक आणि नैसर्गिक इंधनाचे उप्तादन करणाऱ्या

दोन देशात युद्ध सुरु असण्याने जगभरातील या उप्तादनाचा प्रश्न  निर्माण  झाला आहे तसेच कोव्हीड १९ च्या साथीचा जगभरात झालेला उद्रेक आणि रशिया युक्रेन युद्ध यामुळे जागतिक अर्थव्यवस्था सध्या प्रचंड अडचणीत आलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर या संवादातचर्चा होणाऱ्या मुद्यांना अधिक महत्व आहे 

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील चीनविरोधी गटात भारत ऑस्ट्रेलिया आणि जपानसह महत्वाच्या साथीदार आहे . या गटात पाकिस्तानचा मित्र असलेला  युएई सुद्धा भारताबरोबर या गृपमध्ये सहभागी होत आहे  या काहीश्या पश्चिमेकडील गटात देखील भारत अमेरिकेच्या साथीदार आहे त्यामुळे पश्चिमेकडील क्याड म्हणून ओळख असणाऱ्या या गटामुळे  पूर्व आणि पश्चिमेचा सेतू भारत असल्याचे बोलले जात आहे जे भारतचे महत्व अधोरेखित करणारेच आहे हे सूर्यप्रकाशाइतकेच स्पष्ट आहे 

#हि_माझी _एक_हजार_एकसावी_ब्लॉगपोस्ट_आहे 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?