अखेरच्या सम्राटाचे निधन

   


    ३१ ऑगस्ट २०२२ रोजी जगातील अखेरचा  सम्राट हे जग सोडून गेला . मिखाईल गोर्बाचेव्ह हे त्या सम्राटाचे नाव . आपल्या अवाढव्य साम्राजाचे विभाजन होताना मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी बघितले . आज २०२२ साली जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिल्या क्रमकावरील आणि आठव्या क्रमांकावर असलेल्या  अनुक्रमे रशियन फेडरेशन आणि काझीकस्तान या दोन देशासह १४ अन्य देश या साम्राजात मोडत होते युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशिया हे त्या साम्राजचे नाव . आज जगात असणाऱ्या २१० देशांपैकी १७ देश या साम्राजात मोडत होते या वरून या साम्राजाच्या विस्तार किती मोठ्या प्रमाणात झालेला होता हे लक्षात येते युनाटेड सेव्हिंयत सोशालिस्ट रशिया या एके काळाच्या महासतेच्या अस्त त्यांनी बघितला.  किंबहुना आपल्या सहीने त्यांनी या साम्राजात मोडत असलेल्या १६ देशांना स्वातंत्र्य मिळवून दिले . त्यांच्या या कृतीमुळे जगाच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल झाले . जगाचा भूगोल बदलला . जगात सुप्तपणे सुरु असलेले वर्चस्ववादी  धोरण ज्यास शीतयुद्ध म्हणतात ते संपले आणि युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ही एकच महासत्ता जगत राहिली . भारताच्या अत्यंत जवळच्या मित्राचे "युएसएसआर" चे पतन ज्यांच्या सहीने झाले ते नाव म्हणजे मिखाईल गोर्बाचेव्ह या पतनामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणात बदल झाला ते काहीसे अमेरिकेच्या बाजूने झुकले . जुन्या सरमदारशाही पद्धतीतून  जगाने बाहेर पडत नव्या आधुनिक मुक्त विचारसरणीचा  व्यवस्थेत ज्यांच्या सहीमुळे लीलया प्रवेश केला  अशी व्यक्ती म्हणजे मिखाईल गोर्बाचेव्ह . सध्या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू असलेले ब्लादीमीर पुतीन ज्यांच्यामुळे राजकारणात प्रवेशकर्ते झाले ते नाव म्हणजे मिखाईल गोर्बाचेव्ह .या अश्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन ३१ ऑगस्ट २०२२ रोजी झाले आणि जागतिक राजकारणातील एक अध्याय संपला 

    जवळपास पाउण शतक पोलादी पडद्याआड असलेल्या युनाटेड सेव्हिंयत सोशालिस्ट रशियाच्या जनतेला विचारांचे स्वातंत्र्य देण्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल . रशियन नागरिकांच्या मते त्यांच्या सहीने देश फुटल्याने ते देशद्रोही ठरत असले तरी त्यांच्यामुळे रशियात विचारस्वातंत्र्य आले हे नाकारून चालणार नाही साम्यवादी विचारसरणीने तयार झालेला पोलादी पडदा दूर करत जनतेला देशाच्या आर्थिक स्थितीविषयी सद्यस्थिती सांगण्याचे धैर्य त्यांनी दाखवले . त्यांनी यु.  एस.  एस.  आ.र. ची सूत्रे हाती घेतली त्यावेळेसच म्हणजे १९८५ साली जगातील

साम्यवादी विचारांच्या या महासतेच्या मनोरा कोसळण्यास सुरवात झाली होती . तो सावरण्याचे त्यांनी निकराचे प्रयत्न केले मात्र देशातील मुक्त विचाराचे वारे आणि ढासळती आर्थिक स्थिती यामुळे त्यांना गेली [पाऊण शतक साम्यवादी विचारणसरणीमुळे टाचेखाली ठेवलेल्या देशांना स्वातंत्र्य देणे भाग पडले काझकिगिस्तान किर्गिस्तान उझबेकिस्तान तुर्कमेनिस्तान , या मध्य आशियातील मुस्लिम बांधवांची संख्या जास्त असलेल्या देशांसह आर्मेनिया आणि सध्या जगात चर्चेत असेल्या युक्रेन या ख्रिश्चन धर्मियांची संख्या जास्त असलेल्या देशांसह एकूण १६ देशांना त्यांनी स्वातंत्र्य दिले  

चीनने १९७८ नंतर प्रशासकीय राजवट साम्यवादी विचारणाची ठेवत अर्थव्यवस्था मात्र भांडवलदारशाहीला अनुकूल होईल अश्या रीतीने वाटचाल केली आज त्याची फळे चीनच्या आर्थिक प्रगतीच्या रूपाने आपणस दिसत आहेतच . अर्थव्यवस्थेत खासगी क्षेत्राचा प्रवेश चीनने १९७८ सालीच केला ( जो भारताने जुलै १९९१ साली केला ) मात्र प्रशाकीय राजवट जुन्याच कम्युनिष्ट पद्धतीचीच ठेवली जे आपणस दिसत आहेच साम्यवादी रशियात मात्र याच्या उलट झाले रशियात नागरिकांना विचारांचे स्वातंत्र्य दिले मात्र अर्थव्यस्थेत बदल केले नाहीत ज्याची फळे मिखाईल

गोर्बाचेव्ह  यांच्या अध्यक्षपदाच्या रशियाने आणि संपूर्ण जगणे बघितली मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या सहा वर्षाच्या राजवटीत त्यांनी अमेरिकेबरोबर अण्वस्त्र प्रसाराबाबत अमेरिकेबरोबर शांततेचा करार देखील केला ज्याचे खूपच सकारात्मक परिणाम झाले मात्र मिखाईल गोर्बाचेव्ह ओळखले जातात ते युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाच्या विघटनसाठीच त्यांना निधनाने हा सर्व विघटनाच्या इतिहासातील महत्त्वाचा दुवा निखळला आहे हे खरे 

#हि_माझी_एक_हजार_अठ्ठवनवी_ब्लॉगपोस्ट_आहे 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?