पाकिस्तानात चाललंय काय ?

 


    पाकिस्तानात चाललंय  तरी काय ?  असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घडामोडी पाकिस्तानच्या राजकारणात सध्या घडत आहेत  या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी पंतप्रधान इम्रान खान . आपले सचिव आणि  पक्षाचे मोठे नेते शाहबाझ गिल यांच्या अटकेबाबत आणि यांच्यावर झालेल्या  पोलिसी अत्याचाराबाबत  इस्लामाबाद येथील एका जाहीर सभेत बोलताना इम्रान खान यांनी  इस्लामाबाद उच्च न्यायालय आणि इस्लामाबाद पोलिसांविषयी केलेल्या वक्त्यावरून हा वाद सुरु झाला आहे . त्यांच्या वक्तव्यावरून  त्यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालय आणि इस्लामाबाद  पोलिसांचा अपमान केला तसेच देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होईल असे विधान केले असे सांगत त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा इस्लामाबाद येथील एका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे . २१ ऑगस्ट रोजी त्यांनी हे विधान केले होते . त्यावर त्यांनी इस्लामाबाद उच्च न्ययालयात धाव घेतली उच्च न्यायालायने त्यांना २५ ऑगस्टपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आणि आपले म्हणजे २५ ऑगस्टरोजी न्य्यायालयात मांडण्यास सांगितले आपण जेव्हा हा लेख वाचत असाल तेव्हा कदाचित त्यांनी आपले म्हणणे न्यायालयात मांडले असेल  त्यामुळे त्यांना न्यायालयाने त्यांना अटक करण्याचे आदेश दिले असू शकतात किंवा त्यांच्या जामिन्याच्या कालावधीत वाढ केलेली असू शकते 

         मुळात हे सर्व प्रकरण सूर झाले ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात . पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात झालेल्या हवामान बदलाच्या मदत कार्यात गुंतलेले एक हेलिकॅप्टर कोसळले तेव्हापासून या हेलिकॅप्टरमध्ये पाकिस्तानच्या लष्करातील महत्त्वाचे  असे ५अधिकारी  मृत्युमुखी पडले  सध्याचे लष्करप्रमुख सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी नेमूणक होऊ शकेल अश्या दर्जाचे हे अधिकारी होते . पाकिस्तानी लष्कर आणि सरकारतर्फे

अचानक बदललेल्या हवामानामुळे हे अधिकारी  असेलल्या हेलिकॅप्टरचा अपघात झाला असे स्पष्टीकरण दिले असले तरी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यसाठी लढणाऱ्या  स्वातंत्र्ययोद्धानी हे  हेलिकॅप्टर पाडले अशी शक्यता यासाठी बोलून दाखवली जात आहे आता लष्कराच्या इतक्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या मृत्यू एकाचवेळी एका अपघात होतो यावरटीव्हीवर चर्चा होणे आलेच . अश्याच एका चर्चेदरम्यान ए आर वाय  न्यूज या इम्रान खान यांच्या बाजूने काहीसे वार्तांकन करणाऱ्या वृत्तवाहिनीवर इम्रान खान यनाचे सचिव आणि पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे महत्वाचे नेते शहाबाज गिल गिल यांनी बलुचिस्थान लिबरेशन फ्रंट विषयी काही मत व्यक्त केले . त्यावरून त्यांना अटक करण्यात आली अटक केल्यावर त्यांच्यावर  पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल इतक्या मोठ्या प्रमाणांत पाशवी अत्याचार करण्यात आले त्यांना   सर्व शरीरावरअत्यंत मारहाण करण्यात आली पोलिसांच्या या अत्याचाराविरोधात इम्रान खान यांनी पाकिस्तानात विविध ठिकाणी आंदोलन आणि राजकीय सभा घेतल्या . त्यातील इस्लामाबाद येथील सभेदरम्यान इम्रान खान यांनी केलेल्या विधानावरुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

       जर न्यायालायने त्यांना जामिनावर मोकळे सोडले तर विद्यमान सरकारविरोधातील त्यांच्या संघर्ष अधिक तीव्र होईल सध्या पाकिस्तानात महागाईने परमोच्च बिंदू गाठला आहे परिमाणी सर्व जनता त्यांच्या बाजूने आहे त्यामुळे या आंदोलनास मोठ्या प्रमाणत पाठिंबा मिळेल जर न्यायालयाने  त्यांना जमीन देण्यास मनाई केली तर जगातील असतील नसतील ते गुन्हे इम्रान खान यांच्यावर लावून त्यांना पाकिस्तानच्या राजकारणातून पूर्णतः संपवण्यासाठी सत्ताधिकारी प्रयत्न करतील मात्र पाकिस्तानच्या सर्वसामान्य जनतेचा इम्रान खान यांना असलेला पाठिंबा बघता सत्ताधिकारी पक्षाला इम्रान खान यांना जास्त काळ तुरुंगात ठेवणे हे मोठे बुमरंग ठरू शकते जे अचानक

त्यांच्यवरच उलटू शकते आता यावर इस्लामाबाद येथील न्यायालय काय निर्णय घेतवे यावरच पाकिस्तानचे राजकारण अवलूंबून आहे आणि त्या राजकारणावरच तेथील सामाजिक शांतता आणि आर्थिक प्रगती अवलुबुन आहे 

काही जण पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यास आनंदित होतील त्यांना मी सांगू इच्छितो की पाकिस्तान आपले शत्रू राष्ट्र असले तरी पाकिस्तानात शांतता राहण्यातच आपले हित आहे पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज देश आहे जर पाकिस्तानात अस्थिरता निर्माण झाली आणि ही अणवस्त्रे नको त्या हातात पडली तर होणारी स्थिती महाभयानक असेल हे नक्की 

#ही_माझी_एक_हजार_  एकोणपन्नासावी_ब्लॉगपोस्ट_आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?