एसटीला झाल तरी काय ?

         


 एसटीला झालं तरी काय    ?  असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या बातम्या सध्या महाराष्ट्र एसटीबाबत  ऐकायला येत आहेत . ऐतिहासिक अश्या संपानंतर एसटी बसेस सुरु झाल्या खऱ्या . .मात्र त्यानंतर सुरु झालेल्या एसटीला सुरक्षित प्रवास म्हणजे एसटीचा प्रवास या वाक्याचा विसर पडलेला दिसत आहे ऐतिहासिक संपानंतर सुरु झालेल्या बसेसला अपघात होण्याचे किंवा बस नादुरुस्त होऊन रस्त्यातच बंद पडण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणत वाढल्या आहेत . बसेसचे वायपर योग्य प्रकारे कार्यरत असणे म्हणजे काहीतरी गंभीर गुन्हा आहे सबब बसेसचे वायपर कमीत कमी  कार्य कसे करतील यासाठी काम करणे आवश्यक आहे ,असा समज एसटीतील अधिकाऱयांचा तर झालेला नाहीना ? असे बसमध्ये फिरताना सध्या अनुभवायास येत आहे बस प्रवाश्यांना घेऊन एका गावाहून दुसऱ्या गावात जात असताना सस्पेंशनमध्ये बिघाड होणे,टायर पंचर झाल्यावर बदली टायर नसणे . परिणामी प्रवाश्याना रस्त्यात उतरवून दुसऱ्या बसमध्ये बसवून पुढच्या प्रवासाला पाठवणे हे प्रकार आता एखादा नियम असावाजो न पाळल्यास गंभीर आहे असे
वाटवे इतके हे नित्याचे झाले आहेत . हे सर्व प्रकार  घडत आहे सर्वसामान्यांच्या हक्काच्या बसेसमध्ये अर्थात लालपरी / परिवर्तन बसेसमध्ये .या आधीच आपल्या दर्जाहीन  सेवेमुळे बदनाम झालेल्या  शिवशाही प्रकारच्या बस सेवेनंतर सर्वसाधारण बसमध्ये प्रवाश्यादरम्यान रस्त्यात अडचणी येत असल्याने एसटीच्या विश्वासार्ह्यतेर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे एसटीच्या संपानंतर सुरु झालेल्या सेवेमध्ये असा एकही दिवस नसतो ज्या दिवशी एसटीची एकही बस भर रस्त्यात निकामी होत नाही . या निकामी होणाऱ्या बसेमुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही किंबहुना एसटी संपानंतर आतापर्यतच्या काळात  अशे प्रसंग या आधी घडताना थोडक्यात  वाचल्या आहेत .         एसटीच्या ऐतिहासिक संपात प्रामुख्याने एसटी बसेसचे चालक आणि वाहक यांचा समावेश असला तरी एसटीच्या विविध आगारांमध्ये असणाऱ्या कार्यशाळांचे कार्य देखील मंदावले होते . परिणामी एसटीच्या ताफ्यातील अनेक बसेस ती कार्यरत असो अथवा नसो बस सुरु राहण्यासाठी जी  नियमितपणे देखभाल करावी लागते .त्यापासून दूर होत्या .ज्याचे परिणाम आता दिसत आहे . एसटीच्या ऐतिहासिक संपानंतर बसेस रस्त्यावर आणताना काही प्रमाणत घाई केल्याचे परिणाम आता दिसत आहेत ज्याची शिक्षा या एसटीतून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्याना  त्यांची काही चूक नसताना भोगावी लागत आहे .स्वतःची काही चूक नसताना भोगाव्या लागणाऱ्या या शिक्षेमुळे एसटीविषयी प्रवाश्याच्या  मनात नाराजी निर्माण होत आहे ज्याची अंतिम परिणीती एसटीपासून हे प्रवाशी 

दूर होण्यात होऊ शकते  जर हे प्रवाशी दूर झाले तर एसटीच्या तोट्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही परिणामी या वारंवार बिघडणाऱ्या बसेसमुळे सगळ्यात शेवटी एसटीचेच नुकसान आहे 

       एसटीचा कारभार प्रचंड आहे ज्यात अश्या घटना सहजशक्य आहेअसे म्हणून याकडे दुर्लक्ष करता येणे अशक्य आहे . पूर्वीपेक्षा सध्या प्रवाशाची साधने खूप मोठ्या प्रमाणत वाढली आहे . त्यामुळे प्रवाशी जर एका साधनाने नाराज झाल्यास सहजतेने दुसऱ्या प्रवासी साधनाचा आधार घेत आपला प्रवास पुढे करू शकतो . मात्र महाराष्ट्रातील खेडोपाड्यात सेवा देण्यातील एसटीचा वाटा आहे प्रवाशी असो अथवा नसो आपली एसटी ठरलेल्या वेळेत निघते म्हणजे निघते . एसटी याबाबत फायदा तोट्याचा बाबत विचार न करता सर्वसामान्यना खेडोपाडी सेवा देते  एका गावाहून दुसऱ्या गावात जाणाऱ्या जीप वडाप टॅक्सी या बाबत ही वेळेची अपेक्षाही करता येणे अशक्य आहे खासगी सेवा नेहमीच आपल्या फायदा तोट्याचा विचार करूनच सेवा पुरवते तसेच  सुरक्षेचे आहे  जर दुर्दैवाने
एसटीला अपघात झाल्यास प्रवाश्याला नुकसान भरपाई मिळते . जी खासगी क्षेत्राकडून मिळणे काहीसे अवघड आहे सबब एसटीला पर्याय नाही  मात्र जर सातत्याने एसटीला तोटा झाल्यास एसटी बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्या भारतात  छत्तीसगढ राज्यात एसटी सेवा पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे तर मध्यप्रदेश राज्यात खासगी क्षेत्राचा आधार घेत कशीबशी सुरु आहे त्यामुळे एसटी प्रशासनाने आपल्या बसेस रस्त्यात बॅड पडणार नाही यासाठी सर्वोतपरी काळजी घेण्यातच आपल्या सर्वांचे हित आहे 
#ही_माझी_एक_हजार_ अठ्ठेचाळिसावी_ब्लॉगपोस्ट_आहे



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?