भारताचे बदलते परराष्ट्र धोरण


मालदीव ,आपल्या भारताच्या नैऋत्य दिशेला असणारे शेजारचे राष्ट्र. जागतिक राजकारणाचा विचार करता ,अत्यंत महत्त्वाचा ठिकाणी वसलेले विविध बेटांच्या स्वरुपातील राष्ट्र असणारे मालदिव आपल्या न्यूजमध्ये फारसे नसतेच. भारताचा महत्तवाचा सहभाग असलेल्या सार्क आणि बिमस्टेक मधील भारताचा अत्यंत विश्वासू साथीदार ज्याने पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील काश्मीरविषय रडारडीला स्वतः इस्लामाधारीत राष्ट्र असून देखील नेहमीच विरोध केला आहे. तो देश म्हणजे मालदिव. तर अस्या मालदिवचे राष्टपती इब्राहिम मोहम्मद सोलिह आँगस्टच्या पहिल्या आठवड्यात चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.

     या दौऱ्यावर दरम्यान मालदिव आणि भारताचे दळणवळाच्या पायाभुत सोईसुविधांची निर्मिती, सायबर सिक्युरिटी,पारंपरिक शस्त्रसज्जता,व्यापार आणि सांस्कृतिक सबंध  विविध सहा बाबींवर करार करण्यात आले. या अंतर्गत भारत मालदिवची राजधानी माले ,राजधानी शेजारच्या बेटांशी जोडण्यासाठी एकुण साडेसहा किलोमीटरचा पुल बांधणार आहे. या आधी चीनने माले शहराला दुसऱ्या बेटांशी जोडण्यासाठी चार किमीचा पुल बांधला आहे. त्यावेळी आलेल्या कटू अनुभवातून शहाणे होत यावेळी हे कंत्राट मालदिवने भारताला दिले, हा एकप्रकारे भारताचा कुटनितीचा विजय आहे या खेरीज संरक्षणावरील डिलिव्हरेबल्सच्या बाबतीत, भारताने मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलासाठी दुसरे लँडिंग अॅसॉल्ट क्राफ्ट (LCA) आणि पूर्वी प्रदान केलेल्या CGS Huravee च्या बदली जहाजाचा पुरवठा जाहीर केला. या व्यतिरिक्त,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार

विधानादरम्यान मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलाला 24 उपयुक्त वाहने भेट देण्याची घोषणा केली.दोन्ही नेत्यांनी SIFAVARU येथे तटरक्षक बंदराच्या पूर्व-बांधणी टप्प्यात झालेल्या "वेगवान प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले" तसेच  भारत संपूर्ण मालदीवमध्ये 61 पोलिस पायाभूत सुविधांची रचना आणि बांधकाम करणार आहे. भारताने Addu शहरात नॅशनल कॉलेज फॉर पोलिसिंग अँड लॉ एन्फोर्समेंट (NCPLE) बांधले आहे ज्याचे उद्घाटन आपले परराष्ट्र मंत्री एस   जयशंकर यांनी त्यांच्या देशाच्या भेटीदरम्यान केले होते. याच भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी मालडीवाला अब्ज अमेरिकी डॉलरचे अतिरिक्त कमी व्यजदराचे आणि दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यात येत असल्यासाचे जाहीर केले 

 भारताच्या परराष्ट्र धोरणात सध्या शेजारील देशांनी सबंध  दृढ करण्यावर भर दिला जात  आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे करार करण्यात आले आहेत. दोन तीन महिन्यापुर्वी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे मालदिवच्या परराष्ट्र मंत्र्याचा निमंत्रणावरुन श्रीलंकेत होणाऱ्या  बिमस्टेक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मालदिवच्या दोन दिवसाच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते.त्यावेळी आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी मालदिवच्या अध्यक्षांना भारत भेटीचे आमंत्रण दिले होते.त्यानुसार हा दौरा होत आहे जागतिक योग दिनानिमित्त मालदिव सरकार आणि मालदिव मधील भारतीर उच्चायुक्त यांचे संयुक्त आयोजन असणाऱ्या  योगदिनाचा कार्यक्रम काही लोकांकडुन इस्लामविरोधी

असण्याचा आरोप करत उधळून लावण्यात आला होता. या नंतर मालदिव प्रशासनाने अधिकृतपणे मालदिवचे सरकार हे भारताच्या बाजूने आहे. देशातील भारतविरोधी कारवाया तेथील सरकार मोठ्या ताकदीने आणि आत्मविश्वासाने मोडीत काढेल असे सांगत भारताला आश्वस्त केले होते या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे.

भारत जगातील खऱ्या अर्थाने महासात्त म्हणून उदयास येणारा देश असल्याचेच यातून सिद्ध होत आहे

#ही_माझी_एक_हजार_चौतिसावी_ब्लॉगपोस्ट_आहे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?