वाढदिवस जगातील पहिल्या समुपदेशकाचा

       

        
भगवान श्रीकृष्ण यांची  जयंती समस्त भारतात फार मोठ्या उत्साहात  साजरी  करण्यात येते . भगवान श्रीकृष्ण  यांना  विविध रूपात पुजले जाते . रणछोडदास कृष्ण , बाळकृष्ण , ही भगवान श्रीकृष्ण  ही त्याची प्रमुख रूपे . या सर्व रूपांमध्ये भगवान श्रीकृष्णचे एक स्वरूप काहीसे दुर्लक्षित रहाते . ते म्हणजे समुपदेशक श्रीकृष्ण . जगाचा  इतिहासाच्या पौराणिक आणि  भौतिक या दोन्ही प्रकारे आढावा घेतल्यास आपणस हि गोष्ट लगेच लक्षात येते की भगवान श्रीकृष्ण  हे  जगातील पहिले समुपदेशक आहेत . युद्धाच्या प्रसंगी व्दिधा  मनस्थिती असणाऱ्या अर्जुनाला त्यांनी समुपदेशन केले होते . त्याचा आधी कोणत्याही प्रकारात समुपदेशनाच्या उल्लेख आढळत नसल्याने भगवान श्रीकृष्ण हे जगातील पहिले समुपदेशक ठरतात .
    माझ्या मते भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेली  भगवत गीता हा कोणताही अध्यात्मिक ग्रंथ नसून मानसिक आरोग्य  कश्या प्रकारे  उत्तम ठेवावेहे सांगणारा एक उत्कृष्ट ग्रंथ आहे .या ग्रंथाचे निर्माते म्हणूनच भगवान श्रीकृष्ण जगातील पहिले समुपदेशक ठरतात .
     भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मापासून त्यांना संकटाचा सामना करावा  लागला तरी त्यांनी कधीही हार मांडली नाही लहानपणी मथुरेचा शासक कंस याने पाठवलेल्या विविध मारेकऱ्यांचा त्यांनी यशस्वी सामना केला युवा अवस्थेत जरासंध  आणि त्याचा साथीदारांचा यशस्वी सामना केला प्रसंगी शारीरिक ताकद कमी पडत आहे हे
लक्षात आल्यावर बुद्धी चातुर्याचा वापर करत या संकटाना परतवून लावलेप्रसंगी काही वेळेस माघार देखील घेतली भगवान श्रीकृष्ण यांची माघार आपणास द्वारका या नगरीच्या निर्मितीच्या वेळी दिसते कंसाचा वध केल्यावर कंसाच्या मित्रांपासून आपल्या शहराला असणारा धोका लक्षात घेऊन  आपल्या मूळ शहरपासून कैक किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी नव्या शहराची निर्मिती केली . .सध्या अत्यंत छोट्या छोट्या कारणांनी निराश होऊन टोकाचे पाऊल उचलणाऱ्या लोकांनी हा आदर्श घेयला हवा .
      आपला हेतू जगकल्याणाचा असेल तर प्रसंगी गैरमार्गाचा अवलंब केला तरी तो क्षम्य असतो हे आपणास महाभारत युद्धाच्या वेळी दुर्योधन माता गांधारीला भेटायला जाताना दुर्योधनाला दिलेल्या भगवान श्रीकृष्ण यांनी दिलेल्या सल्याच्या वेळी दिसून येते  भगवान गोपाळकृष्णचा बालपणीचा आदर्श घेऊन  गोपाळकाला चा उत्सव साजरा करणाऱ्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाचे हे रूप देखील विचारात घ्यायला हवे . तर आणि तरच भगवान श्रीकृष्णचे भक्त म्हणण्यास ते पात्र ठरतील यात तिळमात्र शंका नाही
#ही_माझी_एक_हजार_तेंचाळिसावी_ब्लॉगपोस्ट_आहे  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?