भारतीय बुद्धिबळपटूंची लक्षणीय कामगिरी

         


   सध्या भारतीय क्रीडाविश्व त्यातही बुद्धीबळविश्व अत्यंत दैदिप्तमान कामगिरी करत आहे . बुद्धिबळ  ऑलम्पियाडचे  अत्यंत दिमाखदार आणि यशस्वी  आयोजन करण्याचे शिवधनुष्य भारतीय क्रीडा खाते आणि तामिळनाडू सरकारने लीलया पेलल्यानंतर  भारतीय बुद्धिबळ विश्वाचा घोडा अधिकच मोठ्या वेगाने धावायला लागला आहे . ऑगस्ट रोजी भारताला ७५ वा  ग्रँडमास्टर मिळाल्याचा आनंद  बुद्धिबळप्रेमींना आनंद मिळाला असताना तो आंनद द्विगुणित करणारी घडामोड भारताचे पहिले ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्या बाबत घडली . बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नियमन करणारी संघटना   इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ दि इचेस म्हणजेच फिडे या संघटनेच्या उपमुख्य अध्यक्ष (deputy president)  म्हणून  विश्वनाथन आंनद यांची निवड झाल्याची हि दुसरी आंनदवार्ता होती कोणत्याही बुद्धिबपटूस असा मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे   पाचवेळा विश्वविजेता झालेले  विश्वनाथन आनंद खऱ्या अर्थाने या पदासाठी सुयोग्य व्यक्ती असल्याची प्रतिक्रिया बुध्दिबलविश्वातून उमटत आहे

         गेल्या काही वर्षाचा आढावा घेतल्यास भारतीय बुद्धिबळपटू अत्यंत चमकदार कामगिरी करत जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे . भारतीय मूळ असून देखील १९८७ पर्यंत भारतात एकही बुद्धिबळ  ग्रँडमास्टर नव्हता .१९८६ साली  विश्वनाथन आनंद हे पहिले ग्रँडमास्टर झाले त्यानंतर २००० पर्यंत बुद्धिबळाचा विकास वेगाने झाला अनेक बुद्धिबळ ग्रँडमास्टर झाले २००० नंतर हा विकास अतिशय वेगाने झाला २०१० नंतर तर हा वेग प्रकाशाला लाजवेल असा होता या काळात भारतात अनेक ग्रँडमास्टर भारतात उदयास आले भारतीय बुद्धिबळपटूंनी जागतिक स्पर्धेत अत्यंत नेत्रपदिक कामगिरी केली जी अजूनही ऑगस्ट २०२२ मध्ये सुद्धा सुरु आहे   दोन वर्षांपूर्वी झालेल्या ऑनलाईन बुद्धिबळ ऑलम्पियाड स्पर्धेत भारताने सुवर्णपदक मिळवले होते नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलम्पियाडमध्ये डी गुकेश या भारतीय बुद्धिबळपटूने अत्यंत चमकदार कामगिरी करत ११ डावांपैकी डाव अपराजित राहण्याचा पराक्रम केला आहे . याखेरीज बुद्धिबळातील विबल्डन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत ( पूर्वी ही स्पर्धा कोरस स्टील बुद्धिबळ स्पर्धा म्हणून ओळखली जायची मात्र कोरस स्टील हि युरोप खंडातील अत्यंत महत्त्वाची स्टील कंपनी टाटांकडे आल्यावर कोर्स स्टील बुद्धिबळ स्पर्धा टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा म्हणून ओळखली जाऊ लागली . भारतीय उद्योजकांनी असे यश मिळवणे हा देखील अभिमानाचा 

विषय आहे असो ) अत्यंत स्प्रुहनीय यश मिळवले आहे . टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा हे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे अबूधाबी खुली बुद्धिबळ स्पर्धा अश्या अनेक स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू आपल्या बौद्धिक चातुर्याचा बळावर खूपच कौतुकास्पद कामगिरी करत आहेत भारत भविष्यातील बुद्धिबळातील महासत्ता होण्याची दाट शक्यता आहे असा विश्वास बुद्धिबळ क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत  ज्याचा एक महत्वाच्या टप्पा विश्वनाथन आनंद यांची फिडेच्या  उपमुख्य अध्यक्षपदी (  (deputy president) निवड झाल्याने गाठला गेला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये

    भारतीय बुद्धिबळपटू अत्यंत चमकदार कामगिरी करत असून देखील अन्य खेळाच्या तुलनेत बुद्धिबळाला खूपच कमी प्रसिद्धी मिळते . ज्यात अत्यंत सकारात्मक बदल या निवडीमुळे होऊ शकतो बुद्धिबळ या खेळाला मोठ्या प्रमाणात राजश्रय मिळण्याची शक्यता या मुळे निर्माण झाली आहे युनाटेड किंगडम या देशात  जेव्हा कॉमनवेल्थ या स्पर्धा सुरु होत्या त्याचवेळी   आपल्या भारतात जागतिक स्तरावरील बुद्धिबळ ऑलम्पियाड या स्पर्धा झाल्या . कॉमनवेल्थ स्पर्धेत जगभरात २१० देश असताना फक्त  ज्या देशांवर ब्रिटिशांचे राज्य होते  ५४ देश सहभाग नोंदवतात याउलट याच काळात भारतात झालेल्या बुद्धिबळ ऑलम्पियाडमध्ये १८७ देशांनी सहभाग नोंदवला होता या सर्व देशांचे प्रत्येकी १० खेळाडू त्यांचे प्रक्षिक्षक , अन्य सहकारी वर्ग यावेळी भारतात होता मात्र कॉमनवेल्थच्या तुलनेत अत्यंत कमी प्रसिद्धी मिळाली या निराशाजनक स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणत बदल होण्याची शक्यता या निवडीमुळे निर्माण झाली आहे  भारतात मोठ्या स्तरावरील जगातील स्पर्धा विश्वनाथन आनंद यांची फिडे संघटनेच्या उपमुख्य  अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने होऊ शकतात

 विश्वनाथन आनंद यांच्या बरोबर खजिनदारपदी  झू चेनजोरान यांची तर ऑलिन-जॅन्सन आणि  माहिर मम्मेदोव  यांची उपाध्यक्षपदी (vice president ) तर अर्काडी ड्वोरकोविच यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे चेन्नई ऑलम्पियाडमध्ये फिडेच्या झालेल्या अधिवेशनामध्ये हि निवड करण्यात आली अध्यक्ष अर्काडी ड्वोरकोविच  या आधीच जर माझी अध्यक्षपदी निवड झाल्यास उपमुख्य अध्यक्षपदी  (deputy president)  विश्वनाथन आनंद असतील असे जाहीर केले होते त्यानुसार विश्वनाथन आनंद यांची झालेली निवड भारतीय बुध्दिबळविश्वाला जगात किती मनाचे स्थान आहे हेच  स्पष्ट करते आहे

 

 

#ही_माझी_एक_हजार_ सत्तेचाळिसावी_ब्लॉगपोस्ट_आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?